श्रींची गीते
“देई तव दर्शन आता श्रीधरनाथ”
एकदाच पाठीवरूनी फिरो तुझा हात
देई तव दर्शन आता श्रीधरनाथ.. श्रीधरनाथ.. ||
आयुष्य सरले गेले वाया.  -२
व्यर्थ शिणली माझी काया
अज्ञान तम हे साचले सारे
मनी पश्र्चाताप…  मनी पश्र्चाताप…     ||
भक्त जाती तृप्त होऊनी
अभंग गाती नाचती कोणी…नाचती कोणी…
तुझ्या दारी अवघे आले ….
   सारे भाग्यवंत…सारे भाग्यवंत… ||
दमले थकले दारी आले
श्रीधरपदीमी लीन झाले
दरवळे सुवास कृपेची
होई बरसात…कृपेची बरसात… ||