श्री अय्याबुवा रामदासी
rsz_rsz_aiyya

 

स.भ. अय्याबुवा रामदासी यांचे पूर्ण नाव वेंकटरमण अय्या असे होते. त्यांचे मूळ गाव तामिळनाडू येथील सेलम हे होते. ते प्रथम चाफळ क्षेत्री आले. नंतर साधनेसाठी सज्जनगडावर आले. १९३५ साली त्यांना सर्व प्रथम श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले व अनुग्रहही झाला. १९४५-४६ साली जेव्हा श्री स्वामीजी हिमालयात गेले तेव्हा ते श्री स्वामीजींच्या बरोबर त्यांच्या सेवेत होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले होते. ते कडक शिस्ती चे भोक्ते होते. सज्जनगडावरील सुसज्ज ग्रंथालयाचा पाया त्यांनी रचला. श्री स्वामीजींनी देह ठेवे पर्यंत अनेक वर्षे अय्याबुवांना श्री स्वामीजींचा सहवास लाभला. ०१ में २००३ रोजी त्यांनी सज्जनगडावर देह ठेवला.

जय जय रघुवीर समर्थ!!!