श्री सच्चिदानंद स्वामी
rsz_kansur

श्री सच्चिदानंद स्वामींचा जन्म ३० जुलै १९३८ साली केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यातील कोलीयुर तालुक्यातील चक्रकोडी नामक गावात झाला. श्रीमत प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांची पहिली भेट १९४८ साली कर्नाटक च्या मंगलोर या शहरात झाली व लवकरच अनुग्रह हि प्राप्त झाला. श्री स्वामीजी यांना ‘छोटे स्वामीजी’ किंवा कानडीत ‘सन्ना स्वामीजी’ असे म्हणून संबोधित असे. १९६१ साली विजया दशमीस श्री सच्चिदानंद स्वामींनी संन्यास दीक्षा ग्रहण केली. १९७३ साली श्री स्वामीजींनी देह ठेवल्या नंतर श्री सच्चिदानंद स्वामी श्री क्षेत्र वरद्पूर येथील श्री श्रीधाराश्रमाचे १४ वर्षे प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी प पु श्री श्रीधर स्वामी महाराजांचे कानडीत ‘श्री सद्गुरू प्रासादिका भगवान श्रीधर गुरु चरित्रे’ या नावाचे जीवन चरित्र लिहिले आहे. या ग्रंथाचे एकूण ९५० पाने असून ३२ अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय श्लोका ने सुरु होत असून श्लोका चे आद्याक्षर ‘नमः शान्ताय’ या मंत्रातील एक आहे. ‘नमः शान्ताय’ या मंत्रात ३२ अक्षरे असल्याने ग्रंथात ३२ अध्याय आहेत. ३२ अध्यायातील पहिले १६ अध्यायात श्री स्वामीजींनी संन्यास आश्रम स्वीकारण्यापूर्वी चा जीवन वृतांत आहे तर उरलेल्या १६ अध्यायात संन्यास आश्रम स्वीकारण्या नंतरचा वृतांत आहे. हा चरित्र ग्रंथ मराठी भाषेत हि उपलब्द आहे. श्री क्षेत्र वरद्पूर येथील समाधी मंदिर तसेच श्रीधर तीर्थाचे बांधकाम श्री सच्चिदानंद स्वामींच्या देखरेखी खाली झालेले आहे. त्यांच्या आश्रमाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे – श्री श्रीधर सच्चिदानंद आश्रम, गुरुपुरा, कान्सुर, उत्तर कनडा, कर्नाटका.

जय जय रघुविर समर्थ!!