श्रींचे गीत  – “मोक्षश्री श्रीधर”

रचना व गायन : कु.श्रावणी प्रशांत देशमुख (वय वर्षे १४),पुणे.
चाल : श्री कौस्तुभ बुवा रामदासी,मठाधिपती,श्री संत वेणास्वामी मठ,मिरज.
सौजन्य : श्री प्रशांत देशमुख,पुणे.
 
गीताचे बोल
 मनी धरा श्रीधरा श्रीधरा
मनी धरा श्रीधरा  || धृ ||
 
मोक्षाचा मंत्र ज्यांनी दिला 
मनी धरा श्रीधरा श्रीधरा….
 
जन्म लाड चिंचोळीचा
मस्तकी आशिर्वाद श्री व्यंकटेश व रेणुकेचा
लखलखता हिरा समर्थ संप्रदायाचा
वसा हाती घेतला तुम्ही धर्म रक्षणाचा || १ ||
 
मनी धरा श्रीधरा श्रीधरा
मनी धरा श्रीधरा ….
 
शिष्य रामदासांचे
अवतार श्री गुरू दत्तात्रेयांचा
स्वामी रामदास श्रीपाद
प्रत्यक्ष अद्वैत श्रीधरांचा || २ ||
 
मनी धरा श्रीधरा श्रीधरा
मनी धरा श्रीधरा ….
 
सज्जनगड असे कर्मभूमी तुमची
पाठीशी साक्षात समर्थ गुरूमाऊली
मोक्षाचा मंत्र ज्यांनी दिला
मनी त्या चिंतावे श्रीधरा || ३||
 
मनी धरा श्रीधरा श्रीधरा
मनी धरा श्रीधरा ….
 
मृदूतेचा निर्मळ झरा
कठोरपणा तेवढाच खरा
कारुण्याच्या दयासागरा
करुणा करा || ४||
 
मनी धरा श्रीधरा श्रीधरा
मनी धरा श्रीधरा ….
 
मुख असे कोजागिरीचा शशी
भक्तांना वात्सल्य प्रेम देशी
वरदहळ्ळी निवास तुमचे
घ्यावे प्रणाम माझे || ५  ||
 
मनी धरा श्रीधरा श्रीधरा
मनी धरा श्रीधरा…