श्री अण्णाबुवा रामदासी
rsz_anna

 

स.भ. अण्णाबुवा रामदासी यांचे पूर्ण नाव शामाचार्य नृसिंहाचार्य खुपेरकर असे होते. त्यांचे मूळगाव कालगाव हे होते. १९३५ साली त्यांना सर्व प्रथम श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले व लवकरच त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. ते श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष होते. स.भ. कल्याणसेवकांच्या पश्चात ते सज्जनगड मासिकाचे संपादकही होते. त्यांना संस्कुत भाषेचे उत्तम ज्ञान होते. सज्जनगडावर त्यांनी अनेक अनुष्ठाने केली. अशा पद्धतीने त्यांनी समर्थ सेवेतच आपले आयुष्य व्यतीत केले व १९९९ साली त्यांनी पुणे येथे आपला देह ठेवला.

जय जय रघुवीर समर्थ!!!