श्री गुरुदत्तात्रेयाष्टकम्

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज रचित
ऋण निर्देश - सौ.नलिनी प्रभाकर पाटील,इंदूर (एम.ए.संस्कृत - प्रथम श्रेणीत प्रथम स्थान) यांनी या संस्कृत काव्याचा मराठी अनुवाद केल्याबद्दल तसेच श्री श्रीधर बळवंत दीक्षित,पुणे यांनी याबाबत प्रयत्न केल्याबद्दल ShridharSahitya.com या उभयतांचे ऋणी आहे)

 

(शिखरिणीवृत्तम् )

जगत्सत्यं वा नो न च तनुरहं वाऽतनुरहं
अहं भूमा नो वा मनुत इति यो नोऽद्वयरसः ।
न माया नो विद्या स्पृशति किल यं तं सुविमलं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥१॥

मी म्हणजे हे शरीर आहे, किंवा नाही? हे जग सत्य आहे किंवा नाही? (म्हणजे हे भ्रामक आहे का?) मी म्हणजे ते ‘भूमा’ नामक विशाल तत्व आहे का? ते अद्वितीय आणि एकमेव तत्त्व, जे अनन्त आहे ते माझ्यात आहे असे मी समजतो. हे मना तू त्या निर्मल अशा गुरु दत्तात्रेय रूपाचे ध्यान कर जे कोठल्याही मायारूपी विकाराने किंवा अविद्यारूपी दोषाने कलंकित होत नाही, आणि नम्रपणे आपले अभीष्ट साध्य करण्यासाठी त्याचे ध्यान कर ॥१॥

त्रिमूर्तीनां मायारहितमतिशुद्धं निजपदं
परं सच्चित्सौख्यं प्रकटितमहोऽत्र त्रिवदनैः।
निजब्रह्मैक्यं यद्विहरति वितन्वन् य इह तं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥२॥

तीन मूर्तिरूपाने ,ज्याला कोठलाही मायेचा स्पर्श कलंकित करीत नाही असा तीन मुखाने विलसित होणारा तो दत्तगुरु सत् चित् आणि आनन्दरूपाने सर्वत्र प्रकाशित होत आहे. तो “आपल्या ब्रह्मरूपानें इहलोकी झळाळत आहे. अश्या ह्या गुरु दत्तात्रेय रूपाचे हे मना, तू नम्र होवून भजन कर. ॥२॥

तपस्तेपेऽत्रिर्यत्तनुजजनने भक्तिवशतः
तया प्रीत्या दत्तः स्फुटतिरपरात्मैव कृपया ।
ददात्यात्मानं यो ह्यतिकरुणया तं सुखनिधीं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥३॥

पुत्रप्राप्तीकरिता अत्री ऋषींनी तप करुन भक्तिपूर्वक परमात्म स्वरूपाचे ध्यान केले. प्रसन्न होवून परमात्म्याने ‘दत्त’ म्हणजे दिले असे म्हणून करुणामय कृपापूर्वक त्यांना सुखाचा सागर असा आत्मज-पुत्र दिला. त्या गुरु दत्तात्रेयांचे हे मना, नतमस्तक होवून ध्यान कर. ॥३॥

विभुर्यो नित्यो वाऽक्षरमिति च वा ब्रह्म परमं
वरेण्यं सत्यं वा ह्यतनुविभवः पापरहितः।
स्वभक्तानां मुक्त्यै सगुण इति यस्तं श्रुतिनुतं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥४॥

अत्यंतश्रेष्ठ (वीभु:) अनन्त परब्रह्मरूप, ध्यान करण्यास पात्र, सत् तत्त्वासह स्वयंभू (अतनुविभवः) कोठलेही बंधन नसणारा मुक्त, स्वताच्या भक्तांसाठी सगुणरूपात अवतरणारा, तसेच त्यांना मुक्ति प्रदान करणारा, श्रुति (वेदांद्वारे) मान्य अश्या त्या दत्तगुरुचे हे मना, तू विनयाने मनन कर. ॥४॥

न भोगैर्नो दानैर्न च खलु तथा यागनिचयै
न शास्त्रैर्नो योगैर्बहुविधविधानैर्न वशगः ।
कलौ भक्त्या प्रीतो भवति च वशो यस्तमभयं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥५॥

कोठलेही अर्पण केले गेलेले पदार्थ, भोग, विविध प्रकारचे दान, अगणित यज्ञ, योग-याग आणि वेगवेगळे शास्त्रोक्त विधि कर्मकाण्ड ह्या दत्त गुरुला वश करु शकत नाहीत. तर ह्या कलियुगात फक्त प्रेमपूर्ण भक्तीनेच तो वश होतो. त्या अभय देणाऱ्या अशा दत्त गुरुचेच हे मना, नम्रतेने सतत ध्यान कर. ॥५॥

न माया नोऽविद्या जगदिदमहो चैवमथवा
न पिण्डं ब्रह्माण्डं भवति न जनुर्यस्य दयया ।
दयासिन्धुर्यस्तं भवदलनदक्षं मुनिनुतं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥६॥

माया, अविद्या, जगत् जीव, पिण्ड आणि ब्रह्माण्ड हे सर्व त्याच्या प्रमावानेच अस्तित्वात असतात. महान् मुनिवरांकडून मान्य अश्या भवसागर पार करविण्यास समर्थ अश्या दत्तप्रभूला तू हे मना! विनम्रपणे अर्थात श्रध्देने स्मरण कर. ॥६॥

भवेद्यः सन्तुष्टः स्मरणमपि चेद्वा यदि कृतं
निजं ज्ञानं दत्त्वा विषयविषपाशान् दलति यः ।
जगत्सेतुर्यो वै भवजलनिधि तर्तुमिह तं
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥७॥

फक्त त्याचे स्मरण केल्याने सूध्दा जो संतुष्ट होतो आणि स्वात्मरूपाचे ज्ञान देवून जो विषयवासनारुपी विषाचे दलन (नाश) करतो, तसेच भवसागर तरुन जाण्यास जो ‘सेतु’ रूपी अवतार धारण करतो त्या भगवान त्रिवदन दत्ताचे तू विश्वासाने स्मरण कर.॥७॥

न माया नोऽविद्या न च मम तु जीवेशकलना
न विश्वं नो पिण्डं न च मम जनिर्वा मृतिरपि ।
नरो नो नारी वा न च मम विकारः क्वचिदपि
गुरुं दत्तात्रेयं भज नतमनोऽभीष्टवरदम् ॥८॥

माझे आत्मरूप निर्मल आहे (नच मम विकार:) त्यात माया, अविद्या, जीवरूपी कल्पना, जन्म, मृत्यु, विश्व, पिण्ड, पुरुष आणि स्त्री वगैरे सर्व भेदरूप प्रकार नाहीत. हे मना, तू नतमस्तक होवून त्या गुरुदत्तात्रेयांचे ध्यान कर. त्यामुळे तुझे योग्य ते कल्याण होईल.॥८॥

दत्ताष्टकमिदं पुण्यं यः पठेत्प्रयतः पुमान् ।
ज्ञानं सिद्धि स चाप्नोति नात्र कार्या विचारणा ॥

इति श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकं सम्पूर्णम्

मार्गशीर्ष शुद्ध पूर्णिमा रचनस्थानम् : काफि उद्यानं, चिक्कमगळूरु