श्री करमरकरबुवा रामदासी
rsz_rsz_img_4277

 

स.भ. करमरकरबुवा रामदासी यांचे पूर्ण नाव नारायण (नाना) करमरकर असे होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील शिवणे हे होते. १९४९ साली ते प्रथम सज्जनगडावर आले व १९५० साली त्यांना सर्व प्रथम श्रीमत् प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे दर्शन झाले व अनुग्रहही झाला. ते उत्तम कीर्तनकार होते व आवाज सुरेल होता. ते अतिशय गोड आवाजात भजन करीत. श्री समर्थ सेवा मंडळाच्या पादुका प्रचार दौऱ्यात ते कीर्तन करीत. कीर्तनात वाजविण्याची झांज त्यांना श्री स्वामीजींनी अभिमंत्रित करून दिली होती. त्यांना अनेक वर्षे श्री स्वामीजींचा सहवास लाभला. सज्जनगडावरील दासनवमी उत्सव, नवरात्र या वेळची भजनसेवा ते करीत असत. त्यांच्या गोड आवाजातील भजनामुळे आजही ते अनेकांच्या स्मरणांत आहेत. ७ सप्टेंबर २००७ रोजी (श्रावण वद्य एकादशी) रोजी त्यांनी सज्जनगडावरच आपला देह ठेवला.

जय जय रघुवीर समर्थ!!!