श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज विरचीत

श्रीरामपंचक स्तोत्र

अनुवादक : सौ. नलिनी प्रभाकर पाटिल,इंदूर
आभार : सौ सोनाली उपेंद्र दसरे,पुणे

(शर्दूलविक्रीडितवृत्तम्‌)

*यस्मिन्‌ सर्वमिदं विभाति वितथं मिथ्येन्द्रजालादिवत्‌
*यन्नित्यं ह्युररीकृतं सुविमलं ब्रह्मादिभिर्देवतैः।*
*यन्मौलीकृतमप्यहो गुनिगणैः सच्चित्सुखात्म्यं बृहत्‌*
*सोऽयं श्रीगुरुरामचन्द्र इति यो राराजते क्ष्मातले ।।1।।*

ज्या मध्ये हे सर्व जग असत्य अर्थात्‌ नश्वर असे भासते,
आणि सर्वच संसार इन्द्रजाल जादू प्रमाणे भ्रामक वाटतो, जे
ब्रह्मदेवादि महान्‌ मनीषींकडून निर्मल निष्कलंक असे संमत असून
अंगीकार केले गेले आहे अर्थात्‌ स्वीकृत केले गेले आहे तसेच सर्व
मुनिगणांकडून जे विशालरुपांत सत्‌ चित्‌ सुखमय असे आनंदप्रदायक
म्हणून शिरोधार्य केले गेले आहे ते सुख म्हणजे श्रीगुरुरामचन्द्र हेच
होय कीं जे ह्‌या पृथ्वीतलावर आपल्या स्वयंप्रकाशाने झळकत आहे.
।।1।।

*जीवानां हितदर्शनाय किल यो धर्मावतारोऽभवत्‌*
*सर्वत्यागपुरस्सरं जनहिते यो व्यापृतोऽभूत्सदा।*
*सर्वस्यात्मनिवेदने भवति यद्रूपं स्वमूर्तं शिवं*
*सोऽयं श्रीगुरुरामचन्द्र इति यो राशजते क्ष्मातले. ।।2।।*

जीवांच्या हितासाठी म्हणजे सर्व मानव प्राण्याच्या
कल्याणासाठी जो धर्माचा साक्षात्‌ अवतारच असा प्रकटला, सर्वस्वाचा
त्याग करण्यांत जो स्वतः बदलत गेला, (म्हणजे राज्याभिषेक
होण्याचा थाट होत असतां जो वल्कलादि धारण करुन वनवासी
झाला, नंतर सीता त्याग करुन एकटाच यज्ञ करण्यास मनावर दगड
ठेवून प्रजारंजनाकरिता सर्वस्वाचा वैयक्तिक सुखाचा अव्हेर करुन
त्यावर पाणी सोडून बसला,) भक्तिच्या अंतिम पायरीवर म्हणजे
आत्मनिवेदन ह्‌या पदावर गेल्यावर भक्ताला ज्याचा साक्षात्कार हा
मंगलमय सिध्द झाला तो श्रीगुरु रामचन्द्र हा या भूतलावर आपल्या
तेजाने शोभिवंत झाला. ।।2।।

*सत्यं ज्ञानमनन्तमद्वयमहो यद्‌ब्रह्मरुपं स्फुटं*
*माया नास्ति न चेशजीवकलना यस्मिन्नभिन्नं तथा।*
*लीलास्वीकृतविग्रहं नतजनत्राणाय चादर्शयन्‌*
*सोऽयं श्रीगुरुरामचन्द्र इति यो राशजते क्ष्मातले. ।।3।।*

अर्थ—— ज्याचे ब्रह्मस्वरुप हे अत्यंत निर्मल विकसित असून ते सत्य
ज्ञानरुप आणि अद्वय (एकच एक अनन्य साधारण असे आहे माया ही
च+ईश+जीव+कलना) जीव आणि ईश ह्‌यांना घडविणारी नाही आणि तो ब्रह्मस्वरुप परमेश्वर हा त्यापासून वेगळा नाही. जे नत
म्हणजे नमन करते झाले त्यांना लीलया आपले स्वरुप रुप धारण
करुन दर्शन देऊन त्यांचे तारण करण्यास उद्यत झाला. त्या
श्रीगुरुरामचन्द्राला मी ह्‌या पृथ्वीतलावर सुशोभित झालेला बघतो. त्या रुपांत मी त्याचे दर्शन घेतो. ।।3।।

*योऽमूढोऽपिच मूढवत्खलु नटत्येवं श्रुतिइच्छावदन्‌*
*सङगोनास्ति तथैव राग इति वा द्वेषादिकं यस्य नो।*
*योऽविद्यावशजीविनां स्वविमलं रुपं करोति ध्रुवं सोऽयं श्रीगुरुरामचन्द्र इति यो राराजते क्ष्मातले।।4।।*

जो (अमूढ—सर्वज्ञानी) असून सुध्दा मानवरुपामध्यें अजाण असा
अभिनय करतो (सीता हरण झाल्यावर श्रीरामाने जो विलाप केला तो
एका मूढ अशा माणसाचा अभिनय होता) असे श्रुति म्हणजे वेद
आपल्या कथनाने गर्जना करितात. ज्याला कांही राग आसक्ति, द्वेष
किंवा विकार (संग) नाहीत जो अज्ञानवश अशा जीवांचे ज्ञान सम्पन्न
अश्या स्वच्छ रुपांत रुपांतरण करतो (त्यांना ज्ञानचक्षु देवून तारतो)
त्या श्रीगुरुरामचंद्राचे तेज ह्‌या अवनीतलावर सर्वत्र फांकले आहे.
।।4।

*हित्वाहङकृ तिमप्यहो पुनरिदं जीवेशबन्धादिकम्‌ मायाशक्तिविभावितं जगदिदं चाप्नोति यन्मानवः।*
*सच्चित्सौख्यमपारमद्वयपदं यद्‌ब्रह्म सर्वात्मकं सोऽयं श्रीगुरुरामचन्द्र इति यो राराजते क्ष्मातले. ।।5।।*

जो मनुष्य अहंकारास दूर लोटून (जिंकून) जीव आणि ईश हे बन्धन
तोडून तसेच मायारुपी शक्तिमूुळे जे हे जग सर्वत्र भासमान होते
त्यास झिडकारुन चित्सौख्य म्हणजे जे अक्षय टिकणारे सौख्य आहे,
जे अद्वयपद आहे ते प्राप्त करतो ते सर्वात्मक ब्रह्मपद आहे, ते हे
ब्रह्मरुप म्हणजे प्रभु श्रीराम जगद्‌गुरु सर्वत्र प्रकाशाने कांठोकांठ
भरलेले आहेत. सर्व पृथ्वी त्यामुळे झगमगते आहे. ।।5।।

*य इदं पठति स्तोत्रं भक्त्या श्रीरामपञचकम्‌।*
*भक्तिज्ञानविरक्त्याद्या लब्ध्वाऽसौ धन्यतामियात्‌।।*

जो हे श्रीरामपंचक स्तोत्र भक्तियुक्त अंतःकरणाने पठण
करेल तो भक्ति, ज्ञान, वैराग्य प्राप्त करुन धन्य होईल.

।।इति श्रीरामचन्द्रपंचकं सम्पूर्णम।।