श्रींची गीते

“स्वामी श्रीधर दत्तगुरु ते”

स्वामी श्रीधर दत्तगुरु तेहसूनी पाहता मन हरखले ||   

ओढ लागली स्वामी चरणांची         

स्वामी श्रीधर दत्तगुरु ते
हसूनी पाहता मन हरखले ||

ओढ लागली स्वामी चरणांची
जीव आतुरला सेवा घडली
शरणागत मी अविचल झाले
हसूनी पाहता मन हरखले…स्वामी … ||१

जन्मोजन्मीची खूण पटता
सुगंध पसरला तिमीर निमाले
विचार मनीचे सर्व जाणले
हसूनी पाहता मन हरखले …. स्वामी…||२

मी तू पणाची भिंत सरता
अवघे अंबर दुमदुमले
स्वामी श्रीधर गाली हसले
हसूनी पाहता मन हरखले … ||३
स्वामी …..