श्री सदुभाऊ कुलकर्णी
rsz_rsz_img-20151106-wa0005

 

श्री सदाशिव पांडुरंग कुलकर्णी उर्फ श्री सदुभाऊ कुलकर्णी यांचा जन्म १३ मार्च १९२० साली सातारा येथील कुठारे नामक गावात झाला. त्यांची श्री स्वामीजींशी पहिली भेट १९५९ साली सोलापूरला श्री मेथोडेकर बुवा यांनी आयोजित केलेल्या दास नवमी उत्सवा दरम्यान झाली. अनुग्रह देण्याबद्दल विनंती केल्यावर श्री स्वामीजी म्हणाले कि श्री क्षेत्र गाणगापुरी तुला अनुग्रह देईन. त्यानुसार एक आठवड्या नंतर श्री क्षेत्र गाणगापुर ला श्री सदुभाऊन्ना अनुग्रह प्राप्त झाला. १९६० साली श्री स्वामीजी पुनः सोलापूर ला श्री बक्षी यांच्या घरी आले होते. त्यावेळी हजारो लोक श्री स्वामीजींचे दर्शन घेण्यास जमले होते. तेव्हा श्री अष्टेकर बुवा श्री सदुभाऊ यांना घेऊन श्री स्वामीजीं कडे गेले व श्री सदुभाऊ यांच्या वर श्री स्वामींनी कृपा करावी अशी नम्र विनंती केली. श्री स्वामीजींनी श्री सदुभाऊ यांच्या मस्तकावर हात ठेवला व त्याच बरोबर श्री सदुभाउंना तात्काळ समाधी लागली. ते त्या अचल व स्तब्द अवस्थतेत १ तासाहून हि आधिक काळ होते. या अनुभवा नंतर श्री सदुभाउंच्या स्वभावात व वागण्यात झपाट्याने परिवर्तन झाले. सगळ्या जुन्या सवई सुटून गेल्या व त्यांचा स्वभाव अंतर्मुख झाला व त्यांची परमार्थाची आवड द्विगुणीत झाली. पुण्यात स्थाईक झाल्यावर त्यांनी ‘दासबोध अभ्यास मंडळ’ सुरु केले. रोज संध्याकाळी दासबोध तसेच विविध अध्यात्मिक ग्रंथांवर चर्चा तसेच प्रवचन होत असे. पुढे त्यांनी पुण्यात ‘श्रीधर ध्यान मंदिर’ सुरु केले. आजही तेथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी श्री स्वामीजींचे सर्व भक्त एकत्र येऊन उपासना करतात. श्री सदुभाउंनी चाळीस हजार ओव्यांचा ‘श्रीधर सिद्ध चरित्र’ नामक श्री स्वामीजींचे ओवीबद्ध चरित्राची रचना केली आहे. ‘आनंद तत्व मीमांसा’ व ‘सोलीव सुख’ नावाचे इतर २ ग्रंथ हि लिहिले आहेत. श्री सदुभाउंनी १९ जानेवारी २००९ साली पुण्यात देह ठेवला.

जय जय रघुविर समर्थ!!