श्री मारुती बुवा रामदासी 
rsz_img_4274

 

श्री मारुती बुवा यांचा जन्म १९३६ साली कोल्हापूरच्या ‘बुवा चे वठार’ या गावी झाला होता. ते १४-१५ वर्षांचे असतांना घर सोडून श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवा व तप करण्यास गेले असता तेथे त्यांची भेट श्री लक्ष्मी नारायण (धारेश्वर चे श्रींचे शिष्य श्री नर्मदानंद स्वामी) यांच्याशी झाली. नंतर काही दिवसा नंतर म्हणजे १९५०-५१ च्या सुमारास ते दोघे श्रीक्षेत्र सज्जनगड ला येऊन पोहोचले व तेथे त्यांना श्री स्वामींचे दर्शन झाले व अनुग्रह ही प्राप्त झाला. त्या नंतर श्री मारुती बुवांनी कधीहि सज्जनगड सोडला नाही. ते मागील ३३ वर्षांपासुन श्री समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी श्रीमद् दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम या वर खूप लिखाण केलेले आहे. त्यांनी श्री स्वामींचे चरित्र ही लिहिलेले आहे. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके पुढील प्रमाणे आहेत – सार्थ आत्माराम, मनोबोधाचा अभ्यास, दासबोध चिंतनिका, दासबोधातील रहस्य, आत्मारामातील रहस्य व श्रीश्रीधर स्वामी चरित्र. श्री मारुतीबुवांनी १९ ऑक्टोबर २०१९ रोजी देह ठेवला. शेवटची ३-४ वर्षे त्यांच्या मुक्काम सातारा येथील श्री समर्थ सदन येथे होता.

जय जय रघुविर समर्थ!!