श्रीमहालक्ष्मी स्तोत्र

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज रचित. 

मराठी गद्यानुवाद – श्री विनायक भगवान कानेगांवकर, ठाणे.
विशेष आभार – श्री श्रीधर बळवंत दीक्षित, पुणे.

सर्वसौभाग्यरूपा त्वं सर्वसम्पत्स्वरूपिणी । सर्वकल्याणरूपा त्वं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१॥

हे महालक्ष्मी तू सर्वसौभाग्यरूपा आहेस. सर्व संपत्ती हे तूझे स्वरूप आहेस तसेच तू सर्व कल्याण रूप आहेस. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

जनश्रीस्त्वं वनश्रीस्त्वं मङ्गलश्रीः स्वभावतः । ब्रह्मश्रीश्च मोक्षश्रीश्च महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥ २ ॥

तू स्वत: जनामधील व वनामधील मंगलकारी लक्ष्मी आहेस. तसेच ब्रह्मलक्ष्मी व मोक्षलक्ष्मी आहेस. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

शान्तिस्तुष्टिस्तथापुष्टिर्मेधा कीर्तिश्च सन्मतिः । दैवीसम्पत्स्वरूपा त्वं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥३॥

शांती, संतोष, सुदृढता, मेधा, किर्ती, सद्बुद्धी असे तूझे दैवी संपत्ती रूप आहे. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

मोक्षसाधनसम्पत्तिरायुरारोग्यसंसृतिः। सर्वैश्वर्यस्वरूपा त्वं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥४॥

तू मोक्षप्राप्तीच्या साधनेची तू शक्ती आहेस. तू आयुष्य आणि आरोग्य यांची जननी आहेस. सर्व प्रकारचे ऐश्र्वर्य हे तूझेच स्वरूप आहे. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

भक्तियोगा ब्रह्मनिष्ठा त्वमेवैकाखिलेश्वरी । तदैव ब्रह्मरूपा च महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥५॥

तू स्वत: भक्ती योग धारिणी आहेस, ब्रह्म निष्ठ, ब्रह्म रूप व एकमेव अधिष्ठात्री आहेस. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

सच्चिदानन्दरूपा त्वं जगन्माता जगत्पिता । विष्णुब्रह्ममहेशास्त्वं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥ ६ ॥

तू सच्चिदानंद रूप आहेस, जगाची माता-पिता तूच आहेस. ब्रह्मा, विष्णू महेश तूच आहेस. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

यतो हि जायते विश्वं यतश्च परिपाल्यते । यस्मिन् संलीयते ह्यन्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥७॥

जेथून विश्र्वोत्पत्ती होते, जेथे त्याचे परिपालन होते व जेथे ते शेवटी विलीन होते ती तूच आहेस. त्या महालक्ष्मी ला नमस्कार असो.

यच्च किञ्चित् सुष्ठुजातं यच्च किञ्चित् शुभं सुखम् । तदेवैकात्मरूपेण महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥८ ॥

जेथे जेथे थोडेसुद्धा उत्तम, शुभ व सौख्यकारी असे आहे तो तूझाच अंश आहे. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

वेदस्मृतिः सदाचार आत्मतुष्टिर्गुरोः कृपा । सर्वोपास्यस्वरूपा त्वं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥ ९ ॥

वेदस्मृती, सद्वर्तन, आत्मसंतोष व गुरू कृपा यांची उपासना स्वरूप तूच आहेस. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

वशमेवाद्वयं ब्रह्म नित्यानन्दैकमात्रतः । भेदबुद्धिमपास्यैवं महालक्ष्मि नमोऽस्त ते ॥१०॥

तू सच्चिदानंद, एकमेवाद्वितीय ब्रह्म आहेस. तू वेगवेगळ्या रूपात उपास्य आहेस. हे महालक्ष्मी तूला नमस्कार असो.

इति श्रीमहालक्ष्मीस्तोत्रं सम्पूर्ण
रचना स्थान : श्रीक्षेत्र वरदपुर संवत्सरः : १९७२