Shri Samarth Panchakam
by Shrimat PP Sadguru Bhagwan Sri Sreedhara Swamy Maharaj
(Many thanks to Mrs Sonali Upendra Dasare of Pune for sharing the doc file of this stotra)
।। श्रीसमर्थपंचकम् ।।

।। श्रीसमर्थ रामदासगुरवे नमः ।।

यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकम् यथा ।
देशधर्मामृतः यो हि श्रीसमर्थं प्रणौमि तम् ।।१।।

*अर्थ*: ज्याप्रमाणे शिंपल्यातून मोती उत्पन्न होतो त्याप्रमाणे जो आपल्या मातेच्या गर्भातून उत्पन्न झाला, ज्याने देश-धर्म यांना अमृताप्रमाणे जीवन दिले त्या श्रीसमर्थ रामदासांना मी नमस्कार करितो.

स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः ।
रामभक्तिर्य आरामः श्रीसमर्थं प्रणौमि तम् ।।२।।

*अर्थ*: जो स्फूर्ति व शक्तिचा वसंत आहे, जो पुण्यज्ञानाचा सरोवर आहे, जो राम भक्तीचे उद्यान आहे त्या श्रीसमर्थ रामदासांना मी नमस्कार करितो.

अज्ञानतिमिरार्को यः सुधांशुः शान्तिदस्तथा ।
सत्तत्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थ प्रणौमि तम् ।।३।।

*अर्थ*: अज्ञानरूपी अंधःकारास जो सूर्याप्रमाणे आहे तसेच जो शान्तिदायी चन्द्रमा आहे, जो सत्तत्वाचा सागर आहे त्या श्रीसमर्थ रामदासांना मी नमस्कार करितो.

यस्तप्तहृत्सुधावृष्टियोंदीनजनकामधुक् ।
मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थ प्रणौमि तम् ।।४।।

*अर्थ*: संतप्त हृदयासाठी जो अमृताची वृष्टी आहे, जो दिनांची इच्छा पुरी करणारी कामधेनु आहे अशा, मुमुक्षांना मुक्ति देणाऱ्या पूज्य विभूति श्रीसमर्थ रामदासांना मी नमस्कार करितो.

पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः ।
आनंदवनभूकृद्यः श्रीसमर्थ प्रणौमि तम् ।।५।।

*अर्थ*: जो (शिवरायास) श्रीकृष्णाप्रमाणे (मार्गदर्शक) होता, जो शिवरायांचा कल्पवृक्षच होता, ज्याने आनंदवनभुवन (महाराष्ट्र राज्य) बनविले त्या श्रीसमर्थ रामदासांना मी नमस्कार करितो.

श्लोकपंचकमेतद्यः सश्रद्धाभक्तितः पठेत् ।
आयुरारोग्यमैश्वर्यम् भक्तिं मुक्तिं स विंदति ।।६।।

*अर्थ*: जो श्रद्धेने व भक्तीने ह्या श्लोक पंचकाचे पठण करील त्यास आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, भक्ति व मुक्ति प्राप्त होईल.

इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्रीधरस्वामिना विरचितं श्रीसमर्थ पंचकम् स्तोत्रं संपूर्णम्