श्री स्वामी महाराजांचे अल्प चरित्र
02

महान संत श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील देगलूरचे. स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्‍चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजींचा जन्म.श्रीधर स्वामीजींचा जन्म १९०८ साली दत्तजयंतीच्या दिवशी झाला.

स्वामीजींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती. या ओढीनेच स्वामीजींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले.सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरुंच्या चरणी झिजवला…. त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा प. पू. भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली…..

साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते….. त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे…. व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे (कर्नाटकात) जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली….. त्याप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच….. त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला…..श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला.

आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे….. साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली…..

मधल्या कालखंडात एक प्रकारचे ग्लानित्व आणि औदासिन्य संप्रदायाला आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड त्याच प्रमाणे चाफळ, शिवथरघळं, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. प.प.भगवान.श्री.श्रीधर स्वामी महाराज. यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला.त्यांचे असंख्य भक्त महाराष्ट्रात त्याच प्रमाणे कर्नाटकात काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरघळ , चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवुन आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी “श्री.समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड” या संस्थेची स्थापन १९५० साली गडावर केली. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तुंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थभक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्याप्रमाणात भौतिक सुविधा घडवुन आणल्या.त्यांची समाधी कर्नाटकातील वरदपूर येथे आहे.

आदिनारायणं विष्णुं ब्रम्हानंच वसिष्ठकम।
श्रीरामं मारुतिं वंदे रामदासंच श्रीधरम॥

नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरुपिणे ।
स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ॥

जय जय रघुविर समर्थ!!

राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदासस्वामी महाराज की जी!!!

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय!!!