10257210_695520667150707_7636996586277868986_o
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांची प्रवचने

भक्तियोग

(PDF डाउनलोड)

 

सामान्यत: ‘भक्ति’ म्हणताक्षणीच परमात्म्याच्या ठिकाणी असणारे प्रेम, प्रीति असे समजले जाते.
‘सा परानुरुक्त्तिः ईश्वरे।’ अशी शास्त्रसूचना आहे. भक्ति म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी असणारी अत्याधिक प्रीति. परमात्म्याच्या ठायी असणारी सर्वातिशय प्रीतीच भक्ति. भक्तिचे लक्षण कोणते ? ‘परमप्रेमरूपा सा’ परमात्म्याच्या स्थानी असणारी परमप्रीतीच भक्ति. ‘अन्यस्मात् सौलभ्यं भक्तानाम् ।’ परमात्म्याची प्राप्ती करुन घ्यावयाच्या निरनिराळ्या साधनामध्ये ‘भक्ति’ हे अतिसुलभ साधन आहे असें नारदांचे म्हणणे आहे. मोक्षसाधनेसाठी ‘भक्तिरेव गरीयसी’ भक्ति हे अतिसुलभ असें साधन आहे. तें सोडून कठीण असणाऱ्या इतर साधनांचा कां बरें स्वीकार करावा? तसे केल्यास शेवटी आपण मुद्दामच आपल्यामागे कष्ट लावून घेतल्यासारखे होईल. सुलभ साधनाने अल्पकाल असणाऱ्या जीवनांत, इहलोकांतील आयुष्यांत शक्य तितक्या लवकर परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्यास जन्म सार्थक होणार नाहीं कां? जीवनाची कृतकृत्यता होणार नाहीं कां? कठीण अशा साधनानी परमात्म्याची प्राप्ती होईपर्यंत आपले जीवन, आपले आयुष्य शिल्लक तरी राहील का ? हेच संशयास्यद आहे. त्या दृष्टीने ‘भक्ति हें सुलभसाधन आहे’ असें सर्व महात्मे स्तुती करून सांगत असतांना विचारवंताना तेच साधन महान असें वाटणे साहजिकच आहे. भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायांत परमात्म्याने सगुणभक्तीला अत्यंत महत्व दिले आहे.
‘परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।’ (अध्याय १४ लोक १) मी आतापावेतों ज्ञानशास्त्रच सांगितले आहे. आतां तुला ह्यामध्ये गुह्यतर असें ज्ञान सांगतो. तूं माझा भक्त हो! ‘मय्येव मन आधत्स्व’ माझ्या ठिकाणी मन स्थिर कर. माझ्याठायींच निश्चय असू दे, म्हणजे कोणत्याहि प्रकारची अडचण किंवा कष्ट होणार नाहीत ‘याबद्दल कोणताहि संशय धरूं नकोस. मच्चित्तः सततं भव ।’. मम प्रसादात् —।’ आपल्या चित्तात मला सामावून घेणारास कोणतीच अडचण येणार नाही. कोणत्याहि कष्टांस तो बळी पडणार नाही. कोणत्याहि विघ्नातून तो विनासायास पार पडतो, असें भगवंतानी सांगितले आहे.
जीवनातील सर्व मार्गामध्ये विघ्ने आहेत, कष्ट आहेत, मोक्षाच्या मार्गात मात्र कष्ट नाहीत. तुमची सामान्य दिनचर्यासुद्धा कष्ट, दुःख, अनंत प्रकारच्या चिंता ह्यानी भरलेलो आहे. मनुष्य हा अत्यंत परतंत्र, अत्यंत दुर्बल, पराधीन व दीन झालेला आहे. त्यामुळे भगवंतानीं ‘ तुझें मन ज्ञानामध्ये रमत नसेल तर, तुझ्या मनात निश्चय निर्माण होत नसेल तर माझा भक्त हो! माझ्या प्रीतीसाठीच सर्व काही करून । मला संतुष्ट कर. तुझी ओढ मजकडेच असल्यावर तुला कोणत्याच प्रकारची चिंता नाही. मी प्रतिज्ञापूर्वक तुझी शपथ घेऊन सांगतो की, तूं माझ्यातच मन ठेवून माझ्या प्रेमाला, माझ्या कृपेला पात्र झालास तर तुला माझीच प्राप्ती होईल. मग तुला कांहीहि कमी नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठींच तुला काही करावयाचे असेल तर प्रीतिवश होऊन परमात्माच तुला अनुग्रहित करील असे सांगितले आहे. ह्या ज्ञानाने परमात्म्यांत ऐक्य होते व नंतर लगेच परमात्म्याची प्राप्तीच होते असे म्हटल्यानंतर भक्तीपेक्षा मोठे, महान असें काय असू शकेल ? परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम वाढून त्याने अनुग्रह केल्यावर तो आणखी देणार तरी काय? आपले ऐक्यच !! भक्तिगम्यः परमेश्वरः।’ भक्तीनेच परमात्मा वश होतो. परमात्मस्वरूपाची प्राप्ति परमात्म्यापासूनच व्हावयास हवी, नाही का? म्हणूनच परमात्मस्वरूपाची प्राप्ति करून घ्यावयाची असल्यास त्याची कृपा पण हवीच. परमात्मा आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणार असला तरी प्रीतीवर, भक्तीवर खूष होऊन, संतुष्ट होऊनच, नाही का? तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे मी हे गुपित सांगतो’ असेहि म्हटले आहे. अशा प्रकारे अनेक साधनानी युक्त अशी उपासना सांगितली असली तरी शेवटी सांगितलेली ती ‘भक्ति’ च. ‘यावान् यश्चास्मि’ भक्तीमुळेच परमात्मस्वरूप ओळखता येते. चित्ताचा एक स्वभाव आहे तुम्ही ज्याचें ध्यान कराल, ज्यामध्ये तुमचें चित्त एकाग्र होईल, समरस होईल, त्यानुसार तुमचें चित्त रूप धरते. विषयाचें ध्यान जास्त लागले तर तुमच्या डोळ्यासमोर विषयच उभे रहातील, नाही कां? स्त्री, विषय अथवा वस्त्र, दागदागिने म्हणा, ज्यामध्ये सुख आहे असे वाटते त्याचेच ध्यान तुमचें मन करील तर तेंच रूप मन धारण करते. परमात्म्याच्या ध्यानात तल्लीन होऊन त्याच्यांत एकरूप झालांत तर तुम्हीहि परमात्मस्वरूपीच व्हाल, नाहीं कां?

कोणत्याही गोष्टीला कारण हे असतेच. संकल्पानेच कोणतेहि कार्य होते. म्हणून संकल्पानेच परमात्म्याच्या संकल्पानेच सृष्टीची – उत्पत्ति, असे श्रुतीने सांगितले आहे. ‘एतावानस्य महिमा।’ सृष्टी परमात्म्यापासूनच उत्पन्न झाली असे म्हटले जात असल्याने सृष्टीतील सर्व वस्तूमध्ये, सर्व पदार्थामध्ये दिसून येणारे सुख परमात्म्यामुळेच निर्माण झालेले आहे. ह्या सर्व जगद्वस्तूमध्ये ज्याचे सुख केवळ अंशमात्रच दिसून येते तो परमात्मा सृष्टीतील सर्व सुखापेक्षा अनंत सुखरूप असाच आहे. त्या परमात्म्याचे आनंदरूप किती महान ! किती विशाल ! त्याचे वर्णन करण्यास वाणी, मन अपुरे पडले. मनाने ते सुख अनुभवावयाचे म्हटले तर मनच लहान ठरेल. मोठ्या पात्रात लहान भांड्यांचा समावेश होतो त्याप्रमाणेच परमात्म्याच्या अनंत सुखाच्या सावलीत इतर सर्व सुखे एकवटली आहेत.

पदार्थांची उत्पत्ती, निर्मिती मनापासूनच त्यामुळे मनाकडूनच त्यांच्या सुखाचा अनुभव होतो. अपार अशा परमात्मसुखात मन विलीन झाले असता ज्या दिव्य सुखाचा अनुभव प्राप्त होईल, तो बहिर्मुख असणारे मन वर्णन करू शकणार नाही. जगातील सर्व सुखांचा, सर्व पदार्थांचा एकाच वेळी अनुभव घेतला तरी त्या दिव्य आनंदाची बरोबरी करणारा आनंद सापडणार नाही, त्याची प्राप्तीहि होणार नाही. सर्व पदार्थांचा विचित्र शक्तीद्वारे अनुभव घेतलेला असला तरी तो सुद्धा ह्या दिव्यसुखाचे वर्णन करू शकणार नाही. ‘मुकास्वादनवत्’ न्यायाने मुक्याने साखर खाल्यावर तिच्या गोडीचे वर्णन करू शकत नाही त्याचप्रमाणे परमात्म्याचे सुख अनुभविलेले मन आपल्या स्वतःच्या आनंदातच तृप्त होऊन त्याचे वर्णन मात्र करू शकत नाही.

सामान्य सुख जसजसे अनुभवीत जावे तसतसा त्यात त्याचा तिटकारा, कंटाळा निर्माण होत जातो. पण परमात्मसुख हे केवळ सुखच. दु:ख निर्माण करणारे सुख ते विषयसुख; त्यामुळेच ते दुःखमिश्रित सुख. परमात्म्याच्या सुखात ती भेसळ नाही. ते जास्तीत जास्त आसक्ति प्रवृत्ति निर्माण करणारे ! विषयामध्ये तिटकारा का निर्माण होतो? तर ते दोषदृष्ट बनलेले आहेत म्हणून. सुखाच्या आशेने विषयांचा अनुभव घेतला तर ह्या विषयापासून सुख न मिळाल्यामुळे निराशाच पदरी पडते. सुखाची इच्छा निर्माण होते ती सुखाच्या संस्कारानेच, सुखाच्या अस्तित्वानेच. त्यामुळे ज्यात सुख नाही अशा वस्तूंचा अनुभव घेतला असता, त्यांना अनुभविले असता त्यांच्यामध्ये सुखाचा अनुभव न मिळता शेवटी दुःखच मात्र प्राप्त होते. अशा प्रकारे विषयांचा मूळ स्वभावच प्रगट झाल्यामुळे त्यांच्याबद्दल तिरस्कार, घृणा, तिटकाराच निर्माण होतो. ह्या दृष्टीने परमात्मसुख | कितीतरी महान, कितीतरी मोठे !!

भिंतीवर काढलेल्या चित्रातील पाणी प्याल्यास तप्ति प्राप्त होईल काय ? या उलट अमृतपानाने किती महान आनंद मिळेल ? परमात्म्याच्या सुखाबद्दल गुणाकार करा ! विषय लाभ भोगानी जेवढे सुख मिळते त्याहीपेक्षा कितीतरों महान, सांगता वा वर्णन करता न येणारे असे खरे खरे आत्मसुख प्राप्त होते, संतृप्ति होते ती परमात्मप्राप्ति होते तेव्हांच !!

‘यं लब्ध्वा पुमान् तृप्तो भवति’ जे सुख प्राप्त झाल्याने मनुष्य तृप्त होतो तेच परमात्मसुख ! त्या सुखानेच तृप्ती प्राप्त होते, निर्माण होते. ‘आत्मा रामो भवति’ भक्तींमुळे मनुष्य पुढे पुढे परमात्म्याचा आनंद आपणातच पहातो; त्यात एकत्व पावतो, त्या दिव्य आनंदातच सामावून जाऊन तो आनंदरूप होतो. ‘मामेवेष्वस्व’ तू मलाच प्राप्त करून घे! ‘मयि एव मन आधत्स्व’ तुझ्या प्रेमाचा, प्रीतीचा विषय मी एकमेवच असल्याने तू माझ्यात सामावून विरघळून जा ! म्हणजे काय ? आनंदातच विरघळवून जा, सामावून जा! आनंदरूप होणे हेच भक्तीचे फळ ! भक्तीमुळे परमात्मा प्रसन्न होऊन देत असलेले फळ म्हणजेच आपला स्वतःचा साक्षात्कार ! सायुज्य! ” मम माया दुरत्यया’ हे परमात्म्याचे एक रूप तर दुसरे म्हणजे जगात विभिन्न प्रकारची दु:खे आहेत त्या सर्वाना कारण झालेली, नको, नको म्हटले तरी दुःखात लोटणारी शक्ती ‘माया’. माहीत असूनहि समजून उमजून फसवणूक करणारी अशी ती मायाच ! असल्या बळजबरीने इच्छा नसलेल्या प्रकृती मध्ये असलेल्या शक्तीपासून, मायेपासून सुटका करून घेणे हे परमात्म्याच्या अनुग्रहानेंच साध्य ! मायेचे परिणामच होऊ नयेत अशी तुझी इच्छा असेल तर तु परमात्म्याचा आश्रय घे! परमात्म्याचे एक स्वरप व मायेचे एक स्वरूप. परमात्म्याचा भक्तीला मिळणारे बक्षीस कोणते? परमात्मा की माया? मायेमध्ये दुःख, चिंता, विस्मृति, परमात्म्यापासून वेगळे करणे ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा सन्निवेशात परमात्मा आपल्या भक्तांना जे देतो तें आपलें सायुज्यच ! सायज्यच दिले नाही तर परमात्मभक्ताचे कोणतें हित साधल्यासारखे होईल? आणि असे झाले तर परमात्मा वंचक झाल्याप्रमाणे होणार नाही का? भक्तासाठी क्षेमकर असणा-या रूपाखेरीज परमात्म्याचे दुसरें रुप नाही । असें म्हटल्यावर भक्ताचे हित साधण्यासाठी परमात्मा आपलें सायुज्य देण्याखेरीज इतर आणखी काय देणार? म्हणूनच भक्तांसाठी परमात्म्याने राखून ठेवले असे काही असेल तर तें आपलें ऐक्यच! असें सुंदर ऐक्य प्राप्त करावयाचे, संपादन करावयाचे असल्यास अपण परमात्म्याच्या कृपेला, पसंतीला पात्र व्हावयास हवे. नाही का?

मायेमध्ये लोळत राहिल्यास जीव तिच्यातच ऐक्य पावतो. ‘यच्चित्तः तन्मयो भवति ।’ तुम्ही ज्या कोणाचा आश्रय घ्याल त्याचाच स्वभाव तुमच्यामध्ये निर्माण होतो हे अगदी सामान्य, सहज लक्षण आहे. दुःखाचा आश्रय घेतल्यास दु:खाची प्राप्ती होईल मुक्तपणे सांगता येईल. त्याचप्रमाणे सुखाचाच आश्रय घेतल्यास सुखाचीच प्राप्ती होईल. मग ह्या दोघापैकी कोणाचा आश्रय घ्यावा? असा एक प्रश्न तुमच्यापुढे ठेवितो. परमात्मा व माया असे दोनच विभाग. परमात्मा दिव्यरूप आहे. तो सोडल्यास बाकीचे सर्व मायरूपच, झालें संपले. ह्याच्या विरहित कांही नाही. ह्याच्यामध्ये सुख असे म्हटल्यानंतर तेच तुम्ही कां मिळवू नये? मायेमुळेच स्फुरण, शक्ती, अज्ञान ही उत्पन्न होतात. असे असल्यामुळे सुखरूपी अशा परमात्म्याचा आश्रय न घेता आपण दुःखरुप अशा मायेचा, क्षणोक्षणी दुःख देणाऱ्या विषयांचाच आश्रय घेतो. ह्या सर्वाला खऱ्या सुखाबाबतचे अज्ञानच कारणीभूत असते, परमात्मा हा सुखरुप, सर्वज्ञ आहे हे सर्वांना माहीत आहे. तरीहि ‘देवासाठी त्याग करावयाचा’ हे मात्र पटत नाही. देवाला नवस केला जातो पण त्याची पूर्तता करण्याची वेळ आली की, आपणच बुद्धिमान असे समजून परमात्म्यालाच आपण फसवतो. देवासाठी दिलेले पैसे देवालयाचे उत्पन्नाचे पैसे खाणारे कितीतरी महाभाग आहेत ! आपल्या बायकामुलासाठी सर्वजण दागदागिने करतात. पण देवस्थान बांधण्यासाठी किती जण पैसे देतात ? देवासाठी कष्ट करणारे किती जण आहेत ? परमात्मा हा सर्वापेक्षा महान. भक्तीही तशीच महान असली तरच परमात्मप्राप्ती होईल.

अल्पत्यागयुक्त भक्तीमुळे परमात्मा संतुष्ट होणार नाही, प्रसन्न होणार नाही. पण सर्ववस्तूपेक्षा अधिक असणाऱ्या  प्रेमामुळे मात्र तो सतुष्ट होईल, खुश होईल. आपण इतके सर्व प्रकारचे प्रेम करूनहि परमात्मा आपल्याला का प्रसन्न होत नाही? आपल्या हाकेस कां बरे ‘ओ’ देत नाही? तर द्रौपदीप्रमाणे, गजेंद्राप्रमाणे आपण त्यास हांक मारीत नाही म्हणूनच अत्यंत कळवळ्याने, अंतःकरणपूर्वक बोलाविल्यास तो येईलच येईल, तो आला नाही तर तुम्ही त्यास जसे बोलवावयास पाहिजे तसे बोलविलें नाही असेच पाहिजे. परमात्म्याच्या ठिकाणी तुमचे किती प्रेम आहे ? परमात्म्यासाठी तुम्ही किती निरलसपणे श्रम करतां? त्याच्यासाठी किती स्वार्थत्याग करतां? याचा विचार करा !

परमात्मा तुमच्या बुद्धीला प्रेरणा देणारा म्हणजेच बुद्धिप्रेरक आहे. मनांत विवार उत्पन्न झाल्यानंतर ते तुम्हाला समजून येतात नाही का? पण तुमच्या अगोदरच ते विचार परमात्म्याला समजतात, तो तुमच्या मनाच्या तळाशीच असतो. देवाच्या ठिकाणी अनन्यता असणारे किती लोक ह्या जगात आहेत ? अगदीच थोडे. हे भक्तीचे लक्षण नव्हे, ‘सा परानुरक्तिः’ भक्ति म्हणजे पराप्रीति. परमात्म्याला काय देऊ ? त्याच्यासाठी काय करूं? प्राणच देऊ कां? त्याच्या चरणकमलावर शरीरच अर्पण करू का? पर्वतावरून खाली उडी घेऊ कां ? अथवा शरीराचे तुकडे तुकडे करूं? सर्वच तुच्छ. परमात्म्याच्या ठायी असलेले प्रेम कोणत्याही साधनाने, विधानाने दाखविले तरी ते योग्यच आहे असे वाटतच नाही, असे म्हणणारा जो खरा भक्त आहे तोच प्रेमासाठी आतुर व कासाविस होत असतो. प्रेमाचा अनुभव असणाऱ्यालाच ते माहीत ! ! ‘तदपिता चारिता’ असे भक्तीचे लक्षण सांगितले आहे, सर्व काही करावयाचे ते त्याच्या प्रीतीसाठी; सर्व काही त्यालाच समर्पण केल्यास प्रीतीला वेगळा विषयच नसल्यासारखे होईल. परमात्म्याच्या आनंदाशिवाय किंवा आनंदास सोडून राहू न शकणाराच भक्त. ‘तद्विस्मरणे परम व्याकुलता।’ त्या आनंदरूपाला सोडून मन दुसरीकडे गेल्यास अत्यंतिक व्याकुलता उत्पन्न होते. परमात्म्यावरील प्रेमामुळे परमात्म्याच्या दर्शनासाठी वेडे झालेल्या भक्ताग्रणींना पाहिल्यावर इतरांना ‘त्याला वेड लागले आहे’ असे वाटते. पण तो असतो प्रितीचा भाव ! प्रेमाचा उमाळा ! त्याची समाधी क्षणाक्षणाला लागते. परमात्म्याचो स्मृतीच त्याचे संपूर्ण चित्त व्यापून त्या स्मृतीने जगणेच त्याला सुखप्रद वाटते. परमात्म्याचा कथालाप, भजन, कीर्तन इत्यादीमध्ये वेळ घालवणेच त्यांना प्रितीचा विषय वाटतो. सदा सर्वदा एकच चितन! आभासमान होणा-या अशा अनुभवाने प्राप्त न होणान्या गोष्टींचा अनुभव घेतला तरी त्यांत सुख नाही. ज्याच्यापासून अखंड सुख निर्माण होत नाही अशा संसारांत केव्हांहि परिश्रमाचाच त्रास होतो. परमात्मा आनंदरूपी आहे. त्याच्याठायीं तुम्हास प्रेम निर्माण झाल्यास त्याचेच ध्यान तुम्हास लागेल व तुमच्या अंतःकरणांत त्याचा पाया सहजच रोवला जाईल. चित्त हे नेहमी प्रीतीच्या विषयाचेच चिंतन करीत असते. चित्तांत विषयस्मरण निर्माण झाले तर विषयच तुमच्यामध्ये निर्माण होतील. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या ठायीं तुमची प्रीती वाढली तर आपोआपच त्याचें ध्यान साधणे, सिद्ध होणे साहजिकच !

भक्तीमध्ये ‘गौण’ व ‘परा’ असे दोन प्रकार आहेत. गौणभक्ति साधनरूप व पराभक्ति साध्यरूप होय. जन्मास आलेल्या प्रत्येकाचे मन साधारणपणे विषयाकडेंच ओढले जात असते. इंद्रिये ही बहिर्मुख आहेत. मनसुद्धा बाह्य विषयामध्ये गुरफटणारे व त्याच्याकडेच जाणारे आहे. विषयापासूनच देहाची उत्पत्ति. तेव्हा ह्या देहाचे लक्षण, पावित्र्य ह्याचा विचार केल्यास किती सुख होईल तें पहा ! परमात्मा खरोखरच प्रकाशमान झाला नसता, परमात्मसुखाचा अनुभव झाला नसता तर विषयापासूनच जगले पाहिजे असे होऊन तुम्ही कोणी एक क्षणहि जगू शकला नसता. पण कोणत्या तरी प्रकाराने सर्व जगद्वस्तूंत अदृश्यपणे वास करणा-या परमात्म्याचे सुख न समजतांहि अनुभवून त्या सुखाच्या ओलाव्यानेच तुम्ही जगला आहांत. डोळ्यांना दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रकाशाद्वारे जशीच्या तशी गोचर होणारी सर्व सुखें परमात्म्याच्या आनंदाच्या मार्गामुळेच ! त्यामुळे जे सुख तुमच्या जीवनाला कारण झालेलें आहे तें सुख

तात्पर्य, परमात्मा सत्यानंदरूपी असल्याने त्या सत्यस्वरूपी परमात्म्याच्या प्रकाशाच्या योगाने तुम्ही आपले जीवन जगत असतांना परमात्म्याच्याच सहाय्याने तुमच्या सर्वांचे जीवन सुरळीत चालेल.

इतिशम्।

॥ श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

भजस्वमाम्

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्वमाम्’ ‘असारे इह संसारे सारमेकं हरेः पदम् !’

असार असलेल्या ह्या संसारांत श्रीहरिचरणयुगलांच्या ठिकाणी निष्काम भक्ति असणे ही एक साररूप गोष्ट आहे. तीमुळे नराचा नारायण होतो. आपणांस ज्याचा कंटाळा येत नाही असा एकहि पदार्थ ह्या जगांत नाही. आपणांस उपभोग्य वस्तूंची प्राप्ति होत असतां व उपभोग घेतल्यानंतरहि कोणतें ना कोणतें दुःख निर्माण केलें नाहीं असा कोणताहि उपभोग नाही. आपल्या देहाइतका किळसवाणा असा दुसरा कोणताहि पदार्थ नाही. मानवदेह हा अत्यंत किळस आणणारा आहे. आपलाच काय किंवा इतरांचा काय, सर्व मनुष्यमात्रांचा देह हा किळसवाण्या पदार्थांचे आगरच होय. अशा देहामुळे तिरस्कार उत्पन्न न करणाऱ्या कोणत्या सुखाचा उपभोग घेता येईल ? अर्थात कोणत्याहि सुखाचा उपभोग घेता येणार नाही. ह्या देहाने उपभोगिल्यानंतर कंटाळा न आणणारा असा जो कोणता पदार्थ असेल तर ते फक्त हरिचरणारविंदच होत. तें सुख म्हणजे फक्त हरिचरणारविंदसुखच. तें सुख अनुभवित असतां देहभान रहात नाही. ह्या उत्कट भक्तीमुळे उत्पन्न होणारे सर्वार्षिक सुख होय. परमात्मा निरवधि आनंदरूप असल्याने त्यापासून मिळणारा आनंदहि तसाच निरवधि आनंदस्वरूप असतो. सातिशय पदार्थांचे सुख सोडून ह्या निरतिशय सुखासाठी यत्न करण्यानेच ह्या मनुष्यजन्माचें सार्थक होतें. जगांतील सर्व सुखे दुःख, भय, शोक, चिंता, कंटाळा, अपूर्णता, अनुकूल मनप्रवृत्ति, देशकाल, वस्तूंचे सापेक्ष व इत्यादींनी परिपूर्ण आहेत. ह्यांच्या अगदी उलट जें सुख तेंच परमात्मसुख. तें सर्वनिरपेक्ष, स्वयंसिद्ध, अखिल दुःखरहित, शोकशून्य, निर्भय, चिंता न करणारे उलट चिंता दूर करणारे आहे.

समासक्तं यथा चित्तं जंतोविषयगोचरे। यद्येवं ब्रह्मणिस्यात् कोन मुच्येत बन्धनात् ॥’

आपण विषयावर जेवढी प्रीती करतो तेवढीच प्रीती देवाच्या ठिकाणी केल्यास विषयचिंतना इतकेंच भगवत् चिंतन केले तर, विषयांत जेवढी आसक्ति ठेवतो तितकीच आसक्ति भगवंताच्या ठायी ठेवल्यास कोण बरें मुक्त होणार नाही? कोणाचे भवबंधन आपोआप नाहीसे होणार नाहीं? भगवंताची भक्ति करण्यासाठी इतर कोणत्याच विशिष्ट अभ्यासाची आवश्यकता नाही. देहास आवश्यक वाटणारे पदार्थजन्य सुख हे सुख नसून दुःखच होय. वारंवार कितीहि उपभोग घेतला तरी आतापावेतो कोणासहि त्यांपासून तृप्ति किंवा समाधान प्राप्त झाले नाही. त्याच्यामध्ये सुख नसतांना तें सुख आहे असे मानून विषयांचा कितीहि उपभोग घेतला तरी मुळांतच तें दुःखरूप असल्याने शेवटी त्यापासून एका दुःखाशिवाय आणखी दुसरे काय पदरांत पडणार? तसेंच त्यामुळे कोणतें भाग्य लाभणार ? “सुखं स्वप्नेऽपि दुर्लभम।। विषयभोगापासून स्वप्नांतहि सुख लाभणे दुर्लभच. ह्या गोष्टींची अनुभवानें परीक्षा घेतली गेली आहे. शीतावरून भाताची परीक्षा करताना ना तसेंच. अन्य पदार्थामुळे अन्य इंद्रियांमुळे अन्य इंद्रियांमुळे स्वत:च्या देहेंद्रियामुळे होणारे सुख विषयसुखच असल्याने विषयसुखाचें एक सर्वसामान्य लक्षण पाहिले तर ह्या भूलोकांतच नव्हे तर स्वर्गलोकींच्या सुखाचाहि त्यांत अंतर्भाव होतो. कोणत्याहि एका खाण्यापिण्याच्या पदार्थांचे सुख पहा ! सर्वच पदार्थ तिरस्कार उत्पन्न करतात असें आपणास म्हणावे लागेल. देहाकरता एखाद्या गोष्टीची इच्छा उत्पन्न झाली तर सर्व देहाचीच इच्छा उत्पन्न होईल असें आपणास मानावें लागल. अशा एखाद्या व्यक्तीच्या तोंडाची दुर्गंधी येऊन मन विटून गेलें तर त्यायोगें इतर सर्व इंद्रियांचा तिरस्कार कमी जास्त प्रमाणांत येईल, असे गृहित धरावे लागेल. देहेंद्रियांच्या सभोगाने दु:ख होते, असा एक नियम ठरल्यावर कोणताहि देह असो वा परलोकी असो, सर्व ठिकाणी तें दुःखरूपीच आहे असे सिद्ध होतें. दृग्गोचर होणारें देह, इंद्रिये आदि जगांतील पदार्थ. ह्याना निजसुख नाही असे म्हटल्यावर जगाच्या कणाकणांत असूनहि जगाच्या बाहेर असणारा श्रीहरीच एकमेव ‘ सुखरूप ‘ आहे. ‘सुखमय’ आहे असें ठरते. सुखासाठी आपण त्याचाच आश्रय घेतला तर सुख मिळेलच मिळेल. जगांतील दृश्य पदार्थाचा कितीहि उपभोग घेतला तरी त्यापासून सुख मिळत नाही ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. जन्मलेल्यास मृत्यु हा आहेच. उत्पन्न होऊन नष्ट झालेल्या पदार्थात सुख आहे असें एकदा म्हटले तरी तेंहि भासमान होऊन नष्ट होत असल्याचेच स्पष्ट होते. तेव्हां असें नष्ट होणारे सुख तें सुख नव्हेच. सुखच नष्ट झाल्यावर मग दुसरे काय साध्य होणार? दु:ख नष्ट व्हावें, सुखाचा नाश होऊ नये. असेच आपल्याला वाटत असते. दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्यावर ते नष्ट केल्याचा अनुभव आपणास असल्यामुळे दुःखास नाश आहेच ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते. ह्या विधानामुळे उत्पन्न होऊन नष्ट होणारे पदार्थ दुःखरूपी असल्याकारणाने त्यांच्या उपभोगाने दुःखच प्राप्त होणार हे कोणालाहि समजल्यासारखे आहे. उत्पन्न होऊन नष्ट होणे’ हे दुःखाचे लक्षण असल्याने त्याविरुद्ध सुख म्हणजेच उत्पत्तिनाशरहित, नित्य, अखंड असून केव्हांहि कोणत्याहि विकाराने नष्ट न होणे ही सुखाची लक्षणे होत. उत्पत्तिनाशरहितच सुख. उत्पत्ति-नाश असणाऱ्या देहेंद्रिय, पदार्थ, क्रिया इत्यादींनी प्राप्त होण्यासाठी धडपडणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच नाहीं काय ? उत्पत्ति-नाश-शून्य सुख, उत्पत्तिनाश ह्यांनी परिपूर्ण भरून असलेल्या देहेंद्रियादि पदार्थांनी मिळवू, प्राप्त करूं असें म्हटल्यास दु:खापासून सुख अनुभवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणेच ठरतें; दुःखासच सुख समजल्यासारखें होतें. ज्याचे त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत असें जरी मानले तरी ते आपण मानल्यासारखें न ठरतां त्याच्या अनुभवाने त्याच्या यथार्थरूपाचा आपणास अनुभव येतो. अशा प्रकारे दुःखास सुख म्हणून अथवा उत्पत्तिनाश असणान्या जीव पदार्थामध्ये आपण तें कितीहि सुखदायक म्हणून इच्छा करून, जगोत्पत्तीपासून जगाच्या अंतापर्यंत पूर्णपणे त्यांचा अनुभव घेतला तरी त्यापासून शेवटी आपणास प्राप्त होणार ते फक्त दुःखच !!

कार्य म्हणजे झालेलें. झालेले म्हणजे कोणत्यातरी वस्तूपासून उद्भवलेलें, जन्मलेलें. ज्याच्यामुळे तें जन्मलें तें त्याचे कारण होय व जें जन्माला आले तें कार्य. उत्पन्न होतांना, उत्पन्न झाल्यानंतर व उत्पन्न होऊन नष्ट झाल्यानंतरहि सत्तारूपाने त्याचे कारण रहात असल्यामुळे कारण हे उत्पत्ती, स्थिति व नाश यांनी शून्यच असतें हैं सिद्ध होते. कार्य उत्पन्न होत असतां त्यास आधाररूप असलेले कारण, कार्योत्पत्ति नंतर तें टिकविण्याकरता त्यास रहावे लागते. तसेंच तें कार्य लय पावत असतांनासुद्धा त्यास आधाररूपानें कारण असावें लागते. अशा प्रकारे कार्याची उत्पत्ति, स्थिति व लय ह्या तिन्ही काळी कारण अस्तित्वात असल्यामुळे तें अविनाशी आहे असेंच म्हणता येईल. जड असणारे कार्य आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या चैतन्यरूपी कारणापासून निर्माण होत असल्यामुळे कार्याला स्वत:ची स्वत:वरच सत्ता नाही अशा प्रकारचे त्यास अस्तित्व असतें, तसेंच लय पावणे हे सुद्धा आपल्या कारणरूप असलेल्या चैतन्यामुळेच घडते हे सुद्धा स्वतःच्या अधिकाराने घडत नाहीं हेंहि आतां सिद्ध होत नाहीं काय? कार्य व कारण हे दोनच विभाग आहेत. कार्य हे उत्पत्ति, स्थिति व लय यांनी युक्त आहे तर कारण हे उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांनी रहित आहे असें सिद्ध झाल्यावर कारण हेच मुख्य ठरते. कार्य दुःखरूपी आहे हे सिद्ध झाल्यावर कारण हेच एकमेव आनंदरूप आहे हे सिद्ध होते. चैतन्यरूपी परमात्मा जड अशा कार्यापासून जन्मला की चैतन्यरूप परमात्म्यापासून जड अशा कार्याचा जन्म झाला? परमात्म्यापासून कार्य जन्मले असल्याने परमात्माच कारण ठरतो. कारण हे सुखरूप असल्यामुळे परमात्माच एकमेव सुखस्वरूप आहे हे सिद्ध होते. परमात्म्यास किंवा परमात्मस्वरूप सुखास उत्पत्ति, स्थिति, लय आहे असे म्हटल्यास परमात्म्यापासून प्राप्त होणारे सुख सुद्धा कार्यात सामावून कारण हे एक वेगळेच असेल. त्यालाहि कार्य म्हणून म्हटले तर कशाला तरी कारण म्हणून गृहित धरावे लागेल. अशाप्रकारे प्रलयकालापर्यंत आपण गृहित धरू लागलों तरी तें संपणार नाही. तें अनवस्य दोष म्हणून सांगण्यांत आल्यामुळे कारणरूप असलेल्या परमात्म्यास किंवा त्याच्या रूपसुखास उत्पत्ति, स्थिति व नाश नाही ही गोष्ट खरी आहे, सत्य आहे. त्याची प्राप्ती करून घ्यावयाची असल्यास त्यालाच, त्या परमात्म्यालाच शरण गेले पाहिजे. ह्याशिवाय कार्यात समावेश होणाऱ्या उत्पत्तिस्थिति-लयानी समाधिष्ठित असलेल्या इतर कोणत्याहि पदार्थ, प्राणी यांना शरण गेलो तर शाश्वत सुख मिळणार नाही हे स्पष्ट असल्यामुळे अनित्य आणि दुःखरूपी अशा ह्या लोकांत तुम्ही जन्मला असतां ह्यास सुख असे गृहित न धरतां, सुखासाठी हे प्राप्त न करतां ‘मीच सुख आहे’ असे गृहित धरून सुखासाठी माझी प्राप्ती करून घे असें श्रीकृष्ण भगवानानी सांगितले आहे.

परमात्मसुख अथवा खरें सुख कसे मिळवावें ? याचा आतां विचार करूया ! कारण म्हणजे सुख. कार्य म्हणजे दुःख याप्रकारे जगांत कार्यकारण, दु:ख-सुख ह्या दोनच गोष्टी आहेत. या खेरीज तिसरी गोष्ट नाहीं असेंच यावरून ठरते. आपण कार्य झालो तर दुःखरूपी होऊ व कारण झालों तर सुखरूप होऊ. सुखाची प्राप्ती करून घ्यावयाची म्हणजे आपण स्वतःच सुखरूप झाले पाहिजे; असाच अर्थ होतो. आपण ‘सुखरूप’ व्हावयाचे म्हणजे ‘सुखरूप ‘ असा परमात्माच आपल्या स्वरूपांत आहे असें जाणावें. आनंदरूपच आपलें रूप आणि बाकी सर्व कार्य दुःखरूप म्हटल्यावर सुखास, आनंदास दुःखाची इच्छा नसल्याने आनंदरूपी असलेल्या आपणास दुःखाची म्हणजे कार्याच्या कार्यात समाधिष्ठित असलेल्या कोणत्याहि जीव वा पदार्थाची इच्छा होणें असंभवनीय आहे असेंच ठरेल व आनंदामध्ये दुःख नसल्यामुळे आनंदरूप अशा आपणांत दुःखरूप असणारे कार्य नाही असाच त्यांतून अर्थ निघतो. कार्यरहित असें कारणच आपण आहोत असें ठरल्यावर दुसरें दुःख नसून आपण सर्वजण एकमेव आनंदरूपी ब्रह्मतत्त्व आहोत असे स्पष्ट होते. दुसरे काही नाही असे म्हटल्यावर दुसरा कोणताहि विचार किंवा इच्छा भोग-भोग्या आणि भोक्तृभाव आपणास नाही असाच अर्थ निघतो. कार्य जडरूप असल्याने व कार्य केवळ कारणरूप असल्याने आपणांस दुसऱ्या कोणत्याहि प्रकारची भावनाहि नसल्याने आपण एक आनंदरूप अन्यनिरपेक्षित असल्यामुळे एका आनंदरूपाची निष्ठाच त्या निर्विकल्प आनंदरूपामुळे खऱ्या आनदाची किंवा ब्रह्मारूपी परमात्म्याची नित्य प्राप्ती झाली असें वाटणार नाही का?

‘सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’

॥ श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

भक्ति

प्रवचन १

परमेश्वराची भक्ति व वात्सल्य अगाध आहे. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवूनच वागतो नाहीं कां? सर्वांचा रक्षणकर्ता तो परमात्माच होय. त्याच्याशिवाय इतर कोण असणार? आपले कोणीतरी रक्षक आहेत, असे वाटत असले तरी त्याचेंहि रक्षण करणारा जर कोणी असेल तर तो परमात्माच. परमात्म्याएवढे बलवान दुसरे कोण आहे ? तो एकमेव सर्वसमर्थ आहे. तो आपली कालापासूनहि सुटका करतो असें म्हटल्यावर तेथें मनुष्याचा काय पाड? मनुष्याची काय किमत ? त्याची कृपा संपादन केल्यावर जगात दूसरें कोणते अगम्य व अगाध आहे ? तो राजांचा राजा, मालकांचा मालक, देवांचाहि देव आहे. त्याच्यापेक्षां वरिष्ठ असे दुसरें कोण आहे ? त्याच्या शक्तीनेच सूर्य वेळेवर उगवतो आणि योग्यवेळी मावळतो; इंद्र पाऊस पाडतो; यम आपली कामें बिनचूक करतो, अग्नि जाळण्याचें काम करतो; जमीन कोणताहि आधार नसतां पाण्यावर तरंगते; एका बीजापासून अंकुर फुटून त्याचा मोठा वृक्ष होतो; शिशूची गर्भात वाढ होते व मातेच्या स्तनांतून दूध येते. हे सर्व करणारा तो परमात्माच नव्हे का? मोरास रंग देणारा कोण ? कोकिळेस गोड गळा देणारे कोण? तन्हेत-हेची फुलें निर्माण करून त्यांत सुवास उत्पन्न करणारा कोण? विभिन्न फळे निर्मून त्यांत अमृतरूपी गोड रस भरून ठेवणारा कोण? मनुष्यास बोलण्याचो शक्ति देणारा कोण ? एवढ्याशा लहान असणान्या डोळ्याच्या बाहुलींत एवढे मोठे दृश्य कोणामुळे दिसतें ? देहांतच आपल्याला सर्वकाही समजण्याची शक्ति देणारा कोण? ही सर्व त्या परमात्म्याची शक्ति नाही का?

एक देव सोडल्यास ह्या जगांत कोण कोणाचा आहे ? बालकास जन्म देऊन माता मरण पावल्यावर त्या बालकाचे संगोपन करण्याची बुद्धी देवच इतरांना देऊन त्याचे संगोपन करवीत नाहीं कां? जग निर्माण करून त्याचे संरक्षण करून व शेवटी त्याचा लय करणारा देव नसून दुसरे कोण आहे ? समुद्रास मर्यादा घालून सीमा बांधून देणारा तो परमात्माच नव्हे काय ? इतर कोणाचे म्हणणे समुद्र ऐकेल ? परमात्म्याचे शासन नसते तर पृथ्वी कधीच पाण्यात विरघळून गेली असती नाहीं कां ? मनुष्य आपण स्वतःच कांही करू शकत नाही. त्याचे तोंड त्यालाच दिसत नाही तसेच त्याची पाठहि त्यास दिसत नाही. देहामधील व्यवहार त्यास समजत नाहीत. एखाद्या लहान दगडाची ठेच लागली तर झाड मोडून पडल्याप्रमाणे तो अडखळून खाली पडतो. अशा प्रसंगी त्याचे रक्षण करणारा कोण ? मेल्या त्याच्या पापपुण्याचा विचार करून त्यास सद्गति किंवा दुर्गति देणार कोण ? राजाला किंवा लहानशा अधिकाऱ्याला आपण भिऊन वागतो मग आपण देवास किती भिऊन वागले पाहिजे बरें? राजा अधिकारी यांच्यासमोर किती विनयाने वाकून, नमून आपण वागतो। मग देवासमोर किती विनयाने व नम्रतेने वागावयास पाहिजे बरें! एखाद्या सावकाराचा आपणास फार मोठा आधार आहे असे आपण म्हणतो. मग देवाचा आपणास किती आधार वाटावयास हवा? आपल्यास जन्म देणाऱ्या, आपल्या जन्मास कारणीभूत असून आपले पालन-पोषण करणाऱ्या आपल्या आईवडिलांवर आपलें जेवढे प्रेम असते त्यापेक्षां परमात्म्यावर आपलें किती प्रेम असावें बरें!

श्रीनारदांनी ‘अथातो भक्ति व्याख्यास्यामः’ असें म्हणून भक्तीचें । लक्षण सांगितले आहे. ‘सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपा च ।। परमात्म्याच्या ठिकाणी अचल व अतिशय असणाऱ्या प्रेमासच भक्ति असें म्हणतात. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो | भवति ।‘ जें प्राप्त झाल्याने मनुष्य सिद्ध, अमर आणि तृप्त होतो तीच भक्त्ति. तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तींवर प्रेम करण्याचे माहित आहे, परमात्मा सर्वांहूनहि जास्त प्रीतिपात्र आहे. तेव्हा दुसरीकडे वाहाणारे तुमचे प्रेम ह्या बाजूने वहावयास हवे. नुकतेच लग्न झालेल्या पतिपत्नीमधील प्रेमाप्रमाणे प्रेम आणि खाण्यापिण्याच्या पदार्थावरील लक्ष्य जर परमात्म्याकडे लागले तर तो मानव जीवनमुक्त होईल. त्यासाठी निराळा खटाटोप करण्याची गरज नाही.

श्रीमद्भागवतामध्ये भक्तीचे नऊ प्रकार दिले आहेत. ‘श्रवणं कीर्तनं विष्णोःस्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् ॥’ भगवंताच्या लीलेचे वर्णन ऐकणे व ऐकलेलें तितक्याच प्रेमाने इतरांना ऐकवणे म्हणजेच ‘श्रवण व कीर्तन’. सतत नामस्मरण करीत असणे, ह्यालाच ‘स्मरण’ भक्ति म्हणतात. श्रीगुरुची चरणसेवा करण्यासच पादसेवन’, पूजा करण्यास ‘अर्चन’ व नमस्कार करण्यास ‘वंदन’ असे म्हणतात. श्रीगुरुची व देवाची निःस्वार्थपणे सेवा करणे हैं ‘दास्य’ होय. आपले मित्र, आई, वडील, इष्ट, बंधु ह्यांच्यापुढे आपण आपलें अंतःकरण मोकळे करतो त्याप्रमाणे परमात्म्यासमोय आपले अन्तःकरण उघडे करणे हे सख्य व परमात्म्यास सर्वस्व अर्पण करणे म्हणजेच ‘आत्मनिवेदन’ होय. अशा ह्या नऊ प्रकारच्या भक्तींना ‘ नवविधाभक्ति’ असें नांव आहे. ह्यापैकी एक किंवा सर्व प्रकारच्या भक्ति करून आपण धन्य झाले पाहिजे.

‘सकीय॑मानः शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयिति भक्तान् ।’

अशा त-हेनें परमात्मा प्रसन्न होण्यासाठी त्याची भक्ति केल्याने, त्याची स्तुतिस्तोत्रं, ध्यान, जप, अखंड आचरल्यास शीघ्र आविर्भूत होऊन तो परमात्मा भक्तावर अनुग्रह करतो. परमात्म्याची भक्ति करून त्याच्या संपूर्ण कृपेस पात्र झाल्यास तें महत्तम भाग्य होय. अशा प्रकारें परमात्मकृपापात्र होण्याचे भाग्य तुम्हा सर्वांस लाभो अशी भगवंतचरणी प्रार्थना करतो.

ॐ तत्सत्

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥ श्रीराम समर्थ ॥

भक्ति

प्रवचन २

‘स्वस्ति’

आज मी भक्तीसंबंधी सांगणार आहे.

मनुष्यप्राण्याचा उद्देश अनंतसुखाची प्राप्ती करून घेण्याचा असतो. व तो साध्य करण्यासाठी त्याचे नाना प्रकारचे प्रयत्न चालं असतात. परंतु आपले साध्य काय? आपले ध्येय काय? हे निश्चितपणे ठरविल्याशिवाय केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. अशा प्रयत्नांचें फळ म्हणजे निराशा, अशांति, मनुष्याची अशी दुरावस्था होऊ नये आणि त्यांचे जीवनसाध्य न चुकतां तो सुखाच्या मार्गात जाण्यासाठी श्रुतिमातेने तीन मार्ग सांगितले आहेत. त्यानाच आपण योग म्हणतो आणि त्या योगांपैकी भक्ति’ हा एक योग आहे.

भक्ति करणे आणि ती साधणे कठीण नाही. कारण भक्ति म्हणजे प्रेम व प्रेम करणे म्हणजे भक्ति. भक्तीचे रूप म्हणजेच प्रेम असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या रूपांत भक्ति किंवा प्रेम माहित नसलेले किती जण मिळतील? त्याचा अनुभव नसलेले किती आढळतील?

भक्ति व प्रेम तात्त्विक दृष्टया एक असूनहि मानवकल्याणार्थ झटणाऱ्या ऋषिमुनींनी त्याची पार्श्वभूमी सांगून त्याचे स्पष्टिकरण केले आहे.

१) आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्या मनुष्यांवर आपण जी प्रीति करतो ती भक्ति नव्हे. उदाहरणार्थ, मित्रावरील प्रेमास स्नेह म्हणतात व मुलावरील प्रेमाला वात्सल्य म्हणतात. याला मित्रभक्ति अथवा पुत्रभक्ति असे कोणीहि म्हणत नाही.

समाजशिकामा गणग २) आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारा या ठिकाणी असलेल्या प्रेमास ‘भक्ति’ हे नांव योग्य ठरते. मुलांना आपले आईवडील श्रेष्ठच. ते आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या मुलांचे आपलेपणाने व त्यागयुक्त प्रेमाने संगोपन करतात, त्यामुळे मुलांना श्रेष्ठतेची कल्पना प्रथमच प्राप्त होते. आईवडिलांवर असणाऱ्या मुलांच्या ह्या नैसर्गिक प्रेमाला मातृ-पितृ-भक्ति असेच म्हणतात. श्रीसद्गुरु आपल्या शिष्यांना व्यावहारिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असें दिव्य ज्ञान देत असतात. शिष्याचे अज्ञान घालवून, त्यांचे संकुचित विचार नाहीसे करून, त्यांच्या हृदयाची विशालता वाढवून पवित्र ज्ञान देतात. अनंत उपकाराच्या कृतज्ञतेच्या त्यांच्या प्रीतीलाच ‘गुरुभक्ति ‘ म्हणतात. याप्रमाणेच देशभक्ति. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ! हे सुभाषित यामुळेच प्रसिद्ध आहे. आपल्या हृदयांतील सात्त्विक अशा विशाल अभिमानाची अभिरुची देत असल्यामुळे, तसेंच आपल्या जीवनास नाना प्रकारचे सहयोग देत असल्याकारणाने देश किंवा आपले जन्मदाते आपल्यापेक्षा श्रेष्ठ होत व त्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रेमालाच ‘भक्ति’ हे नांव आहे. अशा ह्या भक्तीच्या स्वरूपांत किंचितहि कमीपणा येऊ नये म्हणून व भक्तीचे महत्त्व कायम समजण्यासाठी श्रुतिमातेचा सल्ला आहे. ‘मातृ देवो भव । आना देवो भव । अतिथि देवो भव । ‘ असा उपनिषदांचा उद्घोष आहे

पर्वापेक्षा सर्वश्रेष्ठ असा परमात्माच आहे व त्याच्याठायीं आपली भक्ति असणे आवश्यक आहे. ॐ परमात्मा म्हणजे ह्या चराचर विश्वांतील सर्व शक्तिमान सर्वव्यापी, सर्वगुणसंपन्न, सर्वोत्कृष्ट स्वरूप. त्याच्याच इच्छेनें हे  विश्व आपल्या मर्यादेमध्येच कार्य करते. त्याच्या इच्छेविरुद्ध एक काडीहि हलू शकत नाही. त्याच्या अगम्य शक्तीच्या प्रभावाने ही जड भमि पाण्यामध्ये तरंगते. समुद्र आपली मर्यादा सोडून भूपृष्ठावर आक्रमण करूं शकत नाही. परमात्म्याचे नियम, निबंध नसते तर हे सर्व शक्य झाले असते ? समुद्राला ‘अपाम्पतिः’ म्हणतात. परंतु तोहि परमात्म्याच्या सत्तेच्या शासनाच्या अधीन आहे. मग ह्या विश्वांतील पदार्थामध्ये किती वैचित्र्य आहे ते पहा! त्याचे घटक असलेल्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पांच गुण आहेत. जळाला गंधाखेरीज चार गुण आहेत. अग्नि डोळ्यांना दिसतो; त्याला रूप, शब्द व स्पर्श हे तीन गुण आहेत. वायूला शब्द व स्पर्श हे दोन गुण असून आकाशाला मात्र शब्द हा एकमेव गुण आहे. अशा निरनिराळ्या गुणधर्माच्या पदार्थांनी ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ति झाली आहे. ब्रह्मांडें अनेक असून ती विशाल अंतरिक्षांत तरंगत आहेत. निराधार असलेल्या ह्या ब्रह्मांडांना अंतरिक्षांत उचलून धरणारी शक्ति कोणती? असा विचार केला तर परमात्म्याची अपार अद्वितीय सत्ता हीच शक्ति आपणास आढळून येईल. काय आश्चर्य आहे पहा!

आपल्या सभोवार असलेल्या पृथ्वीच्या व्यवहाराचे निरीक्षण केले तर किती प्रकार आढळतात. सूर्य अत्यंत तेजस्वी तर चंद्राला शांत सुंदर प्रकाश. अग्नि आपल्या तावडीत सांपडलेल्यांना भस्म करतो. सूर्याच्या तेजस्वी किरणांनी जमीनीवरील पाण्याची वाफ होऊन वर जाते व विशिष्ट प्रकाराने त्या वाफेला गारवा लागून पाऊस पडतो. पावसाने पिके येऊन अनंत कोटी जनतेचे जीवन जगते. अशा क्षुल्लक गोष्टींचा विचार केला तरी परमात्म्याच्या शक्तीची थोडक्या प्रमाणांत कल्पना येते. बुद्धिपुरस्सर ह्या गोष्टींचा विचार करूं लागल्यास साहजिकपणेच दुर्दम्य अशी भक्ति आपल्या मनांत उत्पन्न होते.

लहानशा बी पासून महावृक्ष तयार होतो. आपण आपला’ असें म्हणविणाऱ्या देहामध्ये आपणांस न कळतां असंख्य क्रिया होत असतात. अतिसूक्ष्म असणाऱ्या बुद्धीला न कळत अशी विचित्र परिवर्तने होत असतात; प्रकृतीच्या विरुद्ध वाटणाऱ्या किती तरी अद्भुत घटना घडत असतात. हे सर्व परमात्म्याच्या अनंत शक्तीचे अंशत: परिणाम आहेत. हा देह अन्नाचाच आहे. परंतु देहाच्या पूर्वीचे व नंतर होणान्या गोष्टीचे निरीक्षण केल्यास आपणांस आश्चर्य वाटेल. ‘आत्मनः आकाशः सम्भूतः। आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्भ्यः पृथिवी । पृथव्याः ओषधयः । ओषधीभ्योऽन्नं। अन्नाद्रेतः। रेतसः पुरुषः। ‘ परमात्म्याने आपल्या अगम्य शक्तीने सष्टीची निर्मिती केली. त्यांत आकाश, वायु, अग्नि, पाणी, भूमि, वनस्पती हे एकापासून एक अशा क्रमाने अत्पन्न झाले. वनस्पतीपासून अन्न, अन्नापासून अंडज, जारज स्वेदज व उद्भिज अशी चार प्रकारची आहारमय शरीरें निर्माण झाली. गर्भाशयांत रजोरेतसाचें सूक्ष्म परिमाण शिरून त्यांची नऊ महिने पावेतो वाढ होऊन तें शिशुरूपाने बाहेर पडतात व पुढे त्याची वाढ होऊन ते बालस्वरूपी नाना प्रकारच्या प्रकृतींनी व शक्तींनीयुक्त दिसू लागतात. देहाच्या ह्या सर्व परिवर्तनाच्या व रूपांतराच्या बुडाशी काय आहे ? परमात्म्याची आश्चर्यजनक कृतीच नाही का?

आपले देहधर्म व नित्याचे व्यवहार नेहमीच चालू असतात ते व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी क्रियाकर्मरूपी परिणाम असावेत असा विचार उद्भवतो. आपणांस बोलण्याची शक्ति निसर्गतः आहे. परंतु त्यांतहि किती वैचित्र्य आहे. चामड्याचे ओठ, जीभ दातासह हलत असतां त्यांत वारा घेऊन आपणास हवे ते उच्चार उमटविता येतात. एवढ्याशा डोक्यांत किती विचार, किती विषय भरलेले आहेत? अवाढव्य सृष्टीबद्दल सूक्ष्म व विशाल विचार आणि तिच्या संबंधीचे सुसंबद्ध ज्ञान या डोक्यांत भरलेले आहे. ह्या चराचर विश्वाचे सत्यस्वरूप परमात्माच होय. सुखप्राप्ती होण्यासाठी आपण कितीतरी कष्ट घेतो, तें सुख म्हणजेच परमात्मा. विश्वांतील सर्वशक्ति ज्याच्या अंश आहेत त्याच्या अल्पशा शक्तीचे प्रदर्शन म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाच्या निर्मितीला कारण परमात्माच आहे. हे उघड दिसते. त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे व त्याच्यांतच तल्लिन होणे हेच ह्या मानवी देहाचें सार्थक होय.

आपणांस हवीशी वाटलेली कोणतीहि वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी आपण अत्यंत प्रेमाने प्रयत्नशील असतो. प्रीति, प्रयत्न व प्राप्ति यांचा एकप्रकारे संबंध आहे. जास्त आवडीची वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी समंजसपणे जोराचे प्रयत्न करीत असतां ती वस्तु प्राप्त होणे हेच त्याचे फळ.

आपल्याला नेहमीच परमात्म्याची आवश्यकता असते. त्याची कृपाच आपले रक्षण करतें. परमात्मा म्हणजे सुखाचा सागरच. तो परमसुखस्वरूप आहे. जगांतील अनंत वस्तू सुखाचा लेश आहे म्हणून ह्या जगाची उत्पत्ति करणाऱ्या परमेश्वरांत सर्व सुख आहेच. अनंतकोटी ब्रह्मांडास कारण असलेल्या परमेश्वराच्या ठायीं अगाध व अगम्य सुख आहेच. ह्यावरून सुखाचें मूळ परमेश्वरच होय. निर्माण झालेल्या सर्व पदार्थाना रस, गंध व आकर्षकता आहे. हे सर्व गुण त्यांना उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरामुळेच आहेत हे तर्क सिद्ध होय. म्हणूनच जगातील सर्व वस्तूमध्ये असणारे सुखलेशाचे मूळ परमात्मा आहे. खरे सुखसर्वस्व म्हणजेच परमात्मा. उत्पत्ति लय ह्यांनी युक्त असणारे हे जग तुच्छ होय. हे परमेश्वराच्या इच्छेनुरूप रहाते. स्वतःच्या पायाने आलेल्या बिभीषणाला आश्रय देऊ नये असे मंत्री म्हणताच श्रीरामप्रभूनी सांगितलेले वचन आठवा. ‘निमिषार्धन संहन्निमिषार्धतः सजामि । अर्ध्या निमिषात मी सर्वाचा संहार करू शकतो तसेच त्यांचे निर्माणहि करू शकतो, असे परमेश्वराचे अगाध सामर्थ्य आहे. आपणास सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करावयास असल्यास परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम ठेवलेच पाहिजे. परंतु लाखामधून एखादा भक्त व कोटीतून एखादाच मुक्त होतो. म्हणजेच परमेश्वच्या ठिकाणी प्रेम असणारे कमीच!

जगाचे मूळ परमात्माच होय. जगोत्पत्तीपूर्वी हि तो होता. निर्माण केलेले जग चालविण्याकरता त्याने त्या जगात प्रवेश केला. ह्या आपल्या देहातहि तो आहेच. परमेश्वर नाही म्हणजे काहीच नाही. त्याची शक्ति विश्वव्यापी आहे. अशा परमेश्वराचे यथार्थरूप समजून न घेता, त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न न करता इतर दुसन्या विषयामध्ये सुख शोधल्यास ते सापडेल काय ? सुख एकीकडे व आपण शोधतो दुसरीकडे. अशा प्रांत लोकांना विषयामध्ये प्राप्त होणारे सुख काल्पनिकच असते. कल्पनेच्या सुखाला कांही स्थैर्य आहे कां? एक वेळ एखाद्या विषयात दिसलेले सुख दुसऱ्या क्षणी तेथे आढळत नाही. एकेकाळी प्रिय झालेली वस्तु दुसऱ्या वेळेस प्रिय होईलच हे सांगता येणार नाही. एखाद्या वेळी एखादी वस्तु आवडली तरी काही वेळातच ती आवडेनाशी होते. ह्या सब कारणांनी मुखमय परमात्म्याला विसरून जगातील विषयांच्या काल्पनिक सुखाच्या मागे लागल्यास आशा मात्र वाढत जाते; संताप वाढून तो अग्निप्रमाणे हृदय जाळून टाकतो; नेहमीच असमाधान । वाटते व शांति मिळत नाही. एकंदरीत ह्या काल्पनिक सुखाच्या मागे । लागल्याने नेहमीच्या सामान्य सुखालाही आंचवून दु:खच वाढवून घेतल्यासारखे होईल. खरे म्हणजे परमात्म्याला विसरुन केलेली | सुखाची इच्छा विनाशकारीच. खरे सुख म्हणजे परमात्मा. परमात्म्याच्या ठायीं प्रेम करून शांति मिळविणेच योग्य होय.

आवश्यकतेनुसार प्रेमाची उत्पत्ति होते. जगाचे दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी शाश्वत सुखाची जास्त आवश्यकता असते हे स्पष्ट आहे. परमात्माच शाश्वतसुखरुप आहे. परमात्म्यापासून सुखप्राप्ती होते असे समजून संसारात वागल्यास, संसारावर आपण जेवढे प्रेम करतो त्याच्या शतांश प्रेम परमात्म्याच्या ठिकाणी करून भक्ति केल्यास आपणांस ‘सायुज्यप्राप्ति होईल. माझ्या ठिकाणी आपले चित्त स्थिर केल्यास तुमचे सर्व कष्ट दूर होतील’ असे भगवद्वचन आहे. तरी सुद्धा जे पुण्यात्मे आहेत त्यांनाच संकटकाली परमेश्वरांची आठवण होते.

मनुष्याला पैशाची गरज लागल्यास तो सावकाराकडे जाऊन लाचारीने, दैन्याने पैसे मागतो. तसेंच परमात्म्याजवळ मागितले तर? तो तर लक्ष्मीपती आहे. सर्व जग त्याचा कोटयांश किंवा समुद्रातील एक थेंबच. त्याच्या नांवात अनंत सामर्थ्य आहे. त्याला हाक मारल्यास आई आपल्या मुलाकडे जशी धांवत येते त्याप्रमाणे तो धांवत येईल. मग काय कमी पडणार? हे सर्व काही माहीत असूनहि लोक फसतात. त्यांची कोठेच निष्ठा नसते. आपण भक्तिभावानें, गजेंद्राप्रमाणे किंवा द्रौपदीप्रमाणे त्याचा धावा केल्यास परमात्मा धावून येतोच येतो. आपल्या ह्या संसारजाळांत आपण परमेश्वरास विसरतो. अशा वेळी सूक्ष्मपणे आत्मनिरीक्षण केल्यास आपणांतच भक्ति नाही असेंच आपणास आढळून येईल.

नारद भक्तिसूत्रांत ‘परमप्रेमरूपाच ।’ असे भक्तीचें लक्षण सांगितले आहे. परमात्म्याच्या ठायीं अत्यंत प्रेम ठेवून कार्यप्रवृत्त व्हा! ह्यासाठी भौतिक व्यवहारात आपण जेवढे प्रेम ठेवतो तेवढे प्रेमहि पुरेसे आहे. त्यामुळे परमात्म्याची प्राप्ति होईल. आपण ज्यावर ज्यास्त प्रीति करूं त्याचाच साक्षात्कार होत असतो. आपणांस विषयांचे प्रेम असेल तर आपल्याला त्याचाच साक्षात्कार होईल. परंतु त्यापासून काय फायदा? एवढे काबाडकष्ट करुन शेवटी काय मिळणार ? केलेल्या प्रयत्नांचे फळ कोणते ? आपल्या सुखाच्या कल्पनेपेक्षा हे सुख वेगळे असेल तर आतापावेतो अहोरात्र केलेल्या कष्टांचा काय उपयोग? फायदा व अर्थ नसलेला व्यवहार कशासाठी व कोणासाठी ? ह्या सर्वापेक्षा श्रेष्ठ अशा नित्यानंद-परमात्मपदासाठी वर्णाश्रमधर्मास अनुसरून कष्ट करा, तोच फायदा! प्रामाणिकपणे कष्ट केल्याने सार्थक होईल.

आपली सर्व कामें, जीवनातील प्रत्येक क्रिया परमेश्वरप्राप्तीसाठीच आहेत तसेच त्या परमेश्वराच्या सेवेसाठी आपण सर्वकाही करतो असे समजून, औदासिन्य सोडून कामें केल्यास आपल्याला त्याचे सर्व श्रेय प्राप्त होईल. परमात्मप्राप्तीसाठीच हा नरजन्म मिळाला असता यःकश्चित विषयासाठी त्याला राबवावयाचे काय? प्रीतीसारखा अमुल्य पदार्थ काल्पनिक सुखाच्या मागे लागून घालविणे इष्ट आहे काय ? संपूर्ण जीवनातील एकमेव लक्ष्य असलेल्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रेम, प्रीति, भक्ति हे एकमेव साधन आपल्या हाती आहे निश्चयाने, निर्धाराने प्रेम संपादन करा! त्यासाठीच आपले जीवन आहे हे ध्यानात ठेवा ! आपले दैनंदिन न्याय कष्ट व्यवस्थितपणे चालू ठेवा पण ती कामें परमात्म्याच्या आज्ञेनुसार आणि ही सर्व परमात्म्याची सेवाच आहे अशी जाणीव ठेवून करा! ह्या पद्धतीने आपण परमेश्वरासाठी काम केले व प्रेमाने वागलो तर खरोखरच भक्ति केल्यासारखे होईल.

ज्यांना माझी प्राप्ति झाली असे महात्मे पुन्हा दुःखमूल असे संसारात परत येत नाहीत, असे श्रीकृष्ण परमात्म्यानी  सांगितले आहे. परमात्म्याच्या प्राप्तीकरता अत्यंत प्रेमळ भक्तीने साधन करणे आवश्यक आहे. जीवनातील सर्व व्यवहार त्या साधनेकरतांच झाले पाहिजेत. असे झाले तरच खरे सुख प्राप्त होईल. सुखाच्या भ्रांतीने जगाची उत्पत्ति झाली आहे. ती भ्रांती नाहीशी होऊन आत्मसुखस्वरूपाचे खरेखुरे दर्शन घडल्यास त्या सुखांत एकरूप होऊन, याहुन सुख निराळे आहे असें न वाटणे ह्यालाच ‘नित्यसुखब्रह्मानंद’ असे म्हणतात. तें सुख म्हणजे परमात्माच!

ॐ तत्सत्

॥श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

भक्ति

प्रवचन ३

‘श्रेष्ठेष्वनुरागो भक्तिः।’ अनुराग म्हणजे भक्ति. स्थानभिन्नतेमुळे अनुरागाचा अर्थ प्रीति, प्रेम, प्रणय, भक्ति इत्यादि होतो. | माता-पित्यांच्या मुलाबाळासंबंधी असणाऱ्या अनुरागास ‘प्रीति म्हटले जाते. तरुण तरुणींच्या अनुरागास ‘प्रणय’ किंवा ‘प्रेम। म्हटले जाते. मुलांच्याकडून आईवडिलांच्या ठायी दर्शविल्या जाणा-या अनुरागास ‘मातृभक्ति “पितृभक्ति’ असे म्हणतात. हाच अनुराग श्रेष्ठ लोकांबद्दल असतो तेव्हा त्यालाच ‘भक्ति’ म्हणतात. जसा , गुरुभक्ति’ ‘देवभक्ति’ इत्यादि.

परमेश्वराच्या ठायी असलेले निरतिशय प्रेम म्हणजेच भक्ति’ होय. सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतरूपा च ।’ परमात्म्याच्या ठायी असलेली निष्कामभक्ति अमृतस्वरूपा’ होय. म्हणूनच ती नाशवंत नसते. सर्वात्म असा परमात्मा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट आहे अशा भावनेने दिन प्रतिदिन दृढ दृढतर होत जाणा-या अनान्यसक्त भक्तीसच ‘पराभक्ति’ म्हणसा येईल. ‘सा पराभक्तिरीश्वरे।’ तीच सर्वोत्कृष्ट भक्ति होय.

परमेश्वराने आपणावर कृपा करावी ह्यासाठी काय करावयाचे असा प्रश्न निर्माण होतो. आपल्यावर आईवडिलांचे प्रेम कायम राहण्यासाठी काय करावे लागते ? त्याप्रमाणे ईश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काय करावयास हवे ? आईवडिलांची सेवा केली असतां व त्यांच्या आज्ञेचे पालन केले असता त्यांचे प्रेम मुलाबाळांवर कायम टिकते. ही गोष्ट तुम्हां सर्वा प्रापंचिकांना माहीत आहे. आपण सर्वजण त्या परमेश्वराचीच मुले असल्याने त्याचा कृपाप्रसाद प्राप्त होण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे व त्याची सेवाहि केली पाहिजे.

प्रीतीनेच प्रीति वाढते असा मानवी मनोधर्म आहे. हीच गोष्ट देव लोकांसहि उपयोगी पडणारी आहे. म्हणूनच परमात्म्याबाबतहि तीच गोष्ट योग्य ठरणार. परमात्म्याच्या ठायी अनन्य भाव, प्रीति, प्रेम ठेवणे हीच भक्ति होय. त्या भक्तीस अनुरूप अशीच प्रीति परमात्माहि दाखवतो. सर्वशक्तिमान अशा भगवंताच्या कृपेने कोणती गोष्ट सहजरित्या साधणार नाही ? सावकार किंवा अधिकारी यांचा विश्वास संपादून व सेवा करून त्यांना संतुष्ट करून घेतल्यास आपणास हवे असलेले प्राप्त करून घेणे शक्य होते. असे असल्यामुळे आपल्या भक्तीने संतुष्ट झालेला परमात्मा प्रसन्न झाल्यावर आपणांस काय साध्य करून घेता येणार नाही. धन-कनकादी सर्व भोग्य वस्तुति मिळतील. परंतु खरा भगवद्भक्त ह्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करणार नाही. तो परमेश्वराजवळ अचलभक्तींची याचना करील. ‘तुझी कृपा कायम असं दे’ अशी परमेश्वराजवळ पुन्हा पुन्हा प्रार्थना करील. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचाच अनुभव घेत सदासर्वदा आनंदित राहील.

परमेश्वराची प्रीति प्राप्त करून घेण्यासाठी निरनिराळे योग साधनीभूत असले तरी त्यांत ‘भक्तियोगच श्रेष्ठ व सुलभसाध्य आहे असे म्हटले जाते. विश्वासरहित भक्तीने कोणताहि मार्ग सुगम होत नाही, असे म्हटले जाते. ‘अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ।’ ह्या वाक्याचे तात्पर्य, इतर मार्गापेक्षा भक्तिमार्गातच जास्त सुलभता आहे हेच होय, निरनिराळ्या योगसाधनांनी सर्व काही साध्य होत नाही. देहदंडणा मनोनिग्रह वगैरे उग्र कार्य त्यांत सांगितली आहेत. पण भक्तिमार्ग तसा नाही. भक्तींचे मुख्य ‘अनन्यशरणांगती’च होय.

हे दयाघन परमात्मा ! तूंच माझा उद्धार कर. मी दुसन्या कोणासहि शरण जाणे शक्य नाही.’ अशी एक दृढभावना असली की भक्तिमार्ग सुलभतेने साधता येतो.

कलियुगांत ‘भक्तिरेव गरीयसि।’ असे म्हटले जाते. कलियुगांत मानवशक्तीचा हास झाल्यामुळे अनुष्ठानादि साधनें कष्टसाध्य असल्याकारणाने त्यांच्यापेक्षां भक्तीलाच जास्त प्राधान्य आहे.

प्रीतीनेंच प्रीति उत्पन्न होते. अधिकारबलाने अथवा कायद्याच्या निबंधानेसुद्धा न होणारी कामें केवळ प्रीतीमुळे सुलभरित्या होतात. त्याचप्रमाणे शास्त्रविधीने साध्य होण्यास अशक्य असलेली भगवद्पा केवळ भक्तीनेच सुलभरितीने साधता येते. एखाद्याच्या अधिकाराला | घाबरून कार्यप्रवृत्त झालेले लोक वाणीने व शरीराने याचा अधिकार मान्य करूनच कार्यप्रवृत्त झालेले दिसत असले तरी मनाने ते कार्य प्रवृत्त झाले असतीलच हे मात्र सांगता येणार नाही. अशा कडक मालकासंबंधी मजर मनामधून अप्रीतोच दाखवितो. तो त्यास मनातून शिव्याच देत असतो. मन न लावून केली जाणारी कामें कधीहि चांगली होत नसतात. म्हणन प्रीतिपूर्वक भक्ति होच सद्यः फलकारी होय.

प्रेमानेच माणसें वश होत असता असें असल्याकारणाने भावनाप्रधान असलेल्या परमात्याची भक्ति हीच योग्य परिणामकारी आहे ह्यांत आश्चर्य कोणते ? ‘ भावे हि विद्यते देवः।’ भावांतच परमेश्वर आहे. त्यासाठी बलानेच त्याला वश करून घेतले पाहिजे.

‘भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ॥ ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥’

माझे भक्त भक्तीच्या योगानेच माझे स्वरूप यथार्थत्वाने जाणतात. अशा प्रकारे माझे स्वरूप यथार्थत्वाने जाणणारे असे जे माझे भक्त आहेत ते माझ्यातच विलीन होतात. ते माझ्यापासून भिन्नत्वाने शिल्लक राहं शकत नाहीत. असे भगवान श्रीकृष्णानी म्हटले आहे. भक्तीतच परमात्मपद प्रविष्ट असल्याने परमात्मा भक्ताधीन आहे. ह्यासाठीच परमात्मप्राप्तीसाठी भक्तीशिवाय इतर कोणत्याहि साधनाची आवश्यकता नाही. ‘भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैः भक्तिप्रियः श्रीहरिः।’ अविचल अशा भक्तीनेच भगवान तृप्त होतो. इतर कोणत्याहि कारणाने तो तृप्त होत नाही. भगवंतास ‘भक्तिप्रिय’ असें म्हणतात. भगवान भक्तिरूप पाशानेच बद्ध होतो असें पुराणादिमध्ये सांगितले आहे.

लौकिक व्यवहारांत सुद्धां प्रीतीसारखे दुसरे कोणतेहि बंधन नाही. ‘बन्धनानि किल बहूनि सन्ति।’ नाना प्रकारचे पाश असले तरी प्रेमपाशासारखा दुसरा कोणताहि पाश नाही. प्रेमपाशाचे लक्षण अतिशयच विलक्षण. कितीहि कठीण असलेल्या वृक्षास छिद्र पाडण्या शक्ति असलेला भुंगा कमलदलांत सहज गुरफटला जातो. कमलाची कोमल दलें कूरतण्यास तो तयार होत नाही. कारण त्याला कमलाच्या बद्दल मोह असतो. त्या मोहपाशामुळे तो त्यांत गुरफटल्याने त्यातन बाहेर पडण्याची तो इच्छाच करीत नाही. प्रेमपाश लोखंडी गजापेक्षांहि महाकठीण आहे. प्रेमपाश तोडणे कोणासहि सहज शक्य होत नाही.

परमात्मा निर्गुण, निराकार आहे. तरीहि भक्तांच्या भक्तिपाशास मोहून तो भक्तानी कल्पिलेले आकार, रूप धारण करून भक्ताच्या कार्यसिद्धीस तत्पर असतो. ‘उपासकानां कार्यार्थं ब्रह्मणो रूपकल्पना । परमामत्मा आपल्या भक्तांच्या भक्तीला अनुरूप, त्याच्या हितसाधनेसाठी साकार साक्षात्कार स्वरूप धारण करून त्यांना दर्शन देतो; त्याची कार्यसिद्ध करतो. प्रेमवश होणारा परमात्मा मानवरूप धारण करून शिशुप्रमाणे वाललोलाहिं आचरतो, तरूणाप्रमाणे प्रणय व्यवहारहि करतो; कोप, संतापहि प्रकट करतो व सुखदुःखाच्या अनुभवाचेहि नाटक करतो.

प्रेमांध व्यक्तीस दुःखाची जाणीव होत नाही व प्रेमपात्र असणा-या माणसांचे दोषहि त्यास दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे भक्तिपरवशतेमुळे शरणागत अशा आपल्या भक्तांचे सर्व दोष विसरून परमात्मा त्याच्यावर कृपा करतो म्हणून त्रिसत्यस्य भक्तितेव गरीयसि । भक्तिरेव गरीयसि । भक्तिरेव गरियसि ।’ असे नारदभक्तिसूत्रांत सांगितले आहे. भक्तीच सर्वात श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. परमात्म्यामध्ये अचल श्रद्धा ठेवून मानवाने त्याच्या रूपाचे चिंतन केल्यास ‘अमृतत्वमेति ।’ म्हणजे ते जरा मरणरहित होऊन चिरंजीवी होतात असे म्हटले आहे. म्हणूनच ‘तुम्ही सर्व माझ्याठायी मन रमविणारे व्हा’ असे भगवंतानी सांगितले आहे.

भगवत्चितन करण्याचे कार्य मनाचे आहे. मनाची ही शक्ति वाढविण्याचे काम मानवाचे आहे. भक्तिमार्गाकडे निष्ठेने मन वळविले पाहिजे. नाशिवंत व दुःखास कारणीभूत ठरणाऱ्या या संसारातील कोणत्याहि वस्तूवर विश्वास ठेवू नकोस. अविनाशी, सुखस्वरूपी, स्वयंसिद्ध अशा परमात्म्याचे चितन करून सुखी हो! ‘ असा मनास उपदेश करून त्याला भक्तिमार्गाकडे खेचन नेले पाहिजे.

मच्चित्तस्तन्मयो भवति गुह्यमेतत्सनातन ।’ जे ज्यात तन्मयतेने आसक्त्त होतात ते तत्स्वरूप होतात. भ्रमर-कीटक न्यायाने ही पुरातन गोष्ट सत्य आहे. याप्रमाणे तन्मयतेने आत्मस्वरूप प्राप्त करून घेणे महत्वाचे आहे. परमात्मा अज, अक्षर, अव्यय आहे. म्हणजेच त्यास जनन मरणादि नाही. तो सत्यस्वरूप आहे. परमात्म्याच्या ठिकाणी भक्ताने अनन्यासक्त्त होऊन तन्मय बनल्यास तो भक्तसुद्धा ‘तन्मयः’ होऊन जातो. प्रेमानेच प्रेम मिळविले पाहिजे अथवा वाढविले पाहिज. जे भक्त परमात्म्यास प्रेमवश करून घेतात त्यांचा परमात्मा दास होतो. सर्वैश्वर्य संपन्न, सकललोकपालक असणारा महाविष्णु चक्रवति बलिराजाचा सेवक झाला होताच की नाही! हा कशाचा प्रभाव ? हयाला प्रेमच कारणीभूत नव्हे काय? भक्ताभिमनी भगवंतास भक्ताच्याबद्दल दुजा भाव असूच शकत नाही..

केवळ स्वयंपाकाचा विचार केल्याने किंवा स्वयंपाकक्रियेचा अभ्यास केल्याने भूक शमणार नाही. पोट भरण्यासाठी स्वयंपाक करूनच जेवले पाहिजे. त्याप्रमाणे केवळ ज्ञानमात्राने मुक्ति मिळणार नाही. तर त्यासाठी ज्ञानाला भक्तीची जोड अत्यावश्यक आहे. श्रीमद् भागवतात ‘नैष्कर्ममप्यच्युत भावजितं । न शोभते ज्ञानमलं हि पुंसाम् । असे म्हटले आहे- म्हणजेच सर्वसंगपरित्याग करून संन्यास ग्रहण करताच मुक्ति मिळत नाही. परमात्म्यासंबंधी भक्तिभाव नसल्यास आपण समजवून घेतलेले वेदार्थज्ञानसुद्धा निव्वळ बडबड किंवा वितंडवादच होय. अशा ज्ञान वैराग्यास मुळीच किंमत नसते व त्यामध्ये को सामर्थ्यहि नसते, असे सर्वज्ञ श्रीव्यास महर्षीनी सांगितलेले आहे शब्दज्ञान किंवा निष्ठुर कर्माचरण ही साधनें नव्हेत. त्या सर्वांना भक्तीच्या तेजाची, प्रकाशाची नितांत आवश्यकता आहे.

पाश्चात्यांची वर्णने ऐकून किंवा त्यांचे फोटो पाहून किती मनन केले तरी त्यांची बोली भाषा आपणांस येऊ शकेल काय? आपणांस त्यांची बोली भाषा यावी असे वाटत असल्यास त्या भाषेचा क्रमवार अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्ञान हे कोरडे आहे. अनुभवाच्या केवळ वाक्यानी किंवा भाषेनें शांति मिळणार नाही.

‘अनन्तगुणमैश्वयं लभते यत्प्रसादतः।’ ज्याच्या दयेमुळे अनंतगुणरूप असे सकल ऐश्वर्य प्राप्त होते अशा सच्चिदानंदस्वरूप परमात्म्याचे अनन्यासक्तिभावाने ध्यान केल्यास सर्वकांही प्राप्त होते. सुगंधी द्रव्याने भरलेली पेटी सुगंधमयच होते. नको म्हटले तरी सुगंध पेटीस सोडू शकत नाही. ती पेटो उघडताक्षणीच ती खोलीसुद्धा सुगंधाने दरवळून जाते. त्याचप्रमाणे जेथे भगवद्भक्ति आहे तेथे आनंद आपोआपच प्राप्त होतो. आनंदवृत्ती हाच सुखाचा झरा होय. त्यामुळेच परमसुख सुलभतेने प्राप्त होते. म्हणून नेहमी मन भगवद्भक्तीतच तल्लीन केले पाहिजे. नामस्मरण, ध्यान, तल्लीनता हे भक्तीचे प्रेरक होत.

‘मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङगजितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥’

सर्व प्रकारची कर्मे करीत असता ती परमेश्वरार्पण बुद्धीनेच केली पाहिजेत. सर्व कर्मत्यागहि परमेश्वरासाठीच केला पाहिजे. ‘मी सनातन, शाश्वत, सर्वश्रेष्ठ आहे असे समजून माझी भक्ति केली पाहिजे. माझ्याशिवाय कोणतीच वस्तु नाही, कोणतेहि सुखकर नाही अशा भावनेने सदासर्वदा माझीच आराधना केली पाहिजे. सकल प्राणिमात्रात मीच सर्वात्मस्वरूप होऊन आहे ह्यावर विश्वास ठेवा. एखादेवेळी कोणत्याहि प्राण्याकडून वाईट गोष्ट घडली तरी त्यामध्ये देषबद्धी न ठेवता निर्वेरभाव ठेवावा. अशा प्रकारे जे भक्त वागतात तेच मला प्राप्त करून घेतात म्हणजेच माझ्या स्वरूपी लीन होतात आणि म्हणनच ते नित्यसुखी होत. असे वागणारेच माझे खरे भक्त होत व हीच खरी ईश्वर भक्ति ! ह्याप्रमाणे श्रीमद् भगवद् गीतेत भगवंतानी उपदेश केला आहे.

परमात्म्याने आणखीहि असे म्हटले आहे की, भक्त परमात्म्याच्या प्रीतीसाठीच जगतो. तो नेहमी परमात्मस्वरूपच पहातो म्हणजेच त्याने कोणत्याहि वस्तूकडे पाहिले तरी तीमध्ये त्यास परमात्म्याचे स्वरूपच दिसते; तो जे कानाने ऐकतो ते सर्व परमात्म्याच्या कथाच तो ऐकत असतो. अनृत, असत्य, परनिंदा इत्यादि दुर्वाक्ये त्याच्या तोंडातून कधीहि बाहेर पडत नाहीत. तो आपल्या सर्व इंद्रियकर्मानी परमात्म्याची सेवा करीत असतो. त्याचे जगणे परमात्म्यासाठीच; त्याची कम म्हणजे परमात्म्याचीच सेवा. त्याचे मन नेहमीच परमात्म्यध्याननिरत असते. तो परमात्म्याच्या दर्शनाचीच इच्छा करीत असतो, इतर कोणतीहि इच्छा तो करीत नाही; म्हणूनच तो ‘स लोकबाह्यः’ होऊन जनसमुदायापासून दूर असतो! असे जे भक्त आहेत ते डोळे झाकून चालले तरी परमात्मा त्यांना योग्य मार्गदर्शन करतो.

‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्यपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥

‘सर्व कांही विसरून माझाच आश्रय घेणारे जे माझे भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी चालवितो’ असे परमात्म्याने म्हटले आहे. हेच भक्तीचे महत्व होय. हीच भक्तांची सार्थकता. कबीराचे वस्त्र विणण्याचे काम परमात्माच करीत असे. परमात्म्यासाठी जे सर्व काही करतात त्यांच्यासाठी परमात्मा आपल्या सर्व शक्तीचा उपयोग करून त्यांची सर्व कार्य सिद्धीस नेतो.

नामदेव, तुकाराम इत्यादी भगवद् भक्तांची चरित्रे श्री भक्तिभावाने समजून घेतल्यास आपल्या अंगावर काटा उभा रहातो ‘अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम् ।’ असे म्हणण्याचा अर्थ कोणता? एखाद्याने विचारल्यास ‘साखरेच्या गोडीसारखा’ हेच उत्तर मिळेल भक्तीचे महत्व भक्तच जाणू जाणे. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही भक्तीचे वर्णन करावयाचे झाल्यास मानवी शब्द कमी पडतील. भक्ति भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवानेच समजू शकते. स्वानुभवानेच अनुभविता येणाऱ्या भक्तीच्या बाबतीत शब्दावडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा! समजून घ्या! तिच्या पासून चांगली फळे प्राप्त करून घ्या! असे सांगणेच जास्त श्रेयस्कर आहे.

भक्तिमार्ग हा ‘सर्वानुकूल:’ म्हणजे सर्वाना अनुकूल असाच आहे. वर्णाश्रमाचा घोळ नाही. सर्वाधिक:’ म्हणजेच सर्व मार्गापेक्षा श्रेष्ठतम आणि ‘अनंतसुखस्वरूप’ म्हणजे निरवधि सुखदायक आहे. भक्तिसंपन्न असणाऱ्या भगवद् भक्ताला तिन्ही लोक तुच्छ वाटतात.

भक्ति नऊ प्रकारच्या आहेत असे म्हटले आहे त्या भक्तीपैकी नामसंकीर्तन म्हणजे भगवन्नामस्मरणाने भक्तांचा उद्धार होतो. ह्या बाबतीत अजामिळाचे उदाहरण सर्वोत्कृष्ट आहे. कृतकर्माबद्दल पश्चात्ताप होऊन मनशुद्धि प्राप्त करून नामस्मरण केल्यास मानव पुनीत होतो ह्याबाबत शंकाच नको.

भगवंताच्या शक्तीमध्ये भक्ताची अचल श्रद्धा असली पाहिजे आणि तो आपला उद्धार करील हा दृढविश्वास असला पाहिजे. विश्वास ठेवल्याने तोटा होत नाही पण विश्वास न ठेवल्याने हानी होतेच होते.’ अशी संत पुरंदरदासांची उक्ती आहे. भगवंताबद्दल अचल श्रद्धा असल्याशिवाय केलेले कोणतेहि कार्य फलद्रूप होत नाही. भगवत् आराधना अचल निष्ठेने केल्यास मात्र फलप्राप्ति निश्चितपणे होतेच. परमात्म्याच्या ठिकाणी मन गुंतणे फारच कठीण. त्याच्यासमोर मन प्रपंचातील तापपत्रयाचेच ध्यान करणा-यांवर त्यांची कृपा कशी होणार? अचल श्रद्धेने भगवत् आराधना करणान्या भक्तांना

न तत् भासयते सूर्यो न शशाङको न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥’

सूर्य, चद्र, अग्नि हे ज्या स्थानास प्रकाश देऊ शकत नाहीत आणि ज्या स्थळी गेले असतां पुन्हा जन्म, मरण प्राप्त होत नाही अशा नित्य निर्विकार, स्वप्रकाशी सच्चिदानंद स्वरूपासारखे स्वरूप प्राप्त होते. कनवाळू असणान्या परमात्म्याच्या कृपेने तुम्हा सर्वांना वर सांगितलेला भक्तिमार्ग लाभो. त्या सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन होवो व तें स्वरूप तुम्हास प्राप्त होवो !

शेवटी एक गोष्ट सांगून आपण आजचे प्रवचन संपवू या. तो गोष्ट म्हणजे श्रद्धेविषयीचा विचार. श्रद्धा नसल्यास भगवान किंवा भगवद् भक्त ह्यापैकी कोणीहि तुमचे कल्याण करू शकणार नाहीत. भक्तीच मुक्तीला कारणीभूत आहे असे म्हटले जाते. ती भक्ति अचल पाहिजे. तींत युक्ति वगैरे असणे उपयोगाचे नाही. भगवंताचे नामस्मरण करणारे दांभिक आचार प्रवर्तक असे ज लोक आहेत, जे दिखाऊ भगवद्भक्त आहेत, ते खरे भगवद् भक्त नाहीत. त्यांना मुक्ति मिळणार नाही. त्यांच्या युक्तीचा काहीहि उपयोग होणार नाही.

विभीषण श्रीरामाचा भक्त होता. श्रीरामाच्या ठिकाणी त्याची अचल श्रद्धा असल्यामुळे तो जें जें कांही बोलत असे तें तें सत्य होत असे व तो जें करीत असे ते सर्व नित्य असेच असे. अशा सत्य नित्य भगवद् भक्तापाशी एक दिवस ब्राह्मण आला व ‘ही नदी मालाडून जाण्यासाठी मजजवळ एक पैसाहि नाही. पण मला रोज कामानिमित्त पैलतिरी जावे लागते. तुझ्या श्रीराम भक्तीच्या प्रभावाने मला एखादा सुलभ मार्ग दाखव-‘ अशी त्याने विनंती केली. हे ऐकून व त्या ब्राह्मणाची करुणाजनक परिस्थिती पाहून बिभीषणाने पानावर काहीतरी लिहून, त्याची घडी घालून त्या ब्राह्मणाच्या पदर बांधली आणि ‘तू ज्यावेळी हे वस्त्र नेसून नदीतून जाशील त्याना एखाद्या नाल्यातून आपण जसें चालतो त्याप्रमाणे तुला वाटेल, पण हे बांधलेले उघड्न पाहं नकोस.’ असे सांगितले. ब्राह्मणाने श्रद्धेने वस्त्र धारण करून नदीकाठी येऊन तो नदीत उतरला. आश्चर्याची गोष्ट अशी की, नदी पार करीत असतां त्यांचे कपडे भिजले नाहीत व त्याचे पायहि ओले झाले नाहीत. आपण जसे जमिनीवरून चालतो त्याचप्रमाणे तो पैलतिरी पोहोंचला. नंतर तो तसाच परत आला. झाल्या गोष्टीचे त्याला कुतुहल वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे तो नदीतून चालू लागला. पण चालतांना त्याचे मन चंचल झाले. ‘ ह्या पानावर असें काय लिहिले आहे हे पाहिलेच पाहिजे’ असे त्याच्या मनाने ठरविले. नदीच्या ऐन मध्यांत येतांच त्याने त्या वस्त्राची गांठ सोडली व लिहिलेले वाचलें. त्या पानावर ‘श्रीराम’ एवढेच लिहिले होते. ‘छद् ! एवढेच लिहिले. आपणहि एवढे लिहं शकतो. मीसुद्धा रामभक्त आहे. मला बिभीषणासी काय कर्तव्य आहे ? आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट मी कां म्हणून करावयाची?’ असा विचार त्याच्या मनांत येतांच तो त्या जलप्रवाहांत बुडून मेला. जोपर्यंत बिभीषणाच्या सांगण्यावर त्याची श्रद्धा होती. तोपर्यंत नि:शंकपणे तो पाण्यावरून जमीनीसारखे चालू शकला श्रद्धा संपता क्षणीच तो ब्राह्मण पाण्यात बुडाला. एखाद्या रबरी पिशवीस छिद्र पाडलें म्हणजे ‘फुस्’ असा आवाज होऊन तिच्यातील हवा निघून जाते त्याप्रमाणे श्रद्धा संपतांच त्या ब्राह्मणास बुडावे लागले.

परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा न ठेवता केलेले कोणतेहि कार्य भगवद् भक्ति ह्या स्वरूपांत येत नाही. श्रद्धा हीच शक्ति, भक्ति व मुक्ति ह्यांचे मूर्तस्वरूप होय. म्हणून तुम्ही माझी प्रवचने ऐकून त्याप्रमाणे श्रद्धेने आचरण केल्यासच तुमचे कल्याण होईल.

प्रापंचिक विषयांत जशी अत्यासक्त भावना असते तशीच अत्यासक्त भावना परमेश्वराच्या ठिकाणी ठेवणारा मनुष्य अत्युत्कृष्ट भगवद् भक्त होतो. धनकनकांत अत्याससक्ति बाळगणारा सोनार भक्त श्रेष्ठ पुरंदरास झालाच की नाही ! अत्यासक्ति हेच भक्तीचे लक्षण होय. ‘हे परमात्मा ! तूच मला मार्ग दाखव. दुसरा कोणताहि मार्ग मला सद्गति प्राप्त करून देणार नाही’ अशा भावनेने भगवंतास शरण गेल्यास तो दयार्द्र परमात्मा आपणास कधीहि विसरणार नाही.

खऱ्या भगवद्भक्ताला देहाभिमान असत नाही. त्याचे रक्षण भगवतच करतो. श्रीरामदास स्वामींना उसाच्या मळेवाल्याने उसाने बडविले तरी त्याच्या विरुद्ध एक शब्दहि न बोलतां या मळेवाल्याबरोबर भांडणाऱ्या आपल्या शिष्यांना त्यानी थोपविलें. अशाच रीतीने आपले सर्वस्व विसरून भगवंतास अनन्यभावाने शरण गेल्यास तो निश्चितपणे आपला उद्धार करील.

एकंदरीत श्रद्धा भक्तीच मानवाच्या उद्धाराचे प्रबळ साधन होय ! सगळे एका आवाजात म्हणा, ध्यान करा व तन्मय व्हा ! ‘त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेय सर्वं मम दीनबंधो॥’

सच्चिदानंदस्वरूप सर्वात्मा सर्वशक्तिमान अशा परमात्म्याच्या कृपेने तुमचे सर्वांचे जीवन दिव्य मंगलमय होवो !!

॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥ श्रीराम समर्थ ॥

श्री रामनामाचे वैशिष्ठय

श्रीरामरहस्योपनिषदाच्या पांचच्या अध्यायात श्रीमारुतीरायास श्रीसनकादि मुनीनी श्रीराममंत्राचा अर्थ सांगण्यास विनंती केल्याची मला आतां आठवण झाली आहे. ह्या अध्यायात श्रीराममंत्राचे महात्म्य संपूर्णपणे वणिले आहे. त्यातील काही गोष्टी मी सांगणार आहे. आपणांस सवड मिळाल्यास आपण तें उपनिषद वाचून पहावें.

‘नारायणाष्टाक्षरे च शिवपश्चाक्षरे तथा।

सार्थकार्णद्वियं रामो रमन्ते यत्र योगिनः॥ ‘ॐ नमो नारायणाय’ ह्या नारायणाष्टाक्षरी मंत्रातून रा’ अक्षर घेऊन व ‘नमः शिवाय’ ह्या शिवपंचाक्षरी मंत्रातील ‘म’ घेऊन | ती दोन्ही अक्षरे एकत्र आणल्यास, ज्या शब्दात ज्ञानयोगी अहर्निश रममाण होतात अशा ब्रह्मस्वरुपांस शोभेल असें नांव तयार झाल्याचे आढळेल तेंच ‘राम’ नाम होय. ह्या नावांत हरिहरांचे ऐक्य आहे. आणखो एक महत्वाची गोष्ट अशी आहे की, ‘र’ हे अग्निबीज असून ‘म’ हे मायाबीज आहे. ही दोन्ही एकत्र मिळून ‘राम’ हा शब्द झाला आहे. हा शब्द म्हणजे प्रकृति-पुरुषांचे, जीवेश्वर ऐक्यरुपच असे ब्रह्मस्वरुप आणि माया नष्ट करणारे स्वप्रकाशी आत्मरुप असें निवृत्तिमार्गीयांचे म्हणणे आहे.

प्रवत्ती मार्गाचे अनुकरण करणारे लोक आपल्या भावनेनुसार जोग्य असा भोग व मोक्ष देणाऱ्या मायोपाधिक परमेश्वरस्वरूपाची उपासना करतात. ‘तं यथोपासते तथैव भवति।’ असे असल्यामुळे ज्याच्या त्याच्या उपासना आपापल्या भावनेवर अवलंबून असतात. रामनामाची ‘तत्त्वमसि’ ह्या सामवेदातील एका महान वाक्याची तुलना करून त्याचे आणखी एक वैशिष्ठ्य तेथे दर्शविले आहे.

आद्यो रा तत्पदार्थः स्यान्मकारस्त्वम्पदार्थवान् । तयोः संयोजनमसीत्यर्थे तत्वविदो विदुः ॥’

पहिले रा’ हे अक्षर मायोपाधिक असून शुद्ध सत्य स्वरूप असणारा सगुण ब्रह्मांश, निर्दिष्ट करणारे असून दुसरे ‘म’कार है अविद्योपाधिक म्हणजे मलिन सत्व पदार्थरूपी जीवनास निर्दिष्ट करणारे आहे.’ त्वं’ पदातील दोन्ही अक्षरापैकी त्वं’ उच्चारतांच तोंड बंद करावे लागते ते ह्या ईशजीवाच्या भेदाला कारण झालेल्या मायोपाधीमा बाजूस सारून त्या दोघापेक्षां शुद्ध, निर्विकल्प आणि आनंदघनरूप असणाऱ्या चिन्मात्र ब्रह्माला दर्शविणारे ‘असि’ पद होय. जशा प्रकारे ‘राम’ हे नाम तू परब्रह्मस्वरूप आहेस असे दर्शविणाया ‘तत्त्वमसि’ ह्या वाक्यानुरूपहि आहे असे सांगितले आहे. हे झाले तत्त्वज्ञांचे मत.

‘प्रणदत्वात्सदा ध्येयो यतीनां च विशेषतः। राममन्त्रार्थ विज्ञानी जीवन्मुक्तो न संशयः॥

रामनाम हे प्रणवस्वरूप असल्यामुळे यतींनासुद्धा प्रणवाप्रमाणेच रामनाम सदासर्वदा आत्मस्वरूपाचे ध्यान करण्यासाठी योग्य आहे. तसेच राममंत्राचा अर्थ जाणणारा निःसंशय जीवनमुक्तच होय, असे येथे स्पष्टपणे म्हटले आहे. ‘मनुष्वेतेषु सर्वेषामाधिकारोऽस्ति देहिनाम् ॥’

राममंत्र म्हणण्यास अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वानाच सारखा अधिकार आहे. हेच ह्या मंत्राचे एक वैशिष्ठय होय. कबीरासारखे यवनसुद्धा ह्या राममंत्रामुळे पावन झाले असे इतिहास सांगतो. श्रीरामोपासनेचे मुख्य लक्षण कोणते? ह्या प्रश्नाचा आता आपण विचार करू या! श्रीराम रहस्योपनिषदाच्या प्रथमोध्यायात श्रीरामाच्या अंगदेवतांचा उल्लेख करून त्याच्या समवेत श्रीराममंत्र जप करावा असे सांगितले आहे. ह्या विधानाला अनुसरून वागणारास | ‘स रामो भवति । ‘ असे म्हटले आहे. दुसऱ्या अध्यायात श्रीरामाच्या सर्व प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख करून शेवटी श्रीसीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारूति यांचाहि एक मंत्र दिला आहे. सर्व मंत्राना ऋषि, छंदस्, देवता इत्यादींचाहि उल्लेख आहे. तृतीयाध्यायात मंत्रांचा क्रम वणिला आहे. चतुर्थाध्यायांत पुनश्चरणविधीचा विचार केला आहे. पाचव्या अध्यायात श्रीराम मंत्राचे | विवरण दिले आहे आणि सरते शेवटी ‘तदेतदृचाभ्युक्तस् ‘ असे म्हणून ‘सदा रामोऽहमस्मीति तत्त्वतः प्रवदन्ति य।न ते संसारिणो नूनं राम एव न संशयः॥’ असा श्लोक आहे. श्रीराम उपासनेचा मुख्य | क्रम हाच आहे असे मला वाटते व हा जर कोणी स्पष्ट केला असेल  तर तो श्रीमारुतीरायानेच होय. ‘कपिपतिर्दास्य। ‘ श्रीमारुती हेच दास्यभक्तीचे आचार्य होत. त्यांना असे म्हणण्यात काही विशेष अर्थ आहे. आर्यतत्त्वज्ञानच असे आहे. आर्यतत्त्वज्ञानाला भेद मुळीच ठाऊक नाही. तत्त्व जाणून म्हणजेच अधिष्ठान जाणून घेऊन जसे सोन्याने घडविलेल्या सर्व दागिन्यातील सत्यस्वरूप केवळ सोनेच असते त्याप्रमाणे सर्वांचे सत्यस्वरूप, आनंदरूप असे एकमेव ब्रह्यच आहे असे समजून अखंडित ‘मी अद्वितीय परब्रह्मस्वरूप श्रीरामच’ अशा भावनेनें, अनुभवाने, निश्चयाने कोण प्रगट करील? म्हणजेच सर्वांच्या ‘मी’ ह्या अनुभवाचे यथार्थरूप एकमेव आनंदधन परब्रह्मच आहे असे कोण ठामपणे सांगेल ? ‘ तो परब्रह्मस्वरूप मला श्रीरामाप्रमाणेच आहे’ असे मारुतिरायाने ‘ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति ।’ हा सिद्धांतच जणू काही सर्वासमोर ठेवल्यासारखे नाही का?

आतां श्रीरामाच्या स्वरूपाचे वर्णन कसे आहे ? याचा विचार करूया! रामहस्योपनिषदाच्या प्रारंभी श्रीसनकादि मुनी, ऋषी, प्रल्हादादि विष्णुभक्त ह्या सर्वांनी मिळून श्री हनुमंतास ‘सर्व वेद, शास्त्रे, पुराणे, अध्यात्मिक विद्या, सर्व प्रकारचे विद्याज्ञान, ईश, गणपती, सूर्य, शक्ति ह्यासर्वामध्ये मुख्य असे एकमेव कोणते तत्त्व आहे ?’ अशा विचारलेल्या प्रश्नास श्रीमारुतिरायानी ‘येतेषु चैव सर्वेष तत्त्वं च ब्रह्मतारकम् ।’ ह्या सर्वात तारक असे एक ‘ब्रह्म’ च मुख्य तत्त्व आहे, असे सांगितले आहे.

‘राम एव परं ब्रह्म राम एव परं तपः। राम एव पर तत्त्वं श्रीरामो ब्रह्म तारकम् ॥’

त्या परब्रह्म श्रीरामास आत्मरूप समजणे हेच श्रेष्ठ तप होय. श्रीरामच परतत्त्व होय व श्रीरामच तारक ब्रह्मरूपी प्रणव होय, असे उत्तर दिले.

‘रमन्ते योगिनोऽनन्ते नित्यानन्दे चिदात्मनि । इति रामपदेनासौ परं ब्रह्मांभिधीयन्ते ॥

ज्या निजानंदरूपी चिदात्म्यांत योगीजन अहर्निश रममाण होतात ते परब्रह्मरूपच ‘राम’ ह्या नांवाने ओळखले जाते, अशा अर्थाचा हा श्लोक श्रीराम पूर्वतापनीयोपनिषदामध्ये आहे. या श्रीरामोत्तरतापनीयोपनिषदामध्ये –

‘अकराक्षरसम्भूतः सौमित्रिविश्वभावनः । उकाराक्षरसम्भूतः शत्रुघ्नस्तैजसात्मकः ॥

प्राज्ञात्मकस्तु भरतो मकारक्षरसम्भवः।अर्धमात्रात्मको रामो ब्रह्मानन्दकविग्रहः ॥

श्रीरामसान्निध्यवशाज्जगदानन्दहायिनी। उत्पत्तिस्थितिसंहारकारिणी सर्वदेहिनाम्। सा सीता भवति ज्ञेया मूलप्रकृतिसंज्ञिका ॥

असे श्लोक आले आहेत. प्रणवाचे ‘अकार’ उकार ‘भकार’ आणि अर्धमात्रा अशा साडेतीन मात्रांत स्पष्ट विवरण केले गेले आहे. पिंडब्रह्मांडाचे जागृताभिमानी विश्व वैश्वानर हे होत. त्यांचा ‘अकार’ मात्रेत समावेश होत असून लक्ष्मणरूपी, पिंडब्रह्मांड स्वप्नाभिमानी देवता तैजस हिरण्यगर्भ होत. हे ‘ उकार’ मात्रेत समाधिष्ठीत असून शत्रुघ्नरूपी; तसेच पिंडब्रह्मांडसुषुप्त्याभमानी देवता प्राज्ञ-परमेश्वर होत. यांचा ‘मकारांत ‘ समावेश होत असून सरतरूपी होत. विशेषतः ह्या त्रिगुणात्मक ‘माया’ कार्यासाठी अधिष्ठानात्मक असे जे ‘निर्गुण ब्रह्म’ अर्धमात्रेने सांगण्यात येते ते | ते सच्चिदानंद विग्रह धीरामरूप होय, असे सांगून ब्रह्मरूप असलेल्या श्रीरामाच्या सान्निध्यवशात असलेली जगदानंददायिनी, सकल देहांची उत्पत्ति-स्थिति-सहकारिणी अशी मूळ माया श्रीसीता श्रीराम | स्वरूपानंच आहे असे विषद केले आहे.

तारसारोपनिषदामध्ये प्रणवाचे आठ विभाग कल्पून आठव्या विभागात शोभणान्या श्रीरामाला ऐक्य रूपाने नमन करणारा मंत्र अशाप्रकारे दिला आहे. कर ‘ॐ यो हवै श्रीपरमात्मानारायणः स भगवास्तत्परः (प्रकृतेपरः) परमपुरुषः पुराणपुरुषोत्तमः नित्यशुद्धबुद्धयुक्त सत्य परमानंदाद्वय परिपूर्ण परमात्मा ब्रह्मैव, वाहं रामोस्मि भूर्भुवः सुवस्तस्मै वै नमो नमः ।’

मुक्तिकोपनिषदांमध्ये श्रीमारूतिरायास श्रीरामानीं  सांगितले आहे की ‘तेदान्ते सुप्रतिष्ठोऽहं वेदान्ते समुपाश्चय’ ‘मी उपनिषदामध्ये सुप्रतिष्ठित आहे. माझ्यांत एकरुप व्हावयाचे असल्यास त्या श्रुति शिरोभागी असलेल्या उपनिषदांचा अभ्यास कर.‘ श्रीमामानी मक्तिकोपनिषदांत ‘गुरुपीठ’ सुशोभित करून श्रीमारुतीस १०८ उपनिषदांचा उपदेश केला आहे ते त्यांच्या

मयोपदिष्टं शिष्याय तुभ्य पवननत्दन । इदं शास्त्रं मयाऽऽ दिष्टं गुह्यष्मटोत्तरं शतम् ॥

ह्या उक्तीवरुन स्पष्ट होते. तुम्हाला मी हीच गोष्ट जास्त संक्षेपाले समजावून दिली आहे. तुम्ही ही उपनिषदे वाचून पाहिल्यास कदाचित याहूनहि अधिक प्रकाश तुमच्या मनावर पडेल.

ॐ तत्सत् ।

जय जय रघुवीर समर्थ

॥ श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

उपनिषदे

श्रीसमर्थांच्या प्रेरणेने येथे काहीतरी वाङ्मयसेवा व्हावी म्हणून आपण सर्व जमलो आहोत. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. सारखी होणारी तळमळ, असमाधान, अशांति जीवनांत आहे ती ज्ञानाने शांत होते. ज्ञानाशिवाय जीवाला शांति नाही. ज्ञानरहित मनुष्य पशुतुल्य आणावा ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. निरतिशय आनंदाची म्हणजे सर्वाधिक मंगल निरवधि सुखाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच ‘मोक्ष’ प्राप्त करून घेणे. मोक्ष म्हणजे बंधनापासून सुटका. बंधन म्हणजे संकल्प. संकल्प बंधनकारक. वासनेने जीव बद्ध आहे. ‘मी देह मज बंधन । ‘ मी देह आहे. विषयसुखामुळेच, जगाच्या सुखामळेच मी जगत आहे वगरे ह्या सर्व वासना बंधनकार आहेत. ह्या सर्व वासनापासून सुटका करून घेणे हे ज्ञान आहे. या तत्त्वाची ओळख करून न घेता, जशी मुलें इतस्तत: फिरूं लागतात तसेंच खऱ्या सुखाची जाणीव नसल्यामुळे हे सर्व जग मृत्युभयाने  व्यापलेले आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। जे आपलेच शाश्वत आनंदरुप आपणांस प्राप्त होत नाही, त्या अक्षयसुखाची ओळख आपणांस पटत नाही तोवर, ते असूनहि त्याची भावनाच आपणास नसल्याने विस्मृतिमुळे एवढा घोटाळा होतो. अशा रितीनें हे सर्व जग मृत्युरुप, भयरुप आहे. कोठपर्यंत? तर आत्मज्ञान होईपर्यंत. दु:खाचे तरंग अलोट, असंख्य येत असतात. जग हे विस्तवाचे अंथरुणच । आहे. ह्यात सुखनिद्रा कसली? आपण हे सर्व मानलेले आहे. ह्या अंज्ञानाच्या निवृत्तीसाठी ज्ञानप्राप्तीची आवश्यकता! हे सर्व जग कसे झाले ? ह्याचा कर्ता कोण? ह्याची जाणीव करून घेणे म्हणजेच ज्ञान तें पूर्णरूप. ज्याने जीव मुक्त होतो तें, तेंच पूर्णरूप असें वेदांत म्हटले आहे. ज्यायोगे तें ब्रह्मरुप, ज्ञानस्वरुप, तो अनंत आनंद जाणला जातो तो वेद.

श्रुति सुद्धा म्हणते- ‘पूर्णत्वात पुरुषः। तें पूर्णरूप मी जाणतो. परमात्म्याचे जे ज्ञान वेदरूपाने सांगितले आहे तो परमात्मा अगाध, अगम्य आहे. मनाची धांव तेथे पांगुळते, खुंटते. वेदांत आत्मज्ञान सांगितले असल्याने ते परमात्म्यानेच सांगितले आहे हा सिद्धांत आहे.

उपनिषदांतहि आत्मज्ञानच, पूर्णस्वरुपाचे ज्ञान सांगितले आहे. श्रीरामाने सुद्धा ‘मुक्तिकोपनिषदात’ हेच सांगितले आहे. मी कोठे असतो? कोठे सांपडतो? कोणत्या वाङ्मयांत माझी ओळख होते? । ‘मी उपनिषदांत आहे’ असे श्रीमारुतीरायास सांगितले आहे.

‘मी जेणेकरून ह्या बंधनातून मुक्त होईन असा उपाय मला सांगा’ असे श्रीमारुतीरायाने विचारले असतां श्रीराम सांगतात याज्ञवल्क्य म्हणतात, खरें खरें उकलून सांगणे हा गुरूचा गुण आहे. माझा जर तत्वतः ओळख करून घ्यावयाची असेल तर ‘वेद’ बघ. वेदाच्या शेवटी आत्मज्ञान झालेले आहे. माला उपनिषद’ म्हणतात. ‘उप’ म्हणजे ‘समीप’ उप हे पद उपनिषदांस का आहे ? आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर गालाच शरण जायला पाहिजे. हे गुरूगम्य आहे. तें आत्मतत्त्व, खरें संख, खरा आनंद जाणण्यासाठी हातांत समिधा घेऊन गुरुकडे जावें. श्रीगरुस श्रोत्रीय व ब्रह्मनिष्ठ अशी दोन पदे आहेत. श्रुतिस्मृतींचे ज्याला पूर्ण ज्ञान आहे तो नुसता शास्त्रज्ञ असून उपयोगी नाही. खिरीत पळी सारखी बुडून असते. ती खिरीत सदैव असूनहि तिला खिरीची चव माहित नसते. नुसते शास्त्रज्ञान विपुल आहे पण अनुभवाचा ओलावा त्यात नसेल तर त्यात मन रमत नाही, एखाद्या उद्यानाचे नुसते भरपूर वर्णन आणि प्रत्यक्ष पाहून अनुभव घेणे म्हणजेच अनुभवाचा आनंद त्यात ओतप्रोत भरलेला असतो.

गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः॥‘ हया वृत्तीचा निष्ठावंत असावयांस पाहिजे. तो आत्मानुभवी, आत्मसुखाने तृप्त पाहिजे. त्याच्याकडे पाहिले की त्यात वैराग्य डोकावते, हे समाधान मिळाले पाहिजे.

संन्याशालाच उपनिषदांचा अधिकार. हे ज्ञान शिष्यास त्याने शास्त्र विचारल्यावर, तो शरण आल्यावर, सोने बावनकशी आहे की नाही हयाप्रकारे त्याला कसाला पडताळून पाहून मग बोध करावयाचा असतो. जो त्रिविध तापे पोळला’ तोच योग्य.

या आत्मज्ञानाचा अधिकारी कोण? तर साधनचतुष्टयसंपन्नच त्याचा अधिकारी. साधन, नित्यानित्यविवेक, शाश्वत-अशाश्वताचा निवाडा करणारा. जे उत्पत्तिनाशयुक्त्त ते अनित्य. म्हणून तेथे शाश्वत सुखाची, नित्यसुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग ते नित्यसुख प्राप्त करुन घेण्याकरीता गुरु केलाच पाहिजे. त्यासाठी गुरुकडे चला!

जे उत्पन्न झालेले ते ‘सर्व’ कार्य आहे व अनित्य आहे. म्हण ‘नित्य ‘ हे दुसरे काही तरी आहेच व जे कारणरूप तेच नित्य होय

‘ज्याने विठ्ठलमात्रा घ्यावी । त्याने पथ्य सांभाळावी।’ हे परमात्मसुख तुला पटले असेल तर दुसरीकडे जाऊ नकोस. सुख पाहिजे ना! मग तुझे मन, इंद्रिये सर्व परमात्म सुखानेच परिपूर्ण भरलेली पाहिजेत. सुख म्हणजे राजमार्ग. परमात्म्याकडे जावयाचे. दुसरीकडे जावयाचे नाही. तिकडे डोळे झांकणी करावयाची. पुन्हा तिकडे वळावयाचे नाही. सुख म्हणून तिकडे न बघता जेवण, स्नान, संध्या इत्यादि व्यवहार म्हणूनच करावयाचे. स्नानाने बाहयशुद्धी व संध्या म्हणजे परमात्मप्राप्ती. दोन्ही सुखच.

चित्रांत पाण्याचे दृश्य पाहिल्यावर त्याचा भास होतो पण पाणी प्यायला मिळत नाही. तसेच जगात सुख भासते, दिसते पण अनुभवास येत नाही, जे सुख अनुभविल्यानंतर विरस अनुभवावयास मिळतो हेच जर लक्षात ठेवले तर पुन्हा त्याच्या नादी लागणार नाही. हे अथवा असे पारलौकिक सुख जर दैहिक असेल, ते बाहयपदार्थापासून प्राप्त होत असेल तर ते शेवटी ऱ्हास पावत जाऊन क्षीण होत जाते. पण सुखाची व्याख्या काय? जे अक्षय्य आहे ते. आणि हया सुखाला क्षयरोग झाला तर?

‘जे शाश्वत, अक्षय तेच सुख ‘ असे संत म्हणतात. संत म्हणजे जो शाश्वत अशाश्वताचा निवाडा करतो तो संत जाणावा. ‘जो नित्य शाश्वत वस्तु कारणरूप आहे तीच हृदयाशी बाळगून, अनित्य सर्व जाणून घेऊन ते सर्व किटाळ काढून हृदयसिंहासन चांगले स्वच्छ करून, शाश्वत सुस्वरूपी परमात्म्याची त्यावर स्थापना करतो तो विवेकी ! जे भ्रांत, विषयी ते बाहयसुखालाच लोलूप असतात. कस्तुरीमृगाला कस्तुरीचा वास येतो परंतु तो मात्र तो शोधण्यात सबंध रान हिंडत असतो. ‘तुझे आहे तुझपाशी । परी जागा चुकलासी ।’ लालयेत् चित्तबालकम् । ‘लहान मुलांना आपण हे खाऊ नको, ते खाऊं नको असे सांगतो. तसेच मनाला युक्तीने गोंजारून विषयसुख काढन घेऊन खडीसाखरेच्या खड्याप्रमाणे परमात्मसुख त्याच्या हातावर ठेवावें.

यासाठी शम, दम पाहिजे. प्रथम ‘शम’ पाहिजे. मन हे चंचल आहे त्याला अभ्यासाने काबूत ठेवावें. ‘मन गया तो जाने दे । मत जाने दे शरीर। अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते।’ निग्रहानें, विवेकानें, अभ्यासाने मनाला आवरून धरावें, रोग्याला जसें कुपथ्य होऊ नये म्हणून आपण आवरून धरतो की नाही तसेंच.

जगांत पहा ! राजा असो, महाराजा असो, त्यालाहि दुःखाचे क्षण येतातच, सर्व अनुकूलता असतेच. निसर्गाकडे पहा. उन्हाळा आहे, पावसाळाहि आहे. तितिक्षा म्हणजे सहनशीलता व उपरति म्हणजे आत्मस्थितीचा अभ्यास करीत, सेवा करीत, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे काम करून मनाची बाह्य धांव थांबवून ते अंतर्मुख करणे, पश्चात्ताप करणे, संतसंगतींत भक्तिप्रेमाचा अभ्यास करून आतां पावेतोंचे सर्व सोड़न ह्या पुढील काळ सार्थकी लावणे.

कित्येक वेळी ‘आमचेच गुरु पूर्ण विद्वान कशावरून ‘ वगैरे शंका येतात, त्या नकोत. श्रद्धा पाहिजे. असुया नसावी. शिष्य कसा शरण यावा तर निर्ममो निरहंकारः।’ अहो, मग काय, गेलेच कि सारें! गुरुची आज्ञा अनन्यभावाने, श्रद्धेने पाळावी. ही श्रद्धा उत्कट पाहिजे. समाधान पाहिजे. अरे ! गुरुसन्निध राहून तूं शाश्वताचे साधन करतो माहेस मग असमाधान कां? मी जर श्रद्धेने साधन करीत आहे तर बाज ना उद्या सुखप्राप्ती होणारच.

घडा भरतां भरतां भरेल. तूप खाल्ल्याबरोबर रूप कसे येणार? जर अश्रद्धा निर्माण झाली तर गुरुचा, शास्त्रांचा द्वेष करतात. तसें करू नये. मुमुक्षूत्व पाहिजे. मृगजलापासून निसटून खऱ्या सुखाची ती इच्छा पाहिजे. याच क्षणी ‘याच जन्मों, येणेंची काळे संसारीं होईल निराळे । ‘ असे पाहिजे. ‘पाहीन मुक्तीचा सोहळा ।’ असें पाहिजे.

सम्यक् प्रशान्तचित्ताय –.’ तो कसा आहे? हे खावें, तें खावें, इकडे तिकडें मन धांवत आहे. असा शिष्य तो मारून मुटकन आला आहे हे पहावें, वैराग्य उत्पन्न होते पण तें टिकतें कां? कांही वेळा बायको वगैरे भांडली म्हणजे माणसें आमच्याकडे येतात. पण ती जरा गोड बोलली म्हणजे परत जातात. ज्याच्या चित्तांत विषयाचे चिंतन असत नाही तोच शांत चित्त’ म्हणवून घेतो.

मनाचा निग्रह पाहिजे. विषयांत सुख नसून तो आभास आहे. जसें फूल तोडून घेतले तर त्याचा वास क्षणिक येतो पण पुढे टिकत नाही तसेंच ह्या जगातलें सुख आहे. हे पहा, स्वप्नांत दिसणारे पद जागृतींत कधी तरी अनुभवावास मिळतें कां? कधीच नाही, तो एक आभास आहे.

‘उपनिषद ‘ गुरुजवळ जाऊन शिष्याने हे ऐकावयाचे असते. ‘उप’ म्हणजे गुरुजवळ जाऊन त्यांच्या ठिकाणी अचल श्रद्धा ठेवून त्यांची सेवा करीत रहावयाचें. सेवेने हृदय उमलतें. सेवेने आपोआपच अनुग्रह होतो. मुद्दाम होऊन तो उचलून डोक्यावर घेतात त्यात काय आहे ! सेवा चार प्रकारच्या, स्थान, भाव, अंग व आत्मा.

स्थान पवित्र ठेवणे, छाट्या वगैरे स्वच्छ ठेवणे. सद्गुरु हे आनंदरूप आहेत असा विश्वास, श्रद्धा ठेवणे ह्या निष्ठेला भाव’ म्हणतात. ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।‘ वेळ, काळ पाहून गुरु प्रसन्न असतांना तेहि विनयाने, आपल्या निष्ठनें, सेवेनें, निश्चयाने। सद्गुरु मुखांतून निघणारे शब्द आहेत त्यांवर विश्वास ठेवला तर निश्चयाने मोक्षप्राप्ती होते. हा ‘नि’ चा अर्थ आणि ‘षट’ म्हणजे वेगळं करणे, शिथिल करणे व नष्ट करणे. संसाराच्या मोहापासून, देहात्म भावापासून मोकळे करते आनंदाचे आभास नष्ट करते. हा पडदा गेला की आनंदाची प्राप्ती आहेच.

श्रीमारुतीरायाला श्रीरामानी सांगितले की “तू अज्ञानाचा नाश करण्यासाठी वेदांचा अभ्यास कर.’

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।’ आपण जे बघतों की नाही, तें सारें उत्पत्तियुक्त, विनाशी व केलेले म्हणजेच कार्य. तेव्हा ह्याला कारण कांहीतरी असेलच असेल असें श्रुति सांगते. कार्यापूर्वी असणाऱ्या कारणाचा शाश्वत आनंद होतो तो मिळवलाच पाहिजे. गाय

मातीपासून तयार होणारें मडकें मातीपासून वेगळे कसे होणार? म्हणून जे कारण स्वमात्र त्यापासून झालेले पूर्णच आनंदरूप असणार. मनुष्याची संतति मनुष्यच. सिंहाचा छावा सिंहच. परमात्मतत्त्वाचे तुझ्या शरीरांत असणारे बिंब, सूर्यात असणारे व इतर कोणत्याहि विकार आकारांत असणारेंहि तेच हे कारणरूपहि पूर्णच. बियापासून निघणारा कोंब तद्रूपच असतो. हे जग ज्यामुळे पूर्ण, तें कारण रुपहि पूर्णच. दागिना सुवर्णरूप आहे. सोने आहे म्हणून दागिना आहे. हे जग ज्यामुळे सुखरूप बाटतें तें कारणहि सुखरूपच. तें तेवढे निवडून घेतले म्हणजे झाले! वर जो ‘पूर्णस्य पूर्णमापाय पूर्णमेवावशिष्यते।’ सांगितला आहे तो तेच सांगतो.

सिंह सोन्याचा केला तर त्यापासून भीति वाटेल कां? तो आपल्या घरी ठेवून ते आपलें वैभव वाटेल. तसेंच जर हे जग सुखरूपींच आहे. म्हणन अनभव आला तर तें परमात्मस्वरूप तुम्ही ओळखलें तर भीति कसली? असें सोन्याचे फूल करून ठेवले तरी तुम्ही तें हुंगणार नाही तसेंच जय हे जग तुम्ही पाहूं गेलात तर या जगातील दुःखाची कल्पनाहि तुम्हाला न देता केवळ आनंदाची निर्ममत्वाची, पूर्णानंदाची प्राप्तीच. उपनिषदे हेच सांगतात.

‘मी’ हे ज्ञानरूप आहे. मी म्हणजे आत्मस्मृति. मी सुखी आहे. म्हणताना सुख तुझ्यांतूनच निर्माण झाले की नाही? जसा पाण्याचा तरंग तद्रूपच असतो तसे मी ही स्थिति ज्ञानानंदसमच. मग ही परमानंद स्थिति. ‘तयां पाहता पाहता तेंचि झालें।’ दृश्य असलेले हे जे रूप में ओळखून त्यांतील शाश्वत आनंद जाणून तद्रूपाने राहाणे हेच कार्य.

उपासनेचे खरे स्वरूप व ज्या शाश्वत आत्मीय आनंदाची ओढ आपणाला लागलेली आहे, तें तत्त्व उपनिषदांत सांगितले आहे. उपनिषदांच्या अध्ययनाने आत्मसाक्षात्कार होतो.

गुरुजवळ जाऊन त्यांना शरण जाऊन त्यांना प्रश्न केले म्हणजे अज्ञान, भ्रांति वगैरे नष्ट होऊन गुरुकृपेनें निरतिशय आनंदाची प्राप्ती होते. वेदांताचा अधिकारी कोण? तर साधनचतुष्टय साधणाराच ह्याचा अधिकारी होतो.

आचार्यांनी ‘ ईशावास्य’ अर्थाला प्रारंभ करण्यापूर्वी उपोद्घात केला आहे त्याचा विचार प्रथम करूं या!

‘ईशावास्यमिदम् ‘ हे मंत्र कर्मप्रधान नाहीत. उपनिषदाच्या उपोद्घातांत कर्म को भक्ति आहे ? हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदाचे आहे. यजुर्वेद दोन. कृष्ण व शुक्ल. सूर्यापासून याज्ञवल्क्याने मिळविलेला शुक्ल यजुर्वेद. काण्व उपनिषद संहितेत येत नाही पण हे उपनिषद संहितेंत येते. हा त्याचा चाळीसावा अध्याय आहे. संहितेत उपनिषद कर्मप्रधान आहे म्हणून याचा ज्ञानप्रधान अर्थ लावू नये म्हणून काही म्हणतात, पण आचार्य म्हणतात की उपनिषद ह्याचा अर्थच ज्ञानप्रदायक. तेव्हा कात ह्यांचा उपयोग नाही व तसा अर्थ कोणी करूं नये. ज्याची प्राप्ती कर्माने होत नाही अशा आत्मस्वरूपाची लक्षणे उपनिषद दर्शवित असल्याने आम्ही ह्यांचा अर्थ आत्मज्ञानपर केला आहे. कर्मशून्य, कर्मरहित, कर्मअनपेक्ष. कर्माची अपेक्षा ज्याला नाही, कोणत्याहि कर्माचे फळ जें होत नाही त्याची साधने उपनिषदांत आहेत.

उपनिषदाचा हेतु आत्मप्राप्तीची साधनें सांगणे. त्याचे साधन कर्मत्याग आहे. तेव्हा त्याचा अर्थ कर्मप्रधान लावल्याने तें यथार्थ होणार नाही. हे उपनिषद संहितेत मोडत असले तरी तें उपनिषद असल्याने व त्याचा अर्थ आत्मप्राप्ती व साधन कर्मत्याग असल्याने त्याचा अर्थ आम्ही कर्मप्रधानयुक्त लावीत नाही.

कर्माने ज्या सुखाची प्राप्ती होते त्याला देह, इंद्रिये पाहिजेत. बाह्य पदार्थापासूनच, विषयांपासून सुख होते अशी वासना पाहिजे व ज्ञानप्राप्तीला तर हयाची आवश्यकता नाही. बाहय इंद्रिये, विषय, पदार्थ, मनोधर्म, वृत्ति या सर्व अशाश्वत आहेत. मग त्यापासून शाश्वत सुख कसे मिळणार? वाहत्या पाण्यांत एक आचमन करून दुसरे आचमन करीपर्यंत दुसरेंच पाणी असते तशाच हया वृत्ती चंचल असतात, बदलून असतात. लहान मुलास जसें आतां एक तर मग दुसरें लागते. आतां दूध प्यावेसे वाटते तर मग ताक प्यावेसे वाटते. हे सारे अशाश्वत आहे. तेव्हां नष्ट होणाऱ्या इंद्रियांपासून, विषयांपासून, वृत्तीपासून, पदार्थापासून प्राप्त होणारे सारें चंचल, अशाश्वत, क्षणभंगुर आहे.

तात्पर्य, हे आत्मसुख नित्य, निर्विकार, जन्मरहित आहे. परमानंदकारक शाश्वत आनंदाची प्राप्ती आपणास इष्ट असेल तर अशाश्वत पदार्थापासून, बाहयपदार्थापासून ती कशी होणार ? कर्म कां करावयाचें ? ब्रह्मचर्याश्रम, गहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम असे हे चार आश्रम सांगितले आहेत. बाबा! असा हा धोपट मार्ग आहे. ज्यांना विषयाची इच्छा आहे त्यांनी विषयांत सुख नाही हे जाणून त्याचा त्याग करण्याकरता आहे. तुला वैराग्य हवे आहे का ? नाही तर पुराणवैराग्य असावयाचे, नाही तर श्रीधरस्वामींनी सांगितला म्हणून वाटते. पावसाळ्यांतल्या कोंबासारखे व्हावयाचे !! तुझ्यांत । त्याचे बीज आहे का? हे जग म्हणजे विषयसुखाचें प्रलोभन. तुला खरेच वैराग्य असेल तर दगडावर पडलेल्या अग्निसारखे होईल. ज्याला वैराग्य प्राप्त झालें तो सुख म्हणून जगाकडे पहाणारच नाही. तुला बासुंदी वगैरे पंचपक्वान्ने समोर असतानासुद्धा वासना नसेल तरच उपयोग; नाही तर चोरून खाण्याची इच्छा व्हायची. मग सरळ जेवावयास बैस, खरेच वैराग्य असेल तर निवृत्तिमार्ग.

कर्माच्या त्यागांतून शेष उरतें तेंच खरें सुख. तेच आत्मरूप. म्हणून शाश्वत. आनंदाची प्राप्ती ना कर्मानें, ना देहानें, ना जन्माने, ना यज्ञानें. कर्माने सारे ऐहिक सांगितलेले आहे. जे जगाच्या उत्पत्तीपूर्वी होतें तें आनंदघन, आपले स्वरूप, त्यासाठी ह्याचा काय उपयोग? दुःखनिवृत्तीसाठी सुखाची इच्छा दुःखाच्या अभावांत कोणाला सुखदायीं होईल कां? मला कडबोळी खावीशी वाटतात. केव्हां? वृत्ती उठते तेव्हां पण तेथे वृत्तीच नाही मी कोण? तर वृत्तींच्या पूर्वीचा. मग तेथे काय? एक आनंदच. वृत्तीचे चांचल्य जगद्भाव, विषयवासना, पदार्थसुख निर्माण करते. मग वृत्तीच नष्ट झाल्यानंतर तेथें हैं दुःखकारक कसें असणार? म्हणजेच वृत्ती ह्याला कारण. मग ती नष्ट झाल्यावर मी एक, अखंड, निर्गुण निराकार आनंदरूपी उरतो. मी अनेक देह धरले व सोडले. कां? म्हणाल तर ह्या पदार्थसुखासाठी, जगाच्या वासनेसाठी. मग त्याला लोकोद्वार म्हणा की खिचडी खाण्याची इच्छा म्हणा! पण जेथे जग नाहींच असें माझें जें नित्य निर्विकार स्वरूप तेथें ही वासना कोठून असणार? ईशावास्य उपनिषदाचा अर्थ मी ज्ञानपर लाविलेला आहे. पूर्वपक्ष म्हणतो. येथे कांहीं आत्मस्वरूपाचे वर्णन केले आहे का ? ज्याला सर्व आत्मस्थितीच बाणली आहे त्यास या जगाचे दु:ख काय कळणार? ह्याचा अर्थ ज्ञानपर का केला? शुद्धत्व, एकत्व, नित्यत्व वगैरे आत्म्याचे चे वर्णन ह्यांत असल्याने आम्ही ह्याचा अर्थ ज्ञानपरच केला आहे. शुद्धत्व, एकत्व वगैरे ही लक्षणे कर्मपर नाहीत. त्यांचा कर्माशी विरोध आहे, ती कर्माशी विलक्षण आहेत. ही लक्षणे कर्माशी संबंधित नव्हेत म्हणून त्यांचा कर्माशी विनियोग करणे युक्त होईल.’

कर्माने काय होईल ? कर्म हे पदार्थाचे उत्पत्तिमत्व. तू विकारी आहेस, त्याची प्राप्ती करून घे. त्याचे चांगले गुण वाढव असें सांगतें व कर्तत्व भोक्तृत्व अशा ठिकाणी आहे असे सांगते. पण आत्मस्वरुपाचें ठिकाणी हे कांहींच नाही. पदार्थ हे विकारी आहेत. आपले गुण कालांतराने बदलतात हे पदार्थ दाखवितात. रूपांतरित होणे हे विकाराचे लक्षण आहे. ‘पूजाद्रव्य वगैरे प्रोक्षण करा ? आपल्यालाहि प्रोक्षण करावयास सांगतात. कां तर आपल्याला शुद्ध व्हावयाचे म्हणून.

अशा दृष्टीने कर्मात कमीत कमी आत्मत्त्व, भोक्तृत्व असें सारें दिसून येते. खरोखर कर्तुत्व, भोक्तृत्व ही आत्म्याची लक्षणे नव्हेत. तशी असती तर आत्मस्वरूपाची प्राप्ती कर्माने होते असे म्हटलें असतें. पण आत्मस्वरूपाचें सुख पदार्थाप्रमाणे चंचल, दुःखकारक, वीट आणणारे नसून अविट, शाश्वत, आनंदकारक सुख आहे. म्हणून हयाचा अर्थ आम्ही आत्मज्ञानपर लाविलेला आहे. पदार्थाचे यथार्थ व दाखविणे हैंच उपनिषदांचे कार्य. सर्व उपनिषदांची परिसमाप्ती आत्मस्वरुपाची प्राप्ती करून देण्यांतच होते.

गुणातीताची, भक्ताची, स्थितप्रज्ञांची लक्षणे हि विषयसुख भोगण्याची नव्हेत. म्हणून आम्ही याचा अर्थ कर्माला अनुकूल होईल असा न लावतां, दुःखकारक कर्माचा त्याग सांगणारी असल्यामुळे जी लक्षणे जन्ममरणशून्य अशी आहेत, आत्मज्ञानपरच आहेत. म्हणून त्याचा अर्थ आत्मज्ञानपर लाविला आहे. आत्मा अनेक आहे. तूं ‘मी’ म्हणतोस. जितक्या व्यक्ति तितक्या प्रकृति. तूं जेवलास तर ह्याचे पोट भरेल कां ? एकाला हाक मारली तर दुसरा येणार नाही. हा पूर्वपक्ष आहे. जीव हा कर्तृत्वप्रधान व भोक्तृत्वप्रधान आहे. ‘पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभवः।’ मी पापी आहे असे आपण म्हणतो की नाही. लहान मुलाला श्रुतीची गोष्ट सांगावयाची तर अगदी सुलभ सांगावी लागते. पहा! तूं अकर्म केलेस मग प्रायश्चित्त घे. म्हणजे आत्मा हा विकारी आहे वगैरे त्याची योग्यता आत्मा हा अविकारी आहे हे सांगून पटण्याइतकी नसल्याने त्यांच्या शब्दात सामान्य लोकाकरितां कर्माचे विधान श्रुतीने केलें. देहाचा अभिमान न धरतां कर्म केले तर काय होईल? तर ते म्हणतात, ‘देहाच्या अभिमानाशिवाय कर्म कसे करणार?’ ब्राह्मणजातीची कर्मे करावयाची म्हणजे ब्राह्मणत्वाचा अभिमान पाहिजे. तो नसल्याने म्हणूनच शेंडी काढतात, ‘तुमचे काम नाही. तुम्ही आपला जप करा’ असे म्हणतात की नाही! अर्थात हा संपत्तिमान विद्वान व बलिष्ट पाहिजे. धुरांत कुंडाजवळ दोन दोन तास बसावे लागते. तो बलिष्ट असला पाहिजे. त्याचे ठिकाणी अंगकैवल्य असतां कामाचे नाही. जन्म कर्मशून्य आहे. तेथे कोण ब्राह्मण व कोण शूद्र ? त्या त्या वर्णाला व त्या त्या आश्रमाला तो तो अधिकार पाहून ती ती कामें सांगितली आहेत. आत्मसुखाची प्राप्ती करून देणारे हे मंत्र आहेत. देहसुखाचें व अज्ञानाचे निवर्तन करणारे हे मंत्र आहेत. शोक-मोहाची, कर्माची व विषयाची निवृत्ति करणारे आहेत. आत्मरूप हे नित्य, शाश्वत, निश्चल, निर्विकारी आहे. विषयाची वृत्तीच तेथें नाहीं.

ह्या ठिकाणी अनुबंध चतुष्टय सांगितली. आहेत. जो मोक्षाची इच्छा करतो, जो विरक्त तोच केवळ हयाचा अधिकारी आहे. केवळ चिन्मात्र आनंदघन स्वरूप प्राप्त करून घेण्याची इच्छा करतात तेच याचे अधिकारी. जे शाश्वत ब्रह्म तेच हयाचा विषय. गुरु-शिष्य हा संबंध आहे हे प्रतिपादन करण्यासाठी हा ग्रंथ आहे. आत्मानंदाची प्राप्ती हेच हयाचे प्रयोजन आहे. जो शाश्वत परमानंद आहे, त्याची प्राप्ती हाच ह्याचा विषय आहे.

॥ सर्व जनाः सुखिनो भवन्तु ॥

॥श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥श्रीराम समर्थ ॥

ब्रह्मप्राप्ति

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि धिताः। अथ मोऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्रुते ॥ (कठ. २-३/१४)

‘नष्ट होणाऱ्या, मृत्यु पावणाऱ्या देहास ‘मी’ असे म्हणून, अभिमान धरून आपणहि मर्त्याप्रमाणे बनलेल्या हया जीवाच्या अंतःकरणात खोलवर रुतलेल्या विषयवासना ज्यावेळी समूळ नष्ट होतील त्यावेळीच हा जीव आनंदरूपाने उरून अविनाशी होईल आणि तेव्हांच त्यास ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल’. असे कठोपनिषदात यमधर्माने नचिकेतास सांगितले आहे.

यत्तदद्रेश्यमग्राह्यमगोत्रमवर्णम् । अचक्षुः श्रोत्रं तदपाणिपादम् ॥

नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं ।  यद्भूतयोनि परिपश्यन्ति धीराः ॥’ (मुंड. १-१/६) -70

अदृश्य, ग्रहण करण्यास शक्य नसणाऱ्या सर्व लक्षणशून्य, ज्यास गोत्रसूत्र नाही अशा सर्व वर्णाश्रमशून्य असणान्या, हस्तपादशून्य, नेत्र श्रोत्रशून्य, नित्य, सर्वरुपी, सर्वव्यापी, आकाशाहून सूक्ष्म असणाऱ्या, अविनाशी सर्वकारण अशा त्या आनंदरूप असणाऱ्या ब्रह्मास बुद्धिवान सर्वत्र पहात असतो.’ असे मुंडकोपनिषदात सांगितले आहे.

ज्याप्रकारे दुर्योधनाने बलवान असणाऱ्या यादव सैन्याची मागणी केली तर अर्जुनाने बलवान अशा श्रीकृष्णासच निवडले, त्याचप्रकारे अज्ञानी जन सुख म्हणून सृष्टीतील पदार्थाची निवड करतात तर विवेकीजन सुख म्हणून परमात्म्यास निवडतात. श्रीकृष्ण परमात्म्यास आपणाकरिता निवडल्यामुळे अर्जुनास यशाची प्राप्ती होऊन साम्राज्यहि मिळाले त्याचप्रमाणे सुखाकरता परमात्म्यास निवडल्यामुळे विवेकी जनांना शांतिसमाधानाचा लाभ होऊन ब्रह्मसुखसाम्राज्य अनुभवास येते, अविवेकी अज्ञानी हे, कार्यच सुखरुप समजतात व विषयसुखासाठी धडपड करीत दु:खरुपी बनतात तर विवेकीजन परमात्मसुखासाठी धडपड करून शेवटी सुखरूप बनतात.

ह्या जगाला परमात्मा हाच मूळ कारण नाही का? परमात्म्याहून जास्त सुख ह्या सृष्टीतील पदार्थापासून कधी तरी लाभेल काय ? खरे सुख, खरा आनंद म्हणजे ते परमात्मस्वरुप होय. आनंदप्राप्तीसाठी आपण परमात्मस्वरुपच प्राप्त केले पाहिजे नाही का? विचार करून पहा. खऱ्या आनंदाचा यथार्थ विचार करून, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठीच, होण्यासाठीच हा नरदेह आपणाला लाभला आहे. इतर सर्व योनीमध्ये भोगच प्रधान असल्याने त्यांना ‘भोगयोनी’ असे नांव आहे. ह्या मनुष्य योनीत ‘त्याग’ च मुख्य आहे. सत्यसुखाचा निश्चय करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील होऊन तें प्राप्त करून घेणे हे मानवी जीवनाचे एकमेव प्रमुख ध्येय आहे. वैषयिक इच्छापूर्तीसाठी धडपड केली तर- ‘इदं च नास्ति परं न लभ्यते’ असे होईल. नष्ट होणारे विषयसुख केव्हांहि नष्ट होतेच व त्या कालापव्ययांत मोक्षहि हातचा परत जातो. जागतिक जीवनांत द्वेष, कंटाळा, तिरस्कार निर्माण न करणारे कोणते सुख आहे ह्याचा शोध घेऊन, शाश्वत सुख कोणते ते ओळखून त्याच्या प्राप्तीसाठी आपले जीवन पणास लावा. देहानें तिरस्कारणीय दुर्गंधीत भोग अनुभवून नरकास पात्र होऊ नका! मी ‘स्त्री’मी ‘पुरुष’ असा ह्या घाणेरड्या देहाचा अभिमान बाळगून दैन्ययुक्त जीवन व्यतीत करण्यापेक्षां परमात्मस्वरूपाच्या स्मृतीने आनंदरूप होऊन जीवन जगणे कितीतरी श्रेष्ठ आहे तें तुम्हीच पहा.

‘अहं ब्रह्मास्मि’ रूपी स्वरूपाची स्मृतीहि आभास निर्माण करते.  त्यामुळे ते केवळ एक आनंद म्हणून न मानतां निर्विकल्प असणाऱ्या श्रुतीने जरी बोध करावयाचा असल्यास ‘अहं ब्रह्मास्मि’ भावना होण्याइतके पुढे गेलों तरी खऱ्या आत्मस्थितीत असल्यासारखे होत नाही, असे म्हटल्यावर रजोरेताच्यामुळे उत्पन्न झालेल्या ह्या देहाच्या ठिकाणी ‘मी’ म्हणून भावना ठेवणे किती खालच्या पातळीचें ? व किती पराकाष्ठेची मूर्खता आहे ? याचा तुम्हीच विचार करा! खरें पाहिले तर भोगाच्या दृष्टीने असलेला देह अत्यंत अपवित्र असतो हे सांगावयास पाहिजे काय ? कोणतें योग्य व चांगले आहे हे दुसऱ्याना देहदृष्टीने न पाहतां आनंदरूप अशा ब्रह्मदृष्टीने पहाण्याने स्वरूपाचा उद्धार अनंत अशा सुखाचा लाभ होतो.

आनंद हे जगत्कारणरूप अशा ब्रह्मतत्त्वाचे स्वरूपलक्षण बनलेलें आहे. नाम रूप हे जगाचे लक्षण होय. जगाच्या पूर्वीच असलेल्या आनंदास जगांत संबंधित असणारी नाम-रूपे नाहीत. तो आनंद नामरूपरहितच असून अद्वितीय असल्यामुळे तोच एकमेव ह्या चराचर विश्वाचे, तुमचें, आमचे स्वरूप आहे असे तुम्ही को गृहित धरीत नाही? त्या आनंदातच देहभान हरपून आनंदमात्र कां रहात नाही?

स्त्री-पुरूष, पशु-पक्षी इत्यादि स्थिर-चर प्राण्यांना त्या आनंदरूपाने पाहून त्या अविनाशी अनंतरूपी, नित्य निर्विकारी असणाऱ्या आनंदाला का अनुभवित नाही ? तेच स्वरूप असून इतर दुसरे नसल्यामुळे कशाचीहि कल्पना न करता आपणच आपण होवन एका आनंदस्वरूपानेच तुम्ही कां रहात नाही?

कोणती तरी एक वृत्ति किंवा कल्पना निर्माण झाल्यानंतर अथवा तुम्हास कोणती तरी भावना उद्भवून सुख-दुःख शोक, मोह राग-द्वेष इत्यादि सर्व विकार होतात. ह्या वृत्तीची, कल्पनेची अपेक्षा असणारे दुःखरूपी जीवन जगण्याचे सोडून द्या! कोणतीहि वृत्ति, कोणतीहि कल्पना, कोणतीहि भावना नसणारे निर्विकल्प आनंद किंवा आनंदरूपी तुमचे स्वरूप गृहीत धरा! हेच मुक्ति साम्राज्याचें महाद्वार होय.

गाढ सुषुप्तीने सर्व काही लपले जावून इतर दुसरे काहीहि दिसत नसल्याने अस्तित्वात असणारे केवळ एक आनंदरूपच तुमचे रूप आहे. ही गोष्ट मनांत दृढ करावी. नाम-रूप कल्पना, वृत्ति, वासना ह्यांनी लागलेले वेड पूर्णतया घालवावे. एक कल्पना अथवा वृत्ति नाहीशी होऊन दुसरी येण्यापूर्वी असणान्या सर्व कल्पनाशून्य अशा एका आनंदातच तुम्ही दृढ होवून रहा ! विवेकाच्या सोसाटयाच्या वाऱ्याने उद्भवलेल्या अनंत अशा आत्मानंदाच्या वणव्यांत तुमचे कामादिविकार वाळलेल्या गवताप्रमाणे जळून नष्ट होवून त्याचा नामनिर्देशहि रहात नाही. मला देहकाराने पाहूं नका! तुमचें आनंदस्वरूपच मी असे ओळखून मला पाहत असतां, तुमच्या देहाची भावना विसरून जा, तरंग समुद्रात मिसळून अनंत असा समद्रच होण्याप्रमाणे ‘मी’ ही जाणीवहि नाहीशी होऊन एक अपार आनंदच होऊन रहा. हीच त्रिकालाबाधित सत्य स्थिती होय.

‘ इति शम्’

॥ श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥ श्रीराम समर्थ ॥

कर्म

‘ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि ।‘ शतकोटी म्हणजे अब्जावधीचे अनेक जन्म असेंहि आपणांस मानता येईल. पण एकंदरीत पाहतां केलेली कर्म भोगूनच संपतात. भोगल्याशिवाय संपत नाहीत, असा ह्या श्लोकर्षाचा अर्थ आहे. ‘प्रारब्ध कर्मणां भोगादेव क्षयः।’ केलेल्या कर्मापासून निवृत्त व्हावयाचे असेल तर त्यांची फळे भोगूनच निवृत्ती प्राप्त होते हे ह्या दुसऱ्या वाक्याचे तात्पर्यं. केलेले कर्म भोगूनच संपविले पाहिजे अशा अर्थाची ‘करावे तसे भरावे’ ही आपल्याकडील म्हण आहे. एकंदरीत पहातां ही सर्व श्रुतिवाक्येच होत. त्यामुळे ती खोटी उरत नाहीत,

‘क्रियते इति कर्म’ जे केले जाते त्यास कर्म म्हणतात. ‘यद्यद्धि कुरुते जन्तुः तत्तत्कामस्य चेष्टितम् । अकामस्य क्रिया काचिद्वर्तते न कदाचन ॥’

ती ती फळे अनुभवाची म्हणनच ती ती कर्मे जीव करीत असतो. अशा प्रकारची कोणतीच आशा नसल्यास त्या जीवाकडून कोणतेहि कर्म होणे संभवत नाही. कर्मफळाचा, अनुभव घेतल्यानंतर त्याला कृत्रिम असे एक प्रकारचे समाधान होणे साहजिक आहे नाही का? ‘कर्तुरीप्सिततमं कर्म।’ कार्याची उत्कट अशी इच्छाच कर्य आहे असे वाटते म्हणजेच ते कर्मास कारण होते असा त्याचा अर्थ होतो. फळ अनुभविण्यासाठी उत्कट इच्छाच त्या त्या व्यक्तीस त्या त्या व्यक्तीस वा त्या फळाच्या साधनीभत असलेल्या कार्यास प्रबळ प्रेरणा देत त. ती ती कर्मे फळ दिल्याशिवाय रहात नाहीत. त्यामुळे ती फळे अनुभवण्याचा समय येईपर्यंत ती कर्म तशीच रहातात. बळीराजाने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरू केले. एकशे आठ राजसूयज्ञ करणारास इंद्रपदप्राप्ती होते असा नियम आहे. ‘ इंद्रास” शतऋतु’ ‘शतमन्य’ अशी दोन नावे आहेत. ‘ऋतौ यज्ञ कोपे च मन्युः मन्यु शब्द क्रोधाबद्दल येतो. बळीसारख्या कित्येक राजांनी यज्ञ केले असतील. ब्रह्मदेवाच्या सकाळच्या वेळत चौदा इंद्र होतात असे एक प्रमाण आहे. तेव्हां अनुक्रमानुसार पाळी येईपर्यंत बळीला पाताळांतच रहावे लागले. एका कल्पामध्ये शक्य नसले तरी शतकोटी कल्पांच्या शेवटी तरी इंद्रपद मिळालेच पाहिजे व त्यासाठी तो पावेतो जिवंतहि राहिले पाहिजे. यावरून ‘ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटि शतैरपि’ याची सत्यता पटते.

कर्म तीन प्रकारची आहेत. त्यांची ‘संचित’ प्रारब्ध व ‘आगामी ‘ अशी नांवे होत. अनेक जन्मापासून करीत आलेले कर्म एकत्र सांठवले जाते ते ‘संचित’ कर्म होय. एकाच जन्मात शंभर जन्मास कारणीभूत ठरणारी आकांक्षायुक्त कर्मे जीव करीत असतो आणि त्यांच्या संकल्पानुसारच तो ती करतो असे एके ठिकाणी सांगितले आहे. अशाप्रकारे प्रत्येक जन्माचे जमणारे संचित किती जन्मांना कारणीभूत होईल? जीवाचे किती जन्म झाले? किती राहिले? हे एका परमेश्वरासच माहित. हा झाला संचिताचा विचार ? ‘प्रारब्ध’ म्हणजे चालू जन्मास कारण असलेल्या संचितामुळे लादले गेलेले मागील जन्मीचे कर्म होय व ‘आगामी’ म्हणजे पुढल्या जन्मास कारणीभूत होणारे ह्या जन्मी घडणारे कार्य होय.

फलासक्ती असेपर्यंत अनेक जन्मात केलेल्या अनेक कर्माची फळे भोगण्यासाठी जीव किती जन्म घेत असेल ते त्या परमेश्वरासच ठाऊक. रहाटगाडगे फिरण्यासारखीच ही गोष्ट आहे. भोवऱ्यात सापडलेल्या मनुष्याप्रमाणेच त्याची अवस्था असते.

पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम् । इह संसारे खलुदुस्तारे कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥

अशी देवाची प्रार्थना करीत राहिल्यास देवास करूणा येईल व तो सद्गुरूचा लाभ घडवून देईल. भोव-यात फिरणाऱ्या मनुष्यास दयाद्रं मनुष्य ज्याप्रमाणे बाहेर काढतो त्याच रितीने श्रीगुरु त्या जीवास जन्ममरणाच्या भोवऱ्यातून बाहेर काढून मोक्षाच्या कडेला पोहोचवतात. एकंदरीत कर्मफलरूप विषयवासना असणाऱ्यांसाठी  ‘ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि’ हा सिद्धांत खराच ठरतो.

‘जन्मदुखं जरादुःखं मृत्युदुखं पुनः पुनः । कमलम संसारासागरे दुःखं तस्मात् जागृहि जागृहि ॥

जन्म दुःखमय, म्हातारपणहि दुःखमय, मरण दुःखमय, मग हे जेथे वारंवार भोगावे लागते असे विषयसुखहि दुःखच होय. ‘सर्वदुःखं विवेकिनास्।’ विचार केला असतां ह्या सर्व गोष्टी विवेकी मनुष्यास दुःखरूप आहेत. ‘मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयं विषवत् त्यज।’ मुक्ति प्राप्त करून घ्यावयाची असेल तर विषयांचा विषाप्रमाणे त्याग करावा असे म्हटले आहे. दुःखरूप विषयांच्या त्यागाने जगातील जन्ममृत्यूपासून निवृत्त होऊन त्या सर्वापासून भिन्न अशा ख-या मुक्ति सुखाची प्राप्ती होते हेच स्पष्ट होते. सुखाच्या प्राप्तीचे हेच एक साधन आहे हीच गोष्ट यावरून उघड होते.

सुषुप्तीमध्ये सर्व विषयांची, प्रपंचातील इंद्रियांची आणि देहादींची निवृत्ति झाली म्हणजे खरे सुख मिळाले असे ठरत नाही. कांहीहि न समजणे म्हणजे अज्ञान. हे अज्ञान सुषुप्तीत असते. हे अज्ञान असेपर्यंत जागृति-स्वप्नाच्या दुःखरूप संसाराच्या उत्पत्तीस व सर्वास कारणीभूत असलेल्या विषयवासनेची उत्पत्ती होते. त्यामुळे सत्य प्रवृत्ति ही ज्ञानापासूनच उत्पन्न होते असे स्पष्ट होते. ‘ज्ञानादेव तु केवल्यम् । ‘ ज्ञानानेच कैवल्यप्राप्ती होते हे प्रसिद्ध आहे. आतां ज्ञान कशाचे ? असा प्रश्न उद्भवतो. ‘ ज्ञात्वा देवं जन्ममृत्यु प्रहारिणिः । देवास समजून घेतल्याने जन्म मृत्यूचा नाश होतो हे ह्या वाक्यावरून स्पष्ट होते. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा। कर्माध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेतः केवलो निर्गुणश्च ॥

एकमेव परमात्माच सर्व भूतामध्ये सत्यस्वरूपाने असून सर्व देहामध्ये गूढ रितीने व्यापून आहे. तो सर्वव्यापी व सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. तो सर्व झाल्या गेल्या गोष्टींना साक्षीभूत असून त्यांना प्रकाशमान करणारा असा ज्ञानरूप आहे. तो दुसरा कोणीहि नसून केवळ आपण स्वतःच एकमेव आहे. त्यात नाम, रूप, जाती, गुण, कर्म, कर्तृत्व, भोक्तृत्व, बंध, मोक्ष इत्यादी गोष्टी नाहीत. अशा प्रकारे त्या परमात्म्यास समजून घेतले पाहिजे.

ह्या परमात्म्यास आपल्यापासून वेगळे समजावयाचे की आपलेच स्वरूप समजावयाचे? ‘तद् ब्रह्माहमिति व्याहरेत् ।’ अद्वितिय आनंदधन ब्रह्मच आपण आहोत असे समजावे. ब्रह्म अद्वितीय असल्यामुळे । तेच ‘मी’ असे समजून त्या निष्ठेत असले पाहिजे. ‘मी’ ही जाणीव अचेतन पदार्थांना नसते असे म्हटल्यावर फक्त चैतन्यरूपी परमात्म्याचीच जाणीव होते. तो चैतन्यरूपी परमात्मा आनंदरूपी आहे. ‘आनन्दो ब्रह्म’ आनंदच ब्रह्म होय. तद्विज्ञानेन परिमश्यन्ति धीरा आनन्दरूपमृतं यद् विभति ।’ सर्वरूपी असलेल्या परमात्म्याच्या यथार्थरुपाचे । ज्ञान झाल्यामुळे विवेकीजन आनंदरूपच सर्वत्र पहातात.

भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यते सर्वसंशय। क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥’

अद्वितीय आनंदमात्र असलेल्या ब्रह्मास जो कोणी सर्वत्र पहातो त्याची देहात्मबुद्धीची हृदयग्रंथी मोकळी होते, सर्व संशय नष्ट होतात व सर्व कर्मे नष्ट होतात असे मुंडकोपनिषदांतील वचन आहे.

ज्ञानी लोकांच्या प्रारब्धाविषयीं स्पष्टिकरण करणारे अध्यात्मोपनिषदांतील कांही श्लोक बघू या!

अजरोऽस्म्यमरोऽमीति य आत्मानं प्रपद्यते । तदात्मना तिष्ठतोऽस्य कुतः प्रारब्धकल्पना ॥ प्रारब्धं सिध्यति तदा यदा देहात्मना स्थिति। देहात्मभावो नैवेष्टः प्रारब्धं त्यज्यतामतः ॥

मी जन्म-जरा-मृत्युरहित आहे असे ज्याने केवळ रूपाने आनंदमात्र असलेल्या आत्मरूपास जाणले आहे अशा स्वमात्र असलेल्यास त्या आनंदमात्र स्वरूपात प्रारब्ध कल्पना कोठून येणार? देहात्मबुद्धीने प्रारब्धाची सिद्धी होते. देहात्मभाव कधीहि इष्ट नाही असे म्हटल्यावर प्रारब्धविचारच सोडून द्यावा.

‘प्रारब्धकल्पनाऽप्यस्य देहस्य भ्रान्ति रेष हि।’ “अध्यस्तस्य कुतस्य त्वमसत्यस्य कुतोचनिः। अजातस्य कुतो नाशः प्रारब्धमसतः कुतः॥

देहात्मभावनेच्या भ्रांतीने प्रारब्धाची कल्पना केली जाते. ही कल्पना अध्यस्त असल्याकारणाने रज्जु सर्प न्यायाप्रमाणे अस्तित्वच नसल्यावर तशा नसलेल्या असत्य वस्तूंची निर्मिती कोठून होणार ? जन्मलेल्याला नाश असतोच. ज्याला जन्मच नाही त्याचा नाश कसा होणार ? वंध्या स्त्रीच्या पुत्राप्रमाणे असलेल्या असत्य देहादीपासून प्रारब्ध कसे होईल ? ज्ञानी लोकांचे संचित व आगामी कर्म ज्ञानाने नष्ट होवून प्रारब्धहि अनुभवून नष्ट होते असे वेद, उपनिषदामधून आढळून येत नाही काय? असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर पुढील श्लोकांत आढळून येईल.

‘ज्ञानेनाज्ञानकार्यस्य समूलस्य लयो यदि । तिष्ठत्यय कथं देह इति शङकावतो जडान् । समाधातुं बाह्यदृष्टया प्रारब्धं वदति श्रुतिः । न तु देहादिसत्यत्वबोधनाय विपश्चितान् ।’

ज्ञानाने अज्ञानरूपी कार्य समूळ नष्ट झाल्यावर त्याचे अज्ञानरूप असलेला देह टिकणे कसे शक्य आहे ? अशा शंका घेणाऱ्या आज्ञानीसाठी त्याच्या समाधानासाठी ‘ भाग्यदृष्टीने ज्ञानी लोकांचे प्रारब्ध असेपर्यंत त्याचा देह टिकतो प्रारब्धाचा नाश झाल्यावर त्याचा देह पडून फुटलेल्या घटातील घटाकाश महदाकाशांत आपोआप विलीन झाल्याप्रमाणे ज्ञानी लोक विदेहमुक्ति संपादतात.’ असे सांगितले जाते. ज्ञानी लोकांना देहादींचे असत्यत्त्व सांगण्याची आवश्यकता नसते.

‘पूर्वजन्मकृतं कर्म प्रारब्धमिति कथ्यते । तत्तु जन्मांतराभावात्प्रारब्धं नैव विद्यते ॥’

पूर्वजन्मी केलेल्या ह्या जन्मास कारण असणाऱ्या कर्मास’ प्रारब्ध’ असे म्हणावयाचे तर देहरहित असणाऱ्या आत्मनिष्ठास हा देह वा पूर्वीचा देह असत नाही असे म्हटल्यावरच जन्मांतरच शिल्लक नसणाऱ्यास प्रारब्ध कोठून असणार? यावरून ज्ञानी जनांना प्रारब्ध नाहीच असे सिद्ध होते. आपणास देह दिसत असल्याने व देहामुळे काम घडत असल्याने झालेल्या व होणाऱ्या कर्माना कोणते तरी इष्टानिष्ठफळ मिळत असल्यामुळे देहाकडून होणाऱ्या पाप-पुण्यात्मक कर्माचे सुखदुःखरूपी फळ ज्ञानींना मिळत नाही असे म्हटल्यावर त्या कर्माची व्यवस्था काय? ‘क्षणमेकं ऋतं ऋतः शतस्यापि ।’ एक क्षण आत्मनिष्ठेत राहिले तरी शेकडो यज्ञ केल्याचे पुण्य मिळते असे श्रुती सांगते. जेवतांना, खातांना, पाणी पिताना, येतांजाताना, श्वास उच्छ्वास करताना सहजरित्या घडणाऱ्या कृमिकीटकादि जंतूंच्या हत्येचे पातक लागतेच. असे पातक करणे कोणास आवडेल? संचित ज्ञानाने नष्ट होत असते असे आपण गुहित धरू या. विषयेच्छा, पुढील जन्मांची आशा, कर्तृत्व, भोक्तृत्व आदि भावना शिल्लक रहात नाहीत म्हणून आगामी जन्म-कर्म ज्ञानींना नाही. प्रारब्ध अनुभवून संपते हे सर्व जरी आपण मानिले तरी देह असेपर्यंत घडलेले कर्म देव कोणाच्या माथ्यावर ठेवतो हे आपणास समजत नाही असा जर प्रश्न केला तर श्रुतिस्मृती पुढीलप्रमाणे समाधान करते.

‘तस्य पुत्रादायमुपयन्ते सुहृदः सादुकृत्यां द्विषन्तः पापकृत्याम् । शरीराम्भकं कर्म तद्वेषी प्रियवादिनोः। काशि

ज्ञानी गृहस्थाश्रमी असेल तर पुत्रादीना, इष्ट-मित्र-भक्तादींना त्याचे पुण्य जाऊन त्यांचे पाप, त्यांचा द्वेष करून, निंदा करून त्यांना पीडा देत छळते. ज्ञानी नैष्ठिक बाल ब्रह्मचारी अथवा बाल संन्यासी असला तर त्याच्या देहाकडून घडलेले पुण्य त्याच्या पूर्वाश्रमीच्या आप्तेष्ठांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या भक्तांना मिळते व देहनिर्वाच्या दृष्टीने सहज घडणारे कोणतेहि पाप त्याचा द्वेष करणान्या त्याची निंदा करणा-या लोकांना प्राप्त होते; हा पहिल्या प्रश्नाचा विचार झाला.

एखाद्याचे प्रारब्ध बिघडले असेल तर त्यास निवृत्तिमार्गाने जाऊन मोक्ष मिळविणे शक्य आहे किंवा नाही? ह्या प्रश्नाचा विचार आतां करू या! हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने समजावयाचा म्हणजे मोक्ष पुरुष प्रयत्नाने साध्य आहे की प्रारब्धाधीन आहे ! असा प्रश्न केल्यासारखेच होईल, ह्या विषयासाठी मला आठवणारी मुक्तिकोपनिषदांतील कांही वाक्ये विचारांत घेऊ. मुक्तिकोपनिषदांतील दुसऱ्या अध्यायांत सामान्यतः पुरुष प्रयत्नाने मोक्ष साध्य आहे असे सांगितले आहे. ह्या अध्यायाचा

लागतेच. असे पातक करणे कोणास आवडेल? संचित ज्ञानाने नष्ट होत असते असे आपण गुहित धरू या. विषयेच्छा, पुढील जन्मांची आशा कर्तृत्व, भोक्तृत्व आदि भावना शिल्लक रहात नाहीत म्हणून आगामी जन्म-कर्म ज्ञानींना नाही. प्रारब्ध अनुभवून संपते हे सर्व जरी आपण मानिले तरी देह असेपर्यंत घडलेले कर्म देव कोणाच्या माथ्यावर ठेवतो हे आपणास समजत नाही असा जर प्रश्न केला तर श्रुतिस्मृती पुढीलप्रमाणे समाधान करते.

‘तस्य पुत्रादायमुपयन्ते सुहृदः सादुकृत्यां द्विषन्तः पापकृत्याम् । शरीराम्भकं कर्म तद्वेषी प्रियवादिनोः। काशि

ज्ञानी गृहस्थाश्रमी असेल तर पुत्रादीना, इष्ट-मित्र-भक्तादींना त्याचे पुण्य जाऊन त्यांचे पाप, त्यांचा द्वेष करून, निंदा करून त्यांना पीडा देत छळते. ज्ञानी नैष्ठिक बाल ब्रह्मचारी अथवा बाल संन्यासी असला तर त्याच्या देहाकडून घडलेले पुण्य त्याच्या पूर्वाश्रमीच्या आप्तेष्ठांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या शिष्यांना’ भक्तांना मिळते व देहनिर्वाच्या दृष्टीने सहज घडणारे कोणतेहि पाप त्याचा द्वेष करणान्या त्याची निंदा करणा-या लोकांना प्राप्त होते; हा पहिल्या प्रश्नाचा विचार झाला.

एखाद्याचे प्रारब्ध बिघडले असेल तर त्यास निवृत्तिमार्गाने जाऊन मोक्ष मिळविणे शक्य आहे किंवा नाही? ह्या प्रश्नाचा विचार आतां करू या! हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने समजावयाचा म्हणजे मोक्ष पुरुष प्रयत्नाने साध्य आहे की प्रारब्धाधीन आहे ! असा प्रश्न केल्यासारखेच होईल, ह्या विषयासाठी मला आठवणारी मुक्तिकोपनिषदांतील कांही वाक्ये विचारांत घेऊ. मुक्तिकोपनिषदांतील दुसऱ्या अध्यायांत सामान्यतः पुरुष प्रयत्नाने मोक्ष साध्य आहे असे सांगितले आहे. ह्या अध्यायाचा प्रारंभच असा होतो.

‘ तथा हैनं श्रीरामचन्द्र मारूतिः पप्रच्छ । केयं वा तत्सिद्धिः सिद्धया वा किप्रयोजनमित्ति ।’

‘तत्त्वज्ञान हे सिद्धिप्रमाणे आहे. त्या सिद्धीचे काय प्रयोजन आहे ?’ असे श्रीमारुतिरायाने श्रीरामचंद्राना विचारले आहे. त्यास श्रीरामचंद्रानी उत्तर दिले की ‘पुरूषस्य कर्तृत्वभोक्तृत्वसुखदुःखादिलक्षणाश्चित्तधर्मः क्लेशरूपत्वाद्बन्धो भवति । आरशांत दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणे जीवनांत दिसून येणारे कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख हे त्याचे धर्म नसून त्याच्या चित्ताचे धर्म आहेत. त्यांच्या केवळ अध्यासाने जीवनांत क्लेश झाल्याप्रमाणे आढळून येते. ह्याच्यामुळे क्लेश होत असल्यामुळेच मन हैं दुःखरूप बंधन आहे असे म्हणतात तन्निरोधनं जीवन्मुक्तिः ।। स्फटिकांत दिसून येणाऱ्या अन्य पदार्थाच्या रंगाप्रमाणे हे केवळ भ्रामक रितीने माझ्यांत दिसून येतात. हे असे दिसत असले तरी स्फटिकाप्रमाणे किंवा आरशाप्रमाणे मी त्यास नष्ट करून आपल्या केवळ आनंदरूपाने त्यांना प्रकाशित करणारा आनंद चिन्मात्ररूप आहे असे जाणून, त्यांचा कोणताहि परिणाम आपणावर करून न घेतां एका आनंदरूपाच्या निष्ठेने सदैव निर्विकल्प रहाणे यासच ‘जीवनमुक्ति’ असे म्हणतात.

उपाधिविनिर्मुक्तघटाकाशवत्प्रारब्धक्षयाद्विदेहमुक्तिः ।

घट फुटून घटाकाश ही उपाधी गेल्यावर ते महादाकाशांत मिळण्याप्रमाणे देह पडल्यावर जीवास असणारी देह ही उपाधी नष्ट होऊन जीव परब्रह्मांत मिळून जाऊन एकरूप होणे म्हणजेच ‘ विदेहमुक्ति’ जीवन्मुक्तिविदेहमुक्त्योऽष्टोत्तरशतोपनिषदः प्रमाणम् ।’ आत्मज्ञानाने जीवास जीवनमुक्ति आणि विदेहमुक्ति खरोखरच निश्चितपणे प्राप्त होते ह्यास अष्टोत्तरशतोपनिषदे प्रमाणभूत किंवा साक्षी आहेत. ही जीवनमुक्ति व विदेहजीवनमुक्ति साधन असल्यामुळे कोणते प्रयोजन हाती येत असेल तर ते कर्तृत्वादिदुःखनिवृत्तिद्वारा नित्यानन्दावाप्तिः प्रयोजनं भवति।‘ कर्तृत्वादि दुःखरूप असणारी सर्व बंधने नष्ट होऊन त्याहून श्रेष्ठ अशी नित्यानंदप्राप्तीच जास्त महत्वाचे प्रयोजन होय. ह्या नित्यानंदरूपी मोक्षाची प्राप्ती प्रारब्धाने प्राप्त होते की पुरुष प्रयत्नाने साध्य होते? ‘तत् पुरुष प्रयत्नसाध्य भवति ।’ ते पुरुष प्रयत्नाने साध्य आहे. स्वतः बद्ध असलेल्या जीवास आपल्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी दुसरे कोणतेहि प्रारब्ध वगैरे आड येत नाही. येथे अन्य कोणत्याही गोष्टीचा संबंधच नाही. स्वरूपाचे तितके निश्चित नसते.

‘अथ चेदशुभो भावस्त्वां योचयति सङकट। प्राक्तनस्तदसौ यत्नाज्जेतव्यो भवता कपे॥’

हे कपीश्वरा ! कामादि दुष्टवासना, अशुभ विचार निर्माण होत असतील तर पुरुषप्रयत्नाने साध्य होणाऱ्या श्रवण, व निदिध्यास इत्यादींनी त्यांतहि विशेषतः स्वरूप लक्षणांच्या धारणेने ते नाहीसे केले पाहिजेत.  शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां बहन्ती वासना सरित् । पौरूषण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि ॥ अशुभेषु समाविष्टं शभेष्वेवावतारयेत् ॥

‘शुभाशुभ मार्गाने वासना प्रबळ होते. आपल्या प्रयत्नाने आपल्या मळ्यांत पाणी वळविल्याप्रमाणे वासना शुभमार्गाकड वळविली पाहिजे. पाणी दुसरीकडे वाहून जाते असे समजतांच तेथे त्या बाजूने बांध घालून पाणी अडविले जाते त्याप्रमाणे चित्त अशुभ भावनांच्याकडे, अपवित्र भावनांकडे, वैषयिक भावनाकडे वाहात आहे असं वाटतांच विवेकाने त्यास बांध घालून शुभ वासनेकडे ते वाहील असे करावे,’ असें श्रीरामरायानी श्रीमारुतीरायास निमित्तमात्र करून आपणां सर्वांस सांगितले आहे. आकाशांत मेघाकृति दिसून ती नाहीशी होते त्याप्रमाणे ज्ञानमात्र असणा-या आपणांतच ती वृत्ती दिसून परत विरून जाते. समुद्राच्या लाटा समुद्राहून अमिन्न असल्याप्रमाणेच व्यक्तीहि आनंदमात्र स्वरूपांत अभिन्न अशीच आहे असें जाणन अध्यासातून मोकळे झाले पाहिजे.

।ॐ तत्सत् ।

॥श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥श्रीराम समर्थ ॥

हे जग परमात्म्याचेच !

सृष्टीची निर्मिती, सृष्टी उत्पन्न करण्याचे ज्ञान म्हणजेच वेद, असा वेदांचा अर्थ होय, विश्वाची उत्पत्ति, स्थिति, लय इत्यादी कार्याचे परिज्ञान, जीवांच्या अभ्युदय श्रेयसाचे साधन, त्याचे लक्षण, अनेक योनी व अनेक जातींचे नामनिर्देशन आणि त्यांचे धर्म-कर्म इत्यादि सर्व काही वेदामध्ये समाधिष्टित होतात. अशा ह्या वेदांची उत्पत्ति परमात्म्याशिवाय इतर कोणाच्या हातून शक्य होईल ? इतर कोणाला शक्य आहे ? परमात्म्यापासून वेद व वेदापासून अखिल सुष्टि.

‘सर्वेषान्तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक् । वेदशब्देभ्य एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे ॥’

वेदापासून भिन्न भिन्न जाती, त्यांचे भिन्न भिन्न आचार, भिन्न | भिन्न कर्मे निर्माण झाली. आपापले विचार, धर्म-कर्म विचार समजाऊन । ध्यावयाचे असल्यास त्यासाठी वेद हेच केवळ प्रमाण आहेत हे स्पष्ट होते. ।

शब्द इति चेन्नातः प्रभावात् प्रत्यक्षानुमानाभ्याम् ।’ ह्या ब्रह्म मुक्ताद्वारे हेच सिद्ध होते.

‘यथा पूर्वमकल्पयत् द्याव्यापृथिवी जनयन् देव एकः । विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता, य एवैक उद्भवे सम्भवे च य एतद्विदुस्मृतास्ते भवन्ति ॥’ एकमेव परमात्माच. त्याने यथापूर्वक सृष्टी निर्माण केली. त्या एकमेव परेमात्म्यानेच स्वर्ग, मृत्यु, पाताळादि लोकांची उत्पत्ति केली. तो परमात्माच जगत्कर्ता व जगत्पालक होय. सृष्टीच्या उभव संभवात त्या एकमेव परमात्म्याचाच हात आहे असे जे कोणी समजतील ते मृत्युरहित असे परमात्मपद प्राप्त करून घेतील, परमात्मपदांत ऐक्य पावतील.

‘अक्षरात् सम्भपतीह विश्वम् ।’ अविनाशी अशा परमात्म्यापासूनच ह्या विश्वाची उत्पत्ति झालो. ह्या दृष्टीने विश्व उत्पन्न करणारा एकमेव परमात्मा व त्याच्यापासून विश्वाची स्थिती व मोक्षाचा बोध करणारे वेद’ हा एकमेव सर्वांचा धर्मग्रंथ असेहि स्पष्ट होते. ‘वेदन्तीति वेदः।’ जीवांचा अभ्युदय व निश्रेयस ह्या मार्गानी योग्य उपदेश करून त्यांचा उद्धार करणे ही गोष्ट उत्तम प्रकारे जाणणारे वेद होत. ऐहिक जीवन, परलोक प्राप्ति व परमात्मैक्यरूप करणाऱ्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपापल्या यातीनुसार असलेले मार्ग ज्यांच्या पासून देव-पितृ-मनुष्यादि जाणून घेतात त्यास ‘वेद’ असे नांव आहे.

‘आत्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये।’ मोक्षाची इच्छा करणा-या आत्मबुद्धीला उजळणाराच परमात्म्याला शरण जातो. ‘स नो देवः शुभया स्मृत्या संयुनक्तु ।’ तो परमात्मा शुभ अशा स्मृतींनी सर्व केव्हांहि परिपूर्ण असे करो, अशी परमात्म्याची प्रार्थना स्मृतीमधून सांगितली आहे. कोणताहि भिन्न भाव न करता वेद सर्वाना ‘अमृतस्य पुत्रः ।’ अविनाशी अशा परमात्म्याची मुले असे संबोधून हाक मारतात.

सोऽन्वेष्टव्यः स विजिज्ञासितव्यः । ज्ञात्वा देवं सर्वपाशापहानि । ज्ञात्वा देवं हर्ष शोको जहाति । ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपार्शः। तमात्मस्थं येऽनपश्यन्ति धीरास्तेषां सुखं शाश्वत नेतरेषाम् । तेषा शान्तिः शाश्वती नेतरेषाम् । य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति अर्थ दुःखमेवापियन्ति। तमेवं ज्ञात्वा मृत्युपाशाञ्छिदन्ति । तमेव विदित्वाऽतिमृत्युमेति । नान्याः पन्था किद्यतेऽयनाय ।’ अशा हा परमात्म्याचा शोध केला पाहिजे. त्याला जाणून घेतले पाहिजे त्याच्यामुळे सर्व पाश सुटतात. परमात्म्यास जाणल्यानेच जीव अनित्य अशा संसारातील हर्ष, शोक जिंकतो. परमात्म्यास जाणल्यानेच सर्व पाशातून मुक्तता होते. आपल्या हृदयांत वास करणा-या परमात्म्यास जाणणारास शाश्वत अशा सुखशांतीचा लाभ होतो. इतरांना ते दुर्लभ होते. त्या अविनाशी परमात्मस्वरूपास जाणणारे अमर होतात. पण इतरांना दुःख चुकत नाही. त्याचे स्वरुप जाणण्यानेच  मृत्यूचे पाश तुटतात त्याला आत्मस्वरुपाद्वारे ओळखणे ह्या एकमेव साधनामुळे मृत्यु ओलांडता येईल, टाळता येईल. त्याच्याखेरीज जन्ममृत्युरुपी संसार पार करून जाण्यास अन्य उपाय याही. असें श्रुति सर्वाना सर्वसाधारणतः समजाऊन सांगते. ‘सयोह वै तत्परंमं ब्रह्मैव भवति, तरति पापमानं गुहा- ग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतोभवति’ मी तो ब्रह्मरूपी परमात्माच होय असें जाणणारा परमात्माच होतो व देहात्मबुद्धीपासून आपली सुटका करून घेऊन खात्रीने, निश्चितपणे तो अमृतस्वरुप होतो.

‘यथा नद्यः स्यन्चमाता: समुद्रेऽस्तं गच्छन्ति नामरुपे विहाय । तथा विद्वान्नामरूपाद्विमुक्तः परात्परं पुरुषमुपुपैति दिव्यम् ॥

‘निरनिराळ्या नद्या, ओहोळ समुद्रास मिळून आपलें नांव, रुष सोडून देतात त्याप्रमाणेच परमात्म्याचे ज्ञान असणारा ज्ञानी आपल्या नांवरूपापासून मुक्त होऊन स्वप्रभेनें उजळणाया, प्रकाशणाया सर्वातिश्रेष्ठ अशा परमात्म्याच्या स्वरूपांत पूर्णपणे एकरुप होऊन जातो.’ असें श्रुतिमाता सर्वांना वारंवार सांगत आली आहे.’

हातमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमञ्च दैवतम् ।

पति पतीनां परमं परस्ताद्विदाम देवं भुवनेशमीडयम् ॥

ईश्वराहुन महान ईश्वर असणाऱ्या अखिल देवतांचाहि महान देव असणाऱ्या, ब्रह्मा-विष्णु-महेशादि विश्वाच्या प्रभूचाहि प्रभु असणा-या, सर्वश्रेष्ठ व सर्वातीत असणाऱ्या ब्रह्माण्डस्तुत्य सत्य अशा परामेश्वरास आपण सर्वजण जाणून घेऊ या! समजून घेऊ या!’ अशी हांक आपल्या पूर्वज ऋषिमुनीहिं अखिल मानवजातीस दिली आहे.

यतः प्रसूताः जगतः प्रसूतिः । ज्याच्यापासून ह्या जगाची उत्पत्ति झालेली आहे; ‘यत्र विश्वं भवत्येकनीडम् ।’ ज्यामध्ये संपूर्ण जग शेवटी समूळ विलीन होईल, ‘तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत् । जो ह्या सर्व विश्वास उत्पन्न करुन त्या सर्वामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे, ‘न तस्येशे कश्च न तस्य नाम महद्यशः ।’ त्याच्यावर कोणीहि आपले शासन चालवू शकत नाही, सत्ता गाजवू शकत नाही त्याचे यश, कीर्ति, शक्ति, बल पराक्रम इत्यादि सर्वच सर्वापेक्षा अत्याधिक आहेत.  ‘न तस्य कश्चित्पतिरस्तिलोके न चेशिता नैव च तस्य लिङ्गम् ॥ स कारणं करणाधिपाधिपो न चास्य कश्चिज्जनिता न चाधिपः।

तो परमात्माच सर्व देवांचा देव, तोच सर्वांचा स्वामी. त्यावर स्वामित्व गाजविणारा दुसरा कोणीहि नाही. सर्वदृष्टीने पाहिल्यास त्याच्या तोडीचा कोणीहि नाही. तो कोणत्याहि तोल मापाने मोजतां येत नाही. तो सर्व जगताचे आद्यकारण आहे. तोच सर्वांचे मूळस्वरुप. तोच मनइंद्रियादि सर्व गोष्टी करणाऱ्या अधिदेवतांचा अधिकारी व त्यांच्यावर शासन करणारी महाशक्ति आहे. त्याचा कोणीहि निर्माता नाही व त्याचा कोणी शास्ताहि नाही ‘आत्मनात्मानमाभिसम्वभूव । तो स्वतःच्या संकल्पामळेच स्वताचे रूप पावलेला असल्याकारणाने त्याला ‘स्वयंभु’ असे म्हणतात. एकमेव तोच ह्या जगाचे नियंत्रण करणारा आहे. ‘तस्मिन लोकाः श्रिताः सर्वे’ त्याच्यामध्येच सर्व लोकांचा अंतर्भाव होतो. त्याच्यापेक्षा वरचढ बनणे, त्याला जिंकणे हे कोणालाच शक्य नाही. ‘तेन कोऽर्हति स्पर्धीतुम् ।’ त्याच्याशी स्पर्धा करणारा, त्याच्याशी बरोबरी करणारा ह्या जगांत कोण आहे ? भूतानामधिपतिः ।’ हा सर्व भूतमात्राचा एकमेव अधिपति आहे. एष भुवनस्य नाथाः ।’ हाच विश्वाचा मालक. ‘एष विश्वाधिपतिः । हाच अखिल विश्वाचा शासनकर्ता स सर्वनेता भुवनस्य गोप्ता। संपूर्ण जगताचा तोच नेता असून रक्षणकर्ताहि आहे. ‘भयादस्याग्निस्तपति भयात्तपतिसूर्यः । भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पञ्चमः ।’ त्याच्या भयाने अग्निदेव आपला प्रकाश, ज्वाला इत्यादि कार्य करतो; सूर्यहि ठराविक वेळी उदय व अस्त पावतो. त्याच्या भीतीने इंद्र आपले अमरावतीचें राज्य चालवून वृष्टि आदि कार्ये नियमितपणे करतो, वारा वाहतो व यमहि योग्यळी प्राण्यांना घेऊन जातो अर्थात ह्यासर्व गोष्टी त्याच्यामुळेच घडत असतात. ‘य ईशे अस्य द्विपदश्च चतुष्पदः।’ द्विषाद व चतुष्पाद अशा मानव, पक्षी, पशु आदींचा हाच शासनकर्ता व त्यांच्यावर ह्याचाच अधिकार. ह्यासाठी तारूण्य, धन, विद्या, शक्ति किंवा शरीरसंपत्ति, अधिकार प्रभुत्व, राज्यमद ह्यांच्यामुळे अविवेकाला बळी न पडतां, हर्षयुक्त न होतां मदमत्त त होता. उमत्त न बनता सदासर्वदा ह्या परमात्म्यासमोर विनीतच राहिले पाहिजे. य ईशोऽस्य जगतो नित्यमेव नान्यो हेतविद्यते ईशनाथ ।’

मी हे केले, ते केले असा गर्व, अभिमान धरू नये. ह्या पर मात्म्याच्या सत्तेमुळेच हे सर्व जग चालते. जगावर राज्य करणाया राजांचा हा राजा आहे. ह्याच्याखेरीज हे विश्वनियंत्रणकार्य दुसरा कोणीहि चालवू शकणार नाही व ह्या जगाला दुसरा कोणीहि कारण नाही. त्याच्या सत्तेशिवाय वाळलेले पानहि हलू शकत नाही. सृष्टि, स्थिति, लय, प्रवेश व नियमन ही परमात्म्याची पांच कार्य आहेत.

सर्वत्र आश्चर्य करण्यासारखे हे विश्व असून परमात्म्याच्या विचित्र शक्तीचे हे कर्तृत्व पाहिल्यावर त्या प्रभूच्या अचित्य शक्तीचा अतयं विलास कोणालाहि अगदी आश्चर्यचकित करून सोडतो. आकाश, वायु, अग्नि, जल, भूमी ही एकमेकात, एकामध्ये एक असलेली पाहिल्यावर एकापेक्षा एक महदाश्वयं निर्माण होते. एवढे मोठे हे विश्व पाण्यावर तरंगत आहे नाआकाश नावाच्या अमर्याद पोकळीत दिसून येणारा जगद्विलास पाहिल्यावर कोणाचीहि बुद्धि कुंठितच होईल व आश्चर्याने मन चकित होऊन स्तब्ध होईल. ‘सर्वाश्चर्यमयं नभः ।’ सूर्य, चंद्र, लुकलुकणाऱ्या अनंत ताऱ्यांचा विलास, संध्या समयीचे दृष्य, प्रातःकालादि त्या त्या समयींचे वातावरण ही सर्वच एक प्रकारची मृदु-मधुर संवेदना निर्माण करून हृदयाला उचंबळून सोडतात. महाविशाल अशा सागरास कोणी मर्यादा बांधून दिली? डोळयामधील तेज कोणी निर्माण केले? त्यांचा पहाण्याची शक्ति कोणी बरे दिली? देहातील कोणत्याहि भागांत दिसून न येणारे मन, कोठेहि न आढळणारे मन, देहात राहून बाह्य पदार्थांना कसे जाणते ? आपल्या असंख्य विचारासाठी उद्भवणाऱ्या दृश्यांच्या परिज्ञानाचा विचार केला तर किती आश्चर्य वाटते ? एका रजःरेताच्या बिंदूमध्ये करचरणादींचा अंकुर होऊन, प्राणकलांनी भरून, वाढून बाहेर येऊन, मातेचे दूध पिवून शैशव, बाल्य, कौमार्य तारुण्य, प्रौढता, वृद्धत्व इत्यादि अवस्था धारण करणे आणि त्या त्या अवस्थानुसार वागणक, आचार, खेळ, अभ्यास, व्यवहार इत्यादि करणे हा त्या परमात्म्याचा व्याप, खटाटोप, व्यवहार पाहिल्यावर कोणाला आश्चर्य वाटणार नाही ? असा खेळ करून दाखविणे दुसऱ्या कोणाला शक्य आहे ? श्वासोच्छवासरूप असलेल्या प्राणाच्या क्रियेपासून तो इंद्रियांच्या सर्व कार्यापर्यंत सर्वच गोष्टी आश्चर्य निर्माण करीत नाहीत का? देहामध्ये कोणता प्रकाश आहे ? त्यास परिज्ञान कसे होते। खाल्लेले अन्न, प्यालेले पाणी, रसरक्तादि धातूमध्ये कसे काय रूपांतरित होते? एखाद्या गहाळांत गुळ तयार करावयाचा असल्यास त्यासा कितीतरी माणसे, कितीतरी साधनसामुग्री ती मोठी भट्टी, मोठा अनि इत्यादींची आवश्यकता असते. पण ह्या शरीरात तसे काहीहि दिसता घडणाऱ्या सप्तधातूच्या कार्याकडे पाहिल्यास कोणाला बरे आश्चर्य वाटत नाही?

इतर कोणीहि सहकारी किंवा सहाय्यक नसताना आपल्या संकल्पमात्रानेच हे सर्व जग परमात्म्याने रचिले आहे, असे असल्यामुळेच ‘ हे जग त्या परमात्म्याचे, स्वतःचेच, स्वतःच घडविलेले असून आपण सर्वजण त्याच्या अधीनच !!

जय जय जय रघुवीर समर्थ

॥ श्रीराम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥ श्रीराम समर्थ ॥

ब्रह्मोपदेश

मनुष्याने आपल्या जन्माचे सार्थक करण्यासाठी मंगलमय नित्यानंदस्वरूपी परमपवित्र परमानंदरूपी असलेल्या सच्चिदानंदरूपी परमात्म्याला जाणून घेतले पाहिजे, त्याचे ज्ञान झाले पाहिजे, त्याला जाणले पाहिजे. तो सर्व जीवांचे सत्यस्वरूप असल्यामुळे सर्वांशी एक्यभावनेने जीवन पार पाडणे हेच मुख्य कर्तव्य ! त्यांतच जीवनाची सार्थकता! परमात्म्याची प्राप्ति हेच मानवाचे मुख्य ध्येय !!

आज बटू यांना संस्कार झाला आहे. संस्कारात द्विज उच्यते।’ संस्कारानेच द्विजत्व प्राप्त होते. संस्कार होत नाहीत तों पावेतों तो शद्र, ‘जन्मना जायते शूद्रः।’ संस्कार झाल्यानेच त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. वेदमंत्रासाठी वेदानुष्ठानासाठी व क्रियांगासहि तो पात्र होतो. वेदाध्यायाद्भवेद्विप्रः।’ आणि त्यानंतर वेदाध्ययन करण्याने विप्र म्हणविला जातो ‘ब्राह्मणो वेदपारंगः ।’ वेदांचे रहस्य ओळखून तें मनात बाळगून, अंगिकारून वेदसामर्थ्य प्राप्त झाल्यावरच त्यास ब्राह्मण’ म्हटले जाते. ब्रह्म जानातीति ब्राह्मणः ।’ ब्रह्माला ओळखणारा, म्हणजेच सच्चिदानंदस्वरूपी परमात्म्याच्या निजस्वरुपाला जाणून त्याचा आनंद अनुभवणाराच ब्राह्मण. ज्योतिस्वरुप, स्वयंप्रकाशी, परमपवित्र, परिशुद्ध, दिव्य आनंदस्वरुपच परमात्म्यांचें स्वरूप. त्याचे वर्णन करणे श्रुतीनाहि साध्य झाले नाही, जे डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, मुखाने वर्णन करता येत नाही अशा त्या अपार महिमासंपन्न दिव्य रूपाची प्राप्ति करून घेतली पाहिजे. तीच सर्व जीवांच्या सुखांची शेवटची पायरी होय. त्या अतिमहान दिव्य पदवीस पोहोचण्यासाठीच हे संस्कार आहेत. असे संस्कार आपण सर्वांनी प्राप्त केले आहेत किंवा आपल्या मुलांना आपण करून दिले आहेत.

अनुवंशिकतेने आलेली कर्म, पावित्र्य, उज्वलता पुन्हा उजळविण्यासाठी, पुन्हा वाढविण्यासाठी, ऋषिमुनींचे वंशज म्हणून ओळखण्यासाठीच हे संस्कार केले जातात. वेदाध्ययन केले जातात. वेदाध्ययन करून त्यांचे ज्ञान प्राप्त होते त्यालाच वेद म्हणतात. वेद ही परमात्म्याची वाणी! वेदोच्चारांत अतीव सामर्थ्य आहे. आपल्या धर्माला ‘वेदधर्म’ असेच नांव आहे. आर्यधर्म, सनातन धर्म असहि नांव आहे. जगाच्या अभ्युदयाकरता, जगाच्या श्रेयसासाठी, जगाच्या कल्याणासाठी सर्वांच्या इहपर उन्नतीसाठी सुलभ उपाय वेदधर्मात आहे. त्याच्या अनुष्ठानांचा अधिकार पावलेल्या बटू यांनी साफल्यता प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

गायत्री’ ही वेदमाता म्हणविली जाते. ‘स्तुता मया वेदमाता’ असें जे म्हटले जाते त्याद्वारे गायत्री परमात्म्याच्या आनंदाची महानताच व्यक्त होते. ‘गायत त्रायते यस्मात ।। ‘तुला गाणाऱ्याला वाहावा करून स्तुती करणाऱ्यास तूं खरोखर उद्धरतेस, तसें सामर्थ्य तुझ्यात असल्यामुळे तुझी आराधना करतो. असेच ह्यांचे तात्पर्य.

सन्ध्यां नोपासते यस्तु ब्राह्मणो न भवेत् । अहरहस्त्रन्ध्यामुपासीत।’ जो संध्यावंदन करीत नाही तो ब्राह्मण होत नाही. त्याची ब्राह्मणांत गणना होत नाही. दररोज संध्या केलीच पाहिजे अशी श्रुतींची आज्ञा आहे. ‘इवन्नैव शूद्रस्यात् मृतोश्वाचैव जायते।’ जो संध्योपासना करीत नाही तो शूद्र म्हणवला जातो; इतकेच नव्हे तर मरणोत्तर कुत्र्याचा जन्म त्यास प्राप्त होतो. पहा केवढी त्याची अधोगति होते ती!’

गायत्री अनुष्ठानाने पतीतहि पावन होतो व उन्नत पदवी प्राप्त करून घेतो. नाही तर अवनतीच दिसून येणार ! आजकालच्या अवनतीला हेच कारण आहे. ब्राह्मणत्वाचे सामर्थ्य फार मोठे आहे. ते स्वसाधनेंत निरत झाले तर नवीन सष्टीसुद्धा निर्माण करू शकता. विश्वामित्रानें गायत्री अनुष्ठानाच्या बळावर विचित्र सृष्टीच निन केली होती. वसिष्ठादि अनेकानेक ऋषिमनी आपल्या अनंत सामर्थ्याने  विश्वपावन विभूति होऊन जगले. अशा परमपुज्य पावन अशा महर्षि यांचे पुत्र तुम्ही. तुम्ही त्यांचे वंशज ! तुम्ही आपले जीवन दिव्य, बनविण्यासाठी त्यांचे अनुकरण करावयास हवे! त्यांच्या अवलंब करण्यानेच अलिकडची अवनति नाहिशी होईल, उजळवून अचल निष्ठेच्या मार्गाने ह्या जन्मीच कृतार्थ व्हाल.

ॐ’ कार हा परमात्म्याच्या सत्यस्वरूपाचा निदर्शक होय. हा सृष्टीचा जीव आहे. त्याची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे आहेत. सगुणरूपांत सष्टिकर्ता होऊन, निर्गुणतेने जगाचा अधिष्ठानरूपी होऊन तो राहतो. ही दोन्ही रूपें प्रणवानेच सूचित झाली आहेत ही मुख्य गोष्ट होय. पथमतः परमात्म्यात ‘ अहं ब्रह्मास्मि’ असें जे आत्मस्फुरण झालें तोच प्रणव ! गायत्रीहीहि प्रणव स्वरूपच. प्रतिमंत्राचे स्वरूपहि प्रणवाचंच होय. सर्व देवतांचे स्वरूपहि प्रणव स्वरूपच. प्रत्येक मंत्राच्या सुरवातीला ‘ॐ’ असा उच्चार केला जातो तेंच परब्रह्मस्वरूप. तेंच एकाक्षरब्रह्म! !

‘भूः भुवः सुवः’ ‘भूः’ हे केवळ सत्तास्वरूप असल्यामुळेच अद्वितीय आनंदाच्या अपार वैभवाने ज्ञानरूप होऊन आपणच आपण होऊन राहाते. ‘भूः भुवः सुवः’ असे म्हणणे सत्, चित् आनंदाचेच द्योतक होय. सच्चिदानंदपदाच्या उत्पत्तिलाहि तेच मूळ कारण होय. ‘सूयते अनेनेति सविता ।’ जगाला कारण झालेले, हेच ‘सविता’ ह्या शब्दानें स्पष्ट होते. ‘वरेण्यं’ इतर सर्व महात्म्यापेक्षा अधिक, सर्वश्रेष्ठ असून पूर्णत्व पावलेले होय. ‘एतावानस्य महिमा अतो ज्यायांश्च पुरुषः। ‘ अपार वैचित्र्यपूर्ण शक्त्तिसामर्थ्य असणारा, अपार कीतीने, महिन्याने परिपूर्ण असे सामर्थ्य असणारा, अनंत वैभवाने समृद्ध होऊन आवंद सुखसाम्राज्याने तळपणारा अशी परमात्म्याची श्रेष्ठता ‘वरेण्यं’ हा शब्द दर्शवितो त्या परमात्म्याचा आनंदच सर्वश्रेष्ठ आनंद होय हे पटल्यानंतर ह्या जगातील सर्वांनी आपापले जीवन पार पाडण्यासाठी त्याची प्राप्ति करून घेतलीच पाहिजे. त्यामुळे अचल समाधान प्राप्त होते. अनित्यमसुखं लोकं इमं प्राप्य परांगतिम् ।’ दुःख सागराला बाजूला करून आनंदाच्या उन्नत पदवीची प्राप्ति करून धन्य झाले पाहिजे. ‘वरेण्यं ‘ हे पद उन्नत पदवीचे महत्त्व सूचित करते.

भर्गः’ म्हणजे ‘भर्जयतीति भर्गः । अज्ञानाचा नाश करणार विघ्नांचा परिहार करणारा, भय-भीति, दुःख शोक ह्यांचे निर्मल करणारा, त्यांना नाहिसा करणारा असा ‘भर्ग’ शब्दाचा अर्थ और थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अज्ञानाचा समूळ नाश करणारा असाच ह्याचा अर्थ. त्यामुळे सर्व चिंता भय सोडून त्याची आराधना करीत राहिल्यास सर्व दुःखशोकांना तोंड देता येऊन ती सर्व नष्ट होतात: शांतिसमाधानाची प्राप्ति होते; तो सामर्थ्यसंपन्न होतो व मनात केलेले संकल्प पूर्ण होतात.

‘देवस्य धी महि’ दीव्यत इति देवः’ स्वतः प्रकाशमान असणायलाच, पूर्ण चैतन्य असणाऱ्यालाच ‘देव’ असे म्हटले जाते. प्रकाश असलेल्या ठिकाणी अंधारास जागा नसते. म्हणूनच स्वयंप्रकाशी महाचैतन्याचे ध्यान केले पाहिजे; सर्वांच्या देहांना चैतन्य देणाऱ्या महाशक्तीला ओळखले पाहिजे. सहजरित्या अनुष्ठानानेच कार्यसिद्धीला जाईल. पण दुष्ट गणांच्या दुष्ट शक्तीची बाधा होऊ नये म्हणून आवरण-विक्षेपाचे निवारण व्हावे. ‘धी महि’ बुद्धीनेच सर्वकाही समजते. ‘मी’ ही जाणीव समजवूनच पटवून घ्यावी लागते. त्या जाणिवेच्या द्वारेच निरतिशय आनंदाचा अनुभव होतो. त्यामुळे त्या अपार सुखाच्या पवित्र भावना ‘मी’ ह्या जाणिवेत उजळू देत, अशी प्रार्थना केली आहे.

ठीक आहे. आजच्या ह्या संस्काराद्वारे तुम्हां सर्वामध्ये दिव्यज्ञान । स्फुरण पावो ! तुम्ही सर्व कृतकृत्य व्हा ! परमात्म्याच्या दिव्यकृपेला पात्र होऊन पवित्रतेने तुमचे जीवन सार्थक होवो!

आता ह्या सर्व बटूंना वेद शिकविले पाहिजेत म्हणन ह्या बटूच्या पालकांनी त्यांच्याकडून वेदाभ्यास करविणे योग्य होईल.

॥श्री राम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥श्री राम समर्थ ॥

श्री रामावतार

आज श्रीरामनवमीचा दिवस आहे हे आपणांस माहित आहेच. आज श्रीरामरायांचा जगाच्या उद्धारार्थ झालेला दिव्य जन्म, त्यावेळची ती आनंददायी आठवण तो आपणांस प्रतिवर्षी करून देत असतो. त्यांचे ते जगदुद्धाराचे कार्य त्यावेळी सुरू झाले आणि आता ते बंद पडले असे नसून चालूच आहे हे हा उत्सव सिद्ध करतो.श्रीरामाचे स्वरूप वर्णितांना तो परमात्मा आहे असे श्रुति सांगते. आपण जीवात्मे ज्याचे अंश. तो आपले पूर्णस्वरूप आहे हे दाखविण्याकरता त्याला पूर्णस्वरूप म्हटले आहे. ‘यथा सुदीप्तात्पावकाद्विस्फुलिङ्गाः सहस्रशः प्रभवन्ते स रूपा तथाक्षराद्विविधाः सोम्यभावाः प्रजायन्ते तत्र चैवापियन्ति ॥

अग्निपासून जशा ठिणग्या निर्माण होतात तसे परमात्म्यापासून अनेक नामरूपाचे संकल्प निर्माण होतात. त्यावेळीच त्या त्या उपाधिभेदाने अनेक जीवहि निर्माण झाल्यासारखे वाटतात. आनंदरूप परमात्म्याच्या ठिकाणी जे काही होते ते सर्वहि आनंदच असते. प्रकृतीहून त्याचे स्वरूप अनादि आहे. त्याच्या शक्तीहून त्याचे स्वरूप आधीचें आहे, अनादि आहे. तो ह्या शक्तीच्या योगाने, आनंदरूपाने हे जग निर्माण करतो.

श्रुति सांगते-नात्र काचन भिदास्ति नेव तत्र काचन भिदास्ति।’ ह्या ठिकाणी व त्या ठिकाणी कुठेच भेद नाही. पूर्णापासून पूर्णच निर्माण होते. समद्रापासून तरंग निर्माण होतात. आनंदाचा उद्रेक म्हणजेच कार्याची स्फूर्ति. आनंदरूपांतून जे काही निर्माण होते ते सर्वत्र आनंदाविर्भावानें मंगल प्रदर्शन आहे. ह्या आनंदाव्यतिरिक्त जे काही मानील तें दुःखच. श्रुति सांगते- ‘आनंदावांचून ह्या जगांत आहेच काय दुसरें? ‘जे काही निर्माण होते तें आनंदरूपच. तद्व्यतिरिक्त कांही नाहीच. त्याचे अज्ञान म्हणजे दुःख. जी आनंदाची तृप्ति आनंदरूपाची अभिव्यक्ति म्हणजेच जग. अशा त्या आनंदघनाचा आविर्भाव होणे म्हणजे अवतार होणे. असा तो आनंदरूप श्रीराम त्याचा अवतार आज झाला. ज्याच्यामुळे नित्य तृप्ति, अचल समाधान नितांत शांति अंगी बाणते त्या मंगलमय आनंदाचा आविर्भाव म्हणजेच श्रीरामाचा अवतार म्हणजेच श्रीरामाचा जन्म अशा आनंदाचा साक्षात्कार व हे उद्दिष्ट साधण्याकरतांच आपण येथे श्रीरामरायाच्या दरबारात आलो आहोत. त्याच्या जन्मदिवशी तरी तो आपलें ब्रीद पाळील व आपणांस आनंदाचा साक्षात्कार करून देईल.

आनंदाची आवश्यकता केव्हां भासते? तर असह्य दु:ख झाले म्हणजे. व परमात्म्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. पापरूपी अधर्माने ही जनता पीडित होते, दुःखित होते, दुःखी होते, जेव्हां पाप माजतें तेंव्हा ते पाप नष्ट करून पुण्यमार्गाचा अवलंब करून, अधर्म नष्ट करून धर्माचरण कसे ठेवावे हे शिकवण्याकरता परमात्म्याचा अवतार होतो.

ही भूमी जेव्हां अधर्माने, पापाने पीडित होते तेव्हा तिला आमचा भार होतो. तिचा पुण्यक्षय होतो. पाप वाढू लागले म्हणज तिचा नाश होईल म्हणून ती गाईच्या रूपाने परमात्म्याला शरण जाते। व नंतरच परमात्मा अवतार घेऊन येतो व ह्या जगाची दुःख संकट नष्ट करतो. जगताचा हाहा:कार ऐकन जनतेची केविलवाणी स्थिती दूर करण्यासाठी गोरूप धारण करून दुष्टोचा भार सहन न झाल्यामुळे ही पृथ्वी परमात्म्याकडे जाते, देव व मनीजन हिच्या बरोबर असतात. ‘गो’ म्हणजे वाणी म्हणजे जनतेची वाणीव एकवटन परमात्म्याला सांगते व करुणेनें परमात्म्याच्या हृदयांत दया निर्माण करते. तिच्या रूपाने ती सबंध जगतच आपल्याबरोबर घेऊन जाते. तिला अभय मिळाले म्हणजे सबंध जगालाच अभय मिळते. अधर्म, अनीति, दुष्प्रवृत्ति म्हणजे अधिक विषय सुखाचा पेटलेला वणवा व स्वेच्छाचार हा जगात माजविला म्हणजे जगाचे हे दुःख घालविण्याकरता व स्वताच्या आनंदाचा आविर्भाव सर्वत्र करण्याकरता हा परमात्मा अवतार घेतो. स्वेच्छाचारापासून अनीतीपासून जे दु:ख झाले असेल तें नष्ट करून धर्माच्या, नीतीच्या, सदाचरणाच्या स्थापनेकरता तो आनंदरूप परमात्मा आविर्भूत होतो.

दशरथ म्हणजे साधक, कौसल्यारूपी बुद्धी ही त्याची धर्मपत्नी. आत्मा त्वं गिरिजा मतिः‘ आचार्यांनी शंकराला उद्देशून ‘तूं म्हणजे माझा आत्मा आहेस व गिरिजा म्हणजे माझी ही बुद्धी’ असे म्हटले आहे. बुद्धी ही पत्नी म्हणून मानली जाते. ‘बुद्धिरुपा ब्रह्मशक्तिरेव प्रकृतिः ।’ सामुदायिक प्रजेचे रूप म्हणजे राजा-प्रजेचे एकवटलेले रूप म्हणजेच राजा व त्याची बुद्धिरूपी शक्ति सर्वतोपरी योग्य झाली म्हणजे तिच्या ठिकाणी परमात्मा अवतार घेतो. म्हणजेच या जगताचे जे आनंदघनरूप आहे ते आविर्भूत होतें. साधक जेव्हा श्रद्धेने, भक्तिने, वैराग्य अंगी बाणून आत्मसाक्षात्काराला सर्वतोपरी अनुकूल असें आचरूं लागतो तेव्हा त्याच्या त्या बुद्धीरूपी कौसल्येत त्या आनंदघनरूपाचा आविर्भाव होतो, तोच आत्मसाक्षात्कार आणि हाच श्रीरामाचा अवतार.

व्यक्तिव्यक्तींचा मिळून एक समाज’ होतो. अनेक व्यष्ठीतून समष्ठी निर्माण होते. प्रत्येक व्यक्ति सुधारली तर आपोआपच सर्व समाज सुधारतो. तेव्हा समाज सुधारण्याचा उपाय म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्याला सुधारणे हे होय. पण सर्वसामान्य समाजातून ‘ सांगोची जाणती सर्वे । कर्ता कोणी दिसेचिना ॥’ असे आढळून येते. पण श्री समर्थ सांगतात ‘ सांगावे ते आपणाला । आपणू कर्ता भले ॥’ असो.

धर्मपत्नी जर योग्य असेल तर जीवन आनंददायी होते. बुद्धीही तुमची धर्मपत्नी व शक्ति आहे. ती जर तुम्हाला अनुकूल होऊन सदाचार संपन्न झाली तर त्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हा खरा रामाचा अवतार. हे खरें रामाचे दर्शन.

‘शृणु देवि प्रवक्ष्यामि गुह्याद्गुह्यतुर महत् । अध्यात्मरामचरितं रामेणोक्तं पुरा मम ॥’ पार्वती म्हणजे शंकराची बुद्धी. आत्मा त्वं गिरीजा मतिः।’ आत्मा हा महादेव आहे, त्याची मति म्हणजेच बुद्धी म्हणजेच गिरिजा. बुद्धीचे लक्षण प्रकाशरुप आहे. बुद्धी जाणीवरुप आहे. तिला सत्प्रवृत्त करायची आहे. ती विषयाकडे धावते आहे. तिला आत्मस्वरुपाकडे ओढायची आहे. बुद्धीला अध्यात्म, आत्मसंबंधी विचार शिकवावयाचे असतात. ते कोणते? तर श्रीरामाच्या अध्यात्माचा विचार हा प्रत्यक्ष रामाने सांगितला आहे. तसेच ज्यामुळे बुद्धी ही निवृत्तिपर होते तो विचार शंकराने पार्वतीला सांगितला. त्यांनी पार्वतीला म्हणजे आपल्या बुद्धीलाच बोध केला आणि आम्हालाहि तोच घडा घालून दिला.

आमचें हें जीवन तापत्रयाने गांजलेले आहे. त्या त्रितापाची शांति होऊन आम्हाला आनंदाची प्राप्ती व्हावयाची आहे. ज्याच्या श्रवणाने मुक्ती लाभते ते अध्यात्मविचार शंकरानी पार्वतीला सांगितले बुद्धिरुप पार्वतीला आत्मसाक्षात्कार करून देणारा तो शंकर. ‘शं करोति इति शंकरः।’ मा ठिकाणी साधक आणि बुद्धी असें नाते आहे. तसेंच तें दशरथ कौसल्लेच्या ठिकाणी आहे. आपण दशरथ आपली बुद्धी म्हणजे कौसल्या. तिला आपल्यासारखी करून आपल्या तंत्राने वागेल अशी करावयाची आहे. तिला सदाचार संपन्न, भक्तिपूर्ण, ज्ञानविचाराने युक्त करावयाची आहे. तिला आत्माकार करावयाचा आहे. आत्माकार बुद्धी झाली म्हणजे आत्मस्वरुपाचा साक्षात्कार होतो. राम हा आत्माराम आहे. आज त्याच्या जन्मदिनी त्याची उपासना करावयाची व प्रार्थना करावयाची की, त्याने आपले स्वरूप आम्हाला प्राप्त करून द्यावें.

रावण म्हणजे दर्शद्रियांचा सुखाभिमान. त्याने रामस्वरुपांची जाणीवरूप सीता हिरावून नेली व तो देहात्मबुद्धीचा मदोन्मत्त रावण आम्हां सात्विकांना छळतो आहे. त्यासाठी देवाची प्रार्थना करावयाची आहे की, ‘आनंदरुपी तुझा आविर्भाव आमच्या हृदयांत झाल्याशिवाय तो मदोन्मत्त रावण नष्ट होणार नाही व ती तुझी जाणीव प्राप्त होणार नाही. म्हणून तूं त्या रावणाचा नाश करण्याकरतां आमच्या हृदयांत अवतरून. तुझ्या जाणीवरुप सीतेची बंधमुक्तता कर, सत्कर्मरूप देवांची सोडवणूक कर.’ बुद्धिरुप कौसल्येचा गर्भ म्हणजे मीपणाची स्मृति. त्या स्मृतीत आत्मसाक्षात्कार व्हावयाचा आहे व त्या आत्मसाक्षात्कारानेच आपली तृप्ती व्हावयाची आहे. हे मीपणाचे भान देहरुप नसून ते ज्या मंगलमय आनंदमहोदधीपासून निर्माण झालें तो आवंदमहोदधीच, ‘मी’ अशा खऱ्या आवंदाचा अनुभव येऊन आत्मस्वरुपाचा साक्षात्कार झाला तो आनंद अखंड स्थिरावून प्रगट झाला म्हणजे श्री रामरायांचा अवतार झाला व त्याने रावणाला मारले आणि सर्वत्र रामराज्याची गुढी उभारली. आमच्या भारतांत रामराज्याची स्थापना झाली. ‘भाः ब्रह्मविद्या तस्यां रमत इति भारतः।’ भा रुपी ब्रह्मविद्येत रममाण होणाऱ्या ह्या भारतात ब्रह्मविद्येनें लक्षित होणाऱ्या आत्मावंदरुपी रामराज्याची स्थापना झाली व अखंड भारत त्या आत्मानंदात रमू लागला म्हणजे आमचे जीवन नित्यतृप्तीचे झालें.

सज्जनगिरी म्हणजे सत्-जन-गिरी. सत् म्हणजे अविनाशी आत्मरुप तद्रूप झालेले जन म्हणजे सज्जन. असे हे सज्जन ज्या ठिकाणी गिरीप्रमाणे अचल असतात. तो सज्जनगिरी. आत्मानंदाचा साक्षात्कार जिथे होतो तोच हा सज्जनगिरी. इथे त्या आनंदरुप श्रीरामरायाने प्रगट होऊन म्हणजे त्या आनंदाचा साक्षात्कार आमच्या हृदयांत होऊन श्रीरामरायानी आमच्यावर कृपा केली.

श्रीसमर्थांचाहि जन्म आजच. ‘गुरुशिष्या एकचि पद । तेथेना भेदाभेद ॥’श्रीसमर्थ आणि श्रीरामराय ह्यांच्यात भेद नाहीं हेच आजच्या रामजन्मकाली सिद्ध होते.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

॥श्री राम समर्थ ॥

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥श्री राम समर्थ ॥

रामराज्याचा ध्यास

विषम असणा-या जगांत तशाच प्रसंगी सर्वत्र समवस्थित परमात्म्याचा साक्षात्कार करून दिला तरी ‘व्यावहारिक विषमता’ हा जगाचा प्राण असल्यामुळे ती तशीच आपल्या आचरणांत ठेवली होती तसेंच इतरानांहि त्याचे सांगणे आहे. ‘ज्ञानोहया दूर्ध्व भवसु शास्त्ररक्षणम् ‘ ज्ञानोदयानंतर शास्त्र रक्षण झाले पाहिजे. ‘स्वधर्माचा सांभाळ करी। तो विवेक ॥’ असें श्रीनारदाप्रमाणे श्रीसमर्थानाहि सांगितले आहे. मागच्या आर्याप्रमाणेच श्रीसमर्थांचे ‘एकंकार गोलकार। करुंच नये ॥’ असें निक्षून सांगणे आहे.

‘शब्दि सर्व आत्मा म्हणावें। आचार सांडून भलतेच करावें । ते एक पाषांडमत जाणावें। विवेकी असेल तेणे॥

भेद तुटावयाचे स्थळ । तें एक स्वरूपचि निर्मळ । तेणे मायेचा खेळ। समूळ मिथ्या॥‘ स्वरूपाच्या दृष्टीने अभेद व व्यवहाराच्या दृष्टीने तात्पुरता भेद जीवनांत बाळगुन सुखासमाधानाच्या दिव्य जीवनाचा लाभ अनुभवा!’ असे श्रुतीचे सांगणे असल्याप्रमाणेच अखिल ऋषिमुनी, मनु, आचार्य, संतमहंत ह्यांचे सांगणे आहे. ‘स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा हरितोषणात् । साधनं प्रभवेत् पुंसां वैराग्यादिचतुष्टयम् ॥’

कठोर न्याय पद्धतीपेक्षा, अमानुष देहदंडापेक्षां चीतीच्या व धर्माच्या शिक्षणपद्धतीने हृदयाचें परिवर्तन करणे ही शाश्वत टिकणारी धार्मिक राज्यपद्धती होय. भारतवर्षाची आधुनिक राज्यपद्धती ‘रामराज्य’ म्हणून आपल्या विश्वोद्धारक अशा मंगलमय नावाने प्रकाशत आहे. नावाप्रमाणेच प्रभाव, कृतीसुद्धा झाली पाहिजे म्हणून आम्हा भारतीयांची अपेक्षा आहे.

‘प्रहृष्ट मुदितो लोकस्तुष्टः पुष्ट: सधार्मिकः । निरामयो ह्यशोकश्च दुभिक्ष्यभयवजितम् ॥ न पुत्रमरणं केचिद्रक्ष्यन्ति पुरुषा क्वचित् । नार्यश्चविधया नित्यं भविष्यन्ति पतिव्रताः। न चाग्निजभयं किंचिन्नाप्सु मज्जन्ति जन्तवः। न वातज भयं किञ्चिन्नापिदकरकृतं तथा ॥ न चापि क्षुद्भयं तत्र न तस्करभयं तथा । नगराणिच राष्ट्रानि धनधान्य युतानिच ॥’ असे हे रामराज्य आमचे स्वराज्य होवो. रामराज्याचे हे वर्णन वाल्मीकी ऋषीनी केले आहे. श्रीसमर्थांनी केलेलेंहि रामराज्याचे वर्णन बघु.  ‘राम विश्राम देवाचा । राम भक्तासि आश्रयो ॥ राम योगिमुनिध्यानी । राम रक्षी ऋषिकुला ॥ कीति ही रघुनाथाची । पाहता तुळणा नसे ॥ एकबाणी एकवचनी । एकपत्नीत्व धार्मिकु॥ राज्य या रघुनाथाचें। कळीकाळासि नातुडे ॥ बहुवृष्टि अनावृष्टि । हे कदा न घडे जनी ॥ उद्वेग पाहतां नाही । चिता मात्र नसे जनी ॥ व्याधी नाही रोग नाहीं। लोक आरोग्य नांदति ॥ कुरूपी पाहतां नाही। जरामत्य असेचिना। आदरूं सकळे लोका । सख्य प्रीती परस्परें ॥ बोलणे सत्य न्यायाचे । अन्याय सहसा नसे॥ अनेक वर्तति काया ॥ एकजीव परस्परें ॥ दरिद्री धुंडितां नाही । मूर्ख हा तो असेचि ना ॥ परोपकार तो मोठा । सर्वत्र लोकसंग्रही ॥ अद्भुत पिकती भूमी। वृक्ष देतो सदा फळें ॥ अखंड दुभती धेनु । आरोग्य वाहती जळें। नद्या, सरोवरें बाबी । डोलती नुतनें वनें ॥ फलती फुलती झाडें । सुगंधवन वाटिका । उदंड वसति ग्रामे । नगरें पुरेंचि पट्टणें ॥ तीर्थक्षेत्रे नानास्थाने । शिवालय गोपुरें वरी ॥ मठ मठ्या पर्णशाळा। ऋषिआश्रम साजिरे ॥ वेदशास्त्रधर्मचर्चा । रामराज्य भमंडळी॥’ आमच्या ह्या स्वराज्याचे नांव ‘रामराज्य’ आहे. संत तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्व म्हणूं. ‘झाले रामराज्य आतां काय उणे आम्हासी ॥’

ते धर्मपालका श्रीरामा! लीला मानुषरूप धारण करून तूं ज्या भारत वर्षाचे राज्य केलेस त्या भारतवर्षांचे राज्य निधर्मीयापासून तुझ्या कृपेने आम्हास मिळाले. तुझ्याच अनुग्रहाने प्राप्त झालेल्या स्वराज्यास तुझेच राज्य म्हणन रामराज्य’ नांव ठेवले आहे. ह्याचा अभिमान ठेऊन तुझ्या राज्याच्या वर्तनाप्रमाणे भारतवर्षाचे स्वराज्य होवो. हे दीनबंधो ! आम्ही सर्वजण तुझ्या दिव्य पदारविदाची प्रार्थना करीत आहोत. ‘अस्माकं सन्त्वाशिषः ।’ आम्हाला तुझा आशीवाद असावा.

महात्मा गांधीजींची राष्ट्रभक्ति प्रसिद्ध आहे. त्यांनी सर्वांच्या मुखांत  रघुपति राघव राजाराम। पतितपावन सीताराम ।। हे भजनामृत आपल्या स्मारकरूपाने ठेवले आहे. देवाचे गुणच भक्ताच्या ठिकाणी प्रगट होतात असे वर्णिले आहे. श्रीरामाला धर्ममूर्ति, मर्यादा पुरुषोत्तम, सुधार्मिक अशी नांवे आहेत. श्रीनारदानीं श्रीवाल्मीकींना रामराज्याचे लक्षण सांगून श्रीरामाचे कार्य समजावून सांगण्याच्यावेळी ‘चातुर्वण्यं च लोकस्मिन् स्वे स्वे कार्य नियोक्ष्यति ॥’ चातुर्वर्णाच्या लोकांना आपापल्या वर्णधर्माप्रमाणे राम योजील’ म्हणून सांगितले आहे.

देवाप्रमाणे भक्त आणि त्याप्रमाणे त्यांचे अनुयायी व्हावयास नकोत कां? भारतवर्षाच्या स्वराज्याला ठेवलेले ‘रामराज्य’ नांव एकल्याबरोबर कोणाचे मन त्या दिव्य वातावरणाच्या उन्नत विचारांत देहभाव विसरून आनंदपरवश होणार नाही?

स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः । समुद्र इव गांभीर्यधैर्येण हिमवानिव॥विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत् प्रियदर्शनः । कालाग्निसदृश: क्रोधे क्षमया पृथिवीसमा॥ धनदेन समात्यागे सत्ये धर्म इवापरः॥’ ह्या श्लोकातल्या वर्णनाने विश्वाच्या सर्व मानवापुढे श्रीवाल्मीकी मुनींनी अनुकरणीय असा एक आदर्श ठेवला नाही का? राम म्हणजे जगाचा आत्मा. त्याला ‘आत्माराम’ म्हणून नांव नाही का? त्याच्या स्मरणाने मनुष्यांना भक्ति, भुक्ति, मुक्ती ह्या तिहींचा लाभ होतो. त्याच्या स्मरणाने सर्व पाप नष्ट होते. ‘रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर्भुक्ति मुक्ति च विन्दति ॥’ हा श्लोक न ऐकलेले फार कमी. रामरक्षा सामान्यपणे सगळीकडे म्हटली जाते. रामनामाचा अधिकार सर्वांना आहे. पूर्वी धन्याला नमस्कार करतेवेळी ‘जोहार मायबाप’ असे म्हणत. श्रीसमर्थ रामदासस्वामींनी ती पद्धत काढून टाकून ‘राम राम’ असे म्हणावयास सांगितले व त्यांच्या उद्धाराकरिता रामनामाचा तारक उपदेश केला ह्या रामनामाच्या उच्चारास कोणत्याहि जातीचा, आचाराचा, सोवळयाओवळ्याचा कसलाहि निर्बंध नाही.  दास म्हणे रघूनाथाचा। गुण घ्यावा॥’ श्रीरामाचा गुण घ्या! त्याच्या स्वरूपानें, सद्गुणानें, देह-अंतःकरण भरून टाका! असे सर्वांनाच अनुलक्षून श्रीसमर्थांनी सांगितले आहे.

सदा रामोऽहमस्मीती तत्वतः प्रवदन्ति ये। न ते संसारिणोननं राम एव न संशयः॥ (रामोत्तर तापिनी) आपल्या अत्यंत परिशुद्ध अशा तात्त्विक स्वरूपाचे ध्येय अखंड आपल्या दृष्टीपुढे दृढ ठेवून जे ‘यन्मतामनुते तद्वाचा वदति ।’ ह्या वचनाप्रमाणे ‘मी तत्त्वत: रामच आहे’ म्हणून आपला निश्चय प्रकट करतात ते केव्हाही संसारी होत नाहीत. ते खरोखरच रामरूप होतात ह्यांत संशय नाही.

” जय जय रघुवीर समर्थ”

इति शिवम् ।

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

॥ श्रीराम समर्थ ॥

आर्यसंस्कृति

आर्यांची संस्कृति फार मोठी आहे. जगाकडे पाहिले तर ते एका सुखासाठी अव्याहत कार्यरत आहे. सुख काय आहे ह्याचा शोध जगात चालू आहे. आर्यानीच खऱ्या सुखाचा शोध लावला. जग ही एक प्रयोग शाळा आहे. जे सुख सर्वांना पाहिजे ते जड पदार्थापासून मिळणार नाही हा सिद्धांत आहे. सुख हे बाह्यपदार्थात नाही, मग एवढा खटाटोप का? सुख नसेल तर प्रयत्न होऊ न देता त्याचे समाधान ज्याचे त्यांना करता येईल. आपल्या अनुभवावरून ही गोष्ट कळून येते. जगांत सुखासाठी एकसारखा प्रयत्न चालू आहे; पण नितांत शांतीचा अनुभव मिळत नाही असा सर्वांना अनुभव येतो. • Uneasy lies the head that wears the crown ‘न सुखं देवराजस्य।’ इंद्रसुद्धा सुखाला पारखा आहे. परंतु ज्यानी मनाला जिंकलें त्यालाच खरें सुख मिळते. बाहय पदार्थाविषयी ज्यांच्या गरजा कमी झाल्या आहेत तोच सुखी. — He is happy, whose wants are few.’ बाह्य गरजापासून अशांति निर्माण होते. ‘न जातुः कामः कामानां उपभोग्येन शाम्यति । हविषा कृष्णवमव भूय एवधिवर्धते ॥’ बाह्य पदार्थाच्या प्राप्तीचे उपाय अशांतीला कारण आहेत. त्यापासून मनाला शांति प्राप्त होत नाही. ह्या जगांत त्यागातच शांति मिळते. मनुष्याचा मार्ग मात्र चकला आहे. त्यागानें तो खऱ्या मार्गावर येतो. तसेंच आपण कितीहि प्रयत्न केले तरी सुख मिळेळच असे नाही. एक तत्वज्ञानीच मात्र सुखी आहे.

सुखाकरिता ह्या जगांत आटोकाट प्रयत्न चालू आहेत. आपल्यांत ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ अशी म्हण आहे व ती सर्वांच्या परिचयाची आहे. सर्वानाच स्वर्ग मिळत नसतो. तो फक्त योग्यावाच योगसामर्थ्याने प्राप्त होतो. आपल्या शुद्ध स्वरूपाच्या प्राप्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अंतरमुख ध्यानाच्या अभ्यासाने त्याला त्याची प्राप्ती होते. संत शिरोमणी तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठास जाता आले. तेव्हा ह्या गोष्टी परमेश्वरी कृपेशिवाय शक्य नाहीत. हे दिव्यदृष्टीचे सामर्थ्य आहे. ‘लोमेश’ नांवाचे ऋषी अद्यापहि आहेत. त्यांना सर्व ठिकाणी जाण्याची अव्याहत गती आहे. प्रत्येक युगास त्यांचा एक केस गळून पडतो. अशा प्रकारचे त्यांचे सामर्थ्य आहे. तेव्हा अशा प्रकारचे सामथ्यं परमेश्वर कृपेनें ज्ञान झाल्यावर योगाच्या द्वारेंच ते शक्य आहे. अशा योग्याला अथवा ज्ञान्याला इच्छा शक्ति प्राप्त होते व त्याच्या सर्व इच्छा फलद्रूप होतात. इतरांना ते कदापीही शक्य नाही.

यौगिक सामर्थ्य किंवा तपःसामर्थ्य अथवा ज्ञानसामर्थ्य ह्यांच्या योगानें तो सर्वात्मभावास प्राप्त होऊन त्याच्याठायीं अलौकिक तेज प्रकट होते व त्यालाच ‘ आत्मिकबल’ म्हणतात. ह्या बळापढ़ें भौतिक बळाची किंमत नाही आपल्या देहांत पांच भूतें आहेत म्हणन शरीर हे पंचभौतिक होय. पायापासून गुढग्यापर्यंत पृथ्वीतत्त्व, गुडग्यापासून मांडीपर्यंत आपतत्त्व, मांड्यापासून हृदयापर्यंत अग्नितत्त्व, हृदयापासून भृकुटीपर्यंत वायुतत्त्व व त्याच्या वरच्या भागांत आकाशतत्त्व. ह्या प्रत्येक तत्त्वाशी जर प्राणवायु स्थिर करता येऊ लागला तर तो सर्वसमर्थ होतो. त्याला कोणी रोखू शकत नाही. हे योगसामर्थ्य असून सध्या तरी ही विद्या लुप्त झाली आहे. अशा ह्या शक्तींपुढे बाकीच्या बाह्य भौतिक शक्त्ति तुच्छ होत.

आपला आर्य देश ह्या कार्यात फारच पुढे होता आपल्या आर्य संस्कृतीमुळे व तिच्यातील तत्त्वज्ञानाने वेड लागलेली मनुष्य पुष्कळ प्रमाणात आहेत. सुप्रसिद्ध अनि बेझेंट, शोपेनहार, मॅक्स मुल्लर हे त्यापैकीच होत. ह्या तत्त्वज्ञानामुळे त्यांना शांतीचा लाभ झाला, असे त्यांचेच उद्गार आहेत. आपला हा ‘भारत देश’ अशा सामर्थ्याचा खजिना आहे व येथूनच हे सामर्थ्य दुसरीकडे गेले आहे. आपले पूर्वीचे ऋषिमुनी ह्या सामर्थ्याने संपन्न होते. काशीराजाचे सामर्थ्याबद्दल असे सागनात की, ते पायानेच स्वगात चालत गेले, महापराक्रमी दशस्थ राजाही स्वर्गाला गेले होते. स्वर्ग खरा आहे. तो काल्पनिक नाही. तो अमरलोक आहे.

असें हैं योगसामर्थ्य आमच्या भारतवर्षात होते. दूरदृष्टी व दूरध्वनीश्रवण अशा सारख्या लहान सिद्धी योगबळाने सिद्ध होतात. सध्याहि आहेत. तात्पर्य, स्वरूपसुखांत तारतम्य आहे. बाह्यसुखाची इच्छा कमी करून अंतर्मुखासाठी प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराची कृपा झाल्यावर ‘मनी धरावे तें होतें। विघ्न अवघेचि नासून जाते। कृपा केलिया रघुनाथें। प्रचित येते ॥’ मनांत आल्यावर व परमेश्वराची कृपा झाल्यावर ‘भक्तें जें जें मनी धरावें । तें तें आधीच देवे करावें ।’ अशा प्रकारचे हे आर्यसंस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे. ही संस्कृति इतर संस्कृतीहून अगदी वेगळी व भिन्न आहे. ज्याला खरे सुख पाहिजे त्याने ह्या संस्कृतीला शरण गेले पाहिजे. असे हे यौगिक सामर्थ्य आहे. तसेंच भक्तिचेहि सामर्थ्य फार मोठे आहे. हा भक्तीचा झरा प्रत्येकाच्या हृदयांत आहे. महाराष्ट्रात जेवढे संत व भक्त होऊन गेले तेवढें कोठेही झाले नाहीत. ह्या मार्गात महाराष्ट्र जसा पुढे आहे तसाच सुधारणांच्या बाबतीतहि पुढे आहे. सारांश तेजस्विता जो पर्यंत पुढे आहे तोपर्यंत जय. तेजस्विता धर्माने येते. विशेषतः परस्री व विषयलोलपता हयापासून अलिप्त रहाणे हे धर्माचें सामान्य लक्षण आहे. भारतीय धर्म काय शिकवतो? तर ज्याच्यामुळे अनंतपरीने असलेले जे सुख व त्या सुखाच्या प्राप्तीची साधनें जो दाखवितो तोच धर्म व ज्याच्या आचरणाने ते सुखकर होते तो ‘आर्यधर्म.’ आर्यधर्माचे मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती म्हणजेच सर्वसुखप्राप्ति व तेच ध्येय साध्य व्हावे ह्याकरितां सर्व संकल्प आपल्याकडील कन्यादानाच्या वेळी जो संकल्प जातो तो वास्तविक ब्रह्मलोकप्राप्तीसाठी केला जातो. लग्नाच्या वेळी विष्णुरुपिणे वराय’ म्हणून संकल्प आहे. सर्व कार्याच्या संकल्पात जो संकल्प केला जातो तोच परमात्मप्राप्तीच्या ध्येयासाठीच आहे. आज सर्व दृष्टीने विचार केला तर लाजेने मान खाली घालण्याची पाळी आलेली दिसते, इतका समाज अधोगतीला गेला आहे.”

सर्व पृथ्वी बलाने पादाक्रांत करता येईल परंतु मन जिकता येणार नाही. विषयेछेमुळे मन दुर्बल बनते. जरा मन परमात्म प्रकाशानी भरुन जाईल तर ते मन वाटेल ते करू शकेल. महंताचा देह म्हणजे अशा दैविक सामर्थ्यांचा खजिनाच होय. जीवन म्हणजे खऱ्या सुखाचा झरा. तो झरा फक्त भारतातच आहे. परंतु आजची स्थिती पाहू गेले असतां सर्व त-हेने फरक दिसतो. आज प्रत्येक मनुष्य पाश्चिमात्य संस्कृतीने भारावलेला आहे. आपल्यामध्ये ‘जाणवें’ हे जीवब्रह्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे. जाणव्याच्या गांठीला ‘ब्रह्मगांठ’ म्हणतात. तात्पर्य, प्रत्येक आचरण मग ते सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो त्यांत परमेश्वरप्राप्ती हेच ध्येय ठेवून आमच्यातील सर्व संकल्प आहेत. पूर्वीचे लोक त्याचदृष्टीने करीत आलेले आहेत. कन्यादान, वरासंबंधी इत्यादी सर्व संकल्प ब्रह्मप्राप्तीसाठीच करतात. असे संकल्प इतर कोठेही व कोणत्याही धर्मात मिळणार नाहीत. अशी ही थोर संस्कृति आज लोप पावत चाललेली आहे. आपण सर्व तहेर्ने बाटलो आहोत. म्हणून ही गोष्ट सहन होत नाही. प्रजासत्ताक राज्य, तेव्हा राज्यकर्ते असेच बाटलेले. आज सर्वत्र अंधार पसरलेला आहे. स्वप्नांतील दुःखाला औषध जशी जागृती, तशी आपल्यात ह्या संस्कृतीची जागृति झाली पाहिजे. खऱ्या सुखाची साधने ज्या धर्माने सांगितली त्याच धर्माच्या आचरणाने जगावें. त्यालाच जीवन असे म्हणतात व त्याकरताच समाजरचना आहे. पूर्वजन्माच्या संस्कारानुसार पुढील जन्म आहे. ज्याचे काम त्यानीच करावे. ‘जेणोकाम तेणो ठाय, बीजा करे तो गोता खाय’ सर्वांनाच मोठे व्हावे असे वाटते पण मोठेपणा टिकविणे कठीण आहे म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याग धर्मात नीतिनियम लावून दिलेले आहेत ते योग्यच आहे. प्रत्येकाला ह्या आर्यधर्माचा अभिमान वाटला पाहिजे. ज्याचा कोणत्याहि प्रकारचा बुद्धिभेद होत नाही तोच आर्यधर्माभिमानी! धर्म काय सांगतो? दुसऱ्याची वस्तु घेऊ नको! दुसऱ्याच्या हक्काची पायमल्ली करू नको! हीच नीति. पण ती समर्थ होणे शक्य नाही. विषमता हाच जगाचा स्वभाव, ज्येष्ठता व कनिष्टता हाच स्वभाव. नेता, नेणारा पुढे व त्याच्यामागे सर्व जातात. सर्वांचे सामर्थ्य एक नसते. ह्यामध्ये व्यावहारिक व पारलौकिक अशा दोन दृष्टी आहेत. ह्या दृष्टीने जीवन जमावे ह्या जन्माच्या कर्माने हा जन्म नाही. मागील कर्मामुळे हा जन्म तेव्हां जन्मप्रवाहातून सुटण्यासाठीच सर्व प्रयत्न व त्याचकरिता परमार्थ ज्ञात्याचे प्राण कोठेहि जात नाहीत. तो येथेच ब्रह्मांत विलिन झालेला असतो. जन्म राहि त्याकरिता प्रयत्न जन्म. हा जर फक्त ऐहिक सुखाकरतांच असेल तर असे जन्म किती? व हे कसे ठरविणार ? तेव्हां परमात्मप्राप्ती पाहिजे असेल तर त्याकरतां प्रत्येकाने प्रयत्न करावयास पाहिजे. आनंदभावरुप आहे तो कोणता? तर तेच ते ‘आनंद ब्रह्म.’ ब्रह्म कोठे आहे ? ते सुष्टीपूर्वी म्हणजे आकारापूर्वी होते आकार म्हणजे कार्य. म्हणजे ब्रह्म होते, नव्हते असे नाही. त्याचा महिमा अनंत आहे. अशा ह्या ब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय हा जन्मप्रवाह संपणार नाही. आनंद हेच परमात्म्याचे स्वरूप व त्यातच शेवट आहे.

अशा ह्या आर्यसंस्कृतीचे आपण सर्व सुपुत्र आहात. पुत्र म्हणजे पहिली संतति, त्यालाच पुत्र म्हणतात. कारण तो ‘पुन्नाम् नरकात्त्रायते। यापुढील संतति ‘कामज होय.

“वेदोऽखिलं धर्ममूलम् ।’ अशा प्रकारे परमात्माप्राप्तीकरता जी संस्कृती आहे तीच संस्कृति खरी. जीत परमात्मप्राप्ती नाही ती संस्कृतीच नव्हे. अशा परमात्मप्राप्तीचीच संस्कृति आपणांस मिळो! त्या संस्कृतीचे वारसदार आपण आहोत हे विसरू नये. अशी त्या आनंदघन परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे.

श्री रामदासस्वामी महाराज की जय।’

” जय जय रघुवीर समर्थ”

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀

❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀~●~❁~●~❀