नेत्राक्का
rsz_rsz_netr

 

नेत्रावती देवरू भट्ट उर्फ नेत्राक्का यांचा जन्म २० जानेवारी १९२८ साली कर्नाटकातील उत्तर कनडा जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील मत्तीगारू नामक गावात झाला. सर्व प्रथम श्री स्वामीजींचे दर्शन त्यांना ७-८ वर्षांचे असतांना झाले. त्यांना लहानपणापासून प्रखर वैराग्य व परमार्थाची आवड होती. १९३९ साली श्रावण महिन्यात श्रीयाण या प्रसिद्ध क्षेत्री नाम साप्ताह झाला. या नाम सप्ताहात नेत्रा अक्कांना श्री स्वामीजींनी अनुग्रह व स्वतः च्या पादुका दिल्या व त्यांची नित्य पूजा करण्यास सांगितले. त्याच प्रमाणे त्या आजतागायत पूजा करत आहेत. त्यांचे वय त्या वेळेस फक्त ११ वर्षे होते. त्यांचे भाऊ शिगेहळळी मठात संस्कृत चे अध्यापक होते. १९४६ ला त्या कायमचे शिगेहळळी मठात वास्तव्यास आल्या. १९४२ साली शिगेहळळी ला श्री स्वामीजींचा संन्यास ग्रहण विधी संपन्न झाला त्या कार्यक्रमाला नेत्रा अक्का उपस्थित होत्या. श्री श्री स्वामीजी व श्री शिवानंद स्वामी यांच्यावर त्यांनी जवळ जवळ हजार पाने मराठी, संस्कृत व कानडीत स्तोत्रे व कवणे केलेली आहेत. सद्या हि नित्यनेमाने त्या शिगेहळळी मध्ये श्री शिवानंद स्वामी महाराजांच्या समाधी समोर भजन सेवा सदर करतात. त्यांचा पत्ता पुढील प्रमाणे आहे – परमानंद मठ, शिगेहळळी, पोस्ट – कळवे, ता – सिरसी, जि – उत्तर कनडा, कर्नाटक.

जय जय रघुविर समर्थ!!