श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी जी
(सौजन्य - श्री अनिल बापट,सागर(Facebook) व श्री श्रीधर दीक्षित,पुणे(Facebook)
मराठी भाषांतर - सौ भामती हेगडे,सातारा(Facebook)
शब्दांकन - रजनीकांत चांदवाडकर,नाशिक(Facebook) )

 

IMG-20200526-WA0001

यन्माहवाक्य सिद्धान्त मुक्तचैतन्य गोचरम्।
वासुदेवानन्द संज्ञम् नौमी सर्वात्मकम् गुरुम्॥

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामीजी यांच्या पूर्वाश्रमीच्या वडिलांचे नाव वेदमूर्ती श्री वेंका भट असे होते व ते कर्नाटकातील सोरब तालुक्यातील बरिगे या गावचे निवासी होते. ते त्यांच्या वडिलांचे दुसरे पुत्र होते. स्वामीजी त्यांच्या बालवयापासूनच वेदाभ्यास, शाळेतील अभ्यास, शेतीची कामे, हस्तकला व कलाकृती या सर्वांत अत्यंत निपुण व समर्पित होते. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेण्याच्या विचाराने घर सोडले व शिगेहल्ली येथील शिवानंदाश्रमात त्यांनी मठाच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. पुढे लवकरच त्याच आश्रमात त्याची भेट श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांच्याशी झाली व ते त्यांच्या बरोबर बद्रिकाश्रमात गेले व तेथेच त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली व “श्री वासुदेवानंद सरस्वती” हे योगपट्ट धरण केले. पुढे त्यांनी बद्रिकाश्रमातच तपाचरण केले व तेथे वेदांतावर प्रवचन माला आयोजित केली. उपनिषदे व भगवदगीतेवरील त्यांची उत्कृष्ट प्रवचनमाला पुस्तक रूपात प्रकाशित झालेली आहे.

पुढे ते कर्नाटकात परत आले व बिलगुंजी नामक गावात कैक वर्षे राहिले व नंतर श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांच्या सूचनेनुसार ते श्री क्षेत्र वरदपूरला कायम स्वरूपी स्थायिक होऊन तेथेच कैक वर्षे गुरुसेवेत रत झाले. समाधी मंदिरात त्रिकाल आरती नंतर ते तीर्थ वाटप करीत असत. १४ जुलै १९९८ साली त्यांनी आपला देह ठेवला व ते परब्रह्मात लीन झाले. त्यांच्या शिष्य व भक्तांनी त्यांची समाधी कर्नाटक राज्यातील शिवमोग्ग जिल्ह्यातील सोरब तालुक्यातील होळेकोप्पा, पोस्ट पाडावगोडू, येथील अनेगुड्डे फार्म येथे आमची नदी जवळ स्थापन केली आहे.

जय जय रघुवीर समर्थ!!