कै. हरिभाऊ विनायक खाडे व कै. अन्नपूर्णा हरिभाऊ खाडे यांच्या पोटी दिनांक 20/10/1920, रविवार या दिवशी, श्रीक्षेत्र जेजुरी येथे माझा जन्म झाला. त्यादिवशी विजयादशमी निमित्त श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडेराव देव …………….पेठेतील नंदी वेशीत उभी असून चौकात ………….काम  सुरू होते. सुर सनई ढोल-ताशाचा चौघडा……..होती ते समयी जन्म झाला.

लहानपण जेजुरी येथे गेले. नंतर ………येथे भावाचे घरी शिक्षण मराठी सहावी पर्यंत झाले. कळू लागल्यापासून ईश्वरभक्ती ची ओढ लागली होती. कालांतराने मुंबईतील नोकरी सोडून जेजुरीस  सहकुटुंब राहणे प्राप्त झाले. घरी शेती आणि पौराहित्य हे दोन व्यवसाय होते. देवाची पूजा अर्चा करताना विधीची जरुरीच आहे असे जाणून श्री मल्हारी म्हाळसाकांत च्या कृपेने आमच्या व्यवसायापुरते ज्ञान प्राप्त झाले. येणाऱ्या सर्व थरातील भक्तांच्या पूजाअर्चा यथासांग व शास्त्रोक्त करीत असल्याने माझ्यासह सर्वांनाच फार शांततामय आनंद प्राप्त होतो. ईश कृपेने माझ्याकडे संस्थानिक, राजकारणी अधिकारी वगैरे आणि यजमान पूर्वापार येत होते व आहेत. त्यात बरेचसे सत्पुरुषही माझ्याकडे आले त्यातून गुरुशिवाय ज्ञान नाही म्हणून श्रींचे चरणी गुरु लाभाची तळमळ करीत होतो. धार्मिकतेतून प्रपंच चालू असल्याने आपणही काही धार्मिक कृत्ये करावीत म्हणून पुष्कळ दिवसांपासून “श्री दत्त जन्माचा जन्मोत्सव”, “श्री दास नवमी उत्सव” तसेच स्वतःचे श्रींचे कुलधर्म कुलाचार यथासांग करून वर्षातून एक सहकुटुंब तीर्थयात्रा करीत आहे.

सत्पुरुषांच्या सहवासाने आपणासही योग्य असे गुरु लाभावेत ही मानसिकता तळमळ सारखीच वाढत होती श्रीक्षेत्र गोंदवले येथे यात्रे साठी जाऊन आलो होतो. दुसरे दिवशी रविवार होता. सकाळीच श्रींच्या पूजेसाठी देवळात गेलो होतो. पूजा समाप्त होताच दृष्टांत झाला. तो असा “श्री भगवान श्रीधरस्वामी जुन्या जेजुरी येथील पेशवे तलावातील श्री बल्लाळेश्वर मंदिरात आले असून ते पूजेसाठी मला बोलवीत आहेत. तरी पूजा घेऊन ये”. मी थोडावेळ ……..होऊन लगेच घरी आलो. एका मोठ्या परातीत सर्व पूजासाहित्य तयार करून मोटार स्टॅण्डवर केळीच्या फण्या व हार फुले घेण्यासाठी उभा होतो. बरोबर माझा धाकटा मुलगा चि. दत्तप्रसाद हाही सोवळ्यात होता. इतक्यात श्री क्षेत्र सज्जनगड येथील श्रीसमर्थ सेवेची मोटार, बरेच भक्त गण व तेथील अधिकारीवर्ग यांचे सह माझ्या पाठीमागे रस्त्यावर उभे राहिले व आम्हास सोवळ्यात पाहून मला विचारले “श्री खंडोबाच्या देवळा चा रस्ता कोठून आहे? आमचे स्वामी जेजुरीस गेल्याचे आम्हास समजले”. त्यावर मी सांगितले की स्वामी देवळात किंवा गावात नाहीत, ते गावापासून दूर असून त्यांच्याच पूजेकरिता मी निघालेलो आहे. त्यावर “ आम्हासही ते ठिकाण दाखवा” असे म्हटल्यावर आम्ही त्यांचेच मोटारीतून मोटार वळवून मल्हारतीर्थ, भंडार तीर्थ व लक्ष्मी तिर्थ यांचे दरम्यान मोटार उभी करून सर्वजण गाडीतून उतरून श्री बल्लाळेश्वर तिर्थ कडे निघालो. तलावाची जवळपास गेल्यावर तलावाच्या तीरावर श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज उभे असलेले पाहिले व तेथेच पूजेचे ताट खाली ठेवून शेतातच श्री स्वामींना साष्टांग दंडवत घातले. तेथे शांत बसून –

ज्ञानयोग प्रदातारम् । दत्त श्रीधर रुपीणम् ।
सच्चित् सुख घनाकारम् । मोकक्षात्मानं भजामहे ।।
मोक्षश्री घरी जो करी भवजना । द्याया कृपे श्रीधर ।
ब्रम्हानंदी निमग्न लोक करण्या । उत्कंठ जो सत्वर ।।
शृंगारी नुपजेची आवडी तया । वैद्यासी रोगी जशी ।
नादे विष पियुष सद्गुरु कधी। ख्याती तयाची अशी ।।

“श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय!!” असे म्हणून पुन्हा एक दंडवत घालून नमस्कार करून पूजेची परात घेऊन तलावावर गेलो. स्वामींनी मला खुणेने मला देवळात ( खाली उतरून) जाण्याची आज्ञा केली. मी देवळात जाऊन श्री बल्लाळेश्वर महादेव मंदिरात पूजेचे सामान ठेवून, रांगोळी उदबत्ती लावून पूजेची तयारी करून बसलो. थोड्या वेळानी स्वामी खाली येत होते. ते गायमुखाच्या किनाऱ्याने मंदिरात येत असता मी तिथेही त्यांना साष्टांग नमस्कार केला. स्वामी माझे जवळ येऊन माझ्या खांद्यास धरून, मला मागे नेऊन पुन्हा ‘श्री भवानी शंकर बल्लाळेश्वराचे पिंडीस तसाच नमस्कार करावयास लावले. तात्काळ माझ्या लक्षात आले की स्वामींना नमस्कार करताना पाय पिंडी कडे होते. असो. मी स्वामींना म्हणालो “आपण मला तुझे साठी बोलावलेत ना? तेव्हा मी पूजेचे साहित्य घेऊन आपल्या पूजेसाठी आलो आहे”. त्यावर स्वामी उत्तरले “हे सर्व पूजासाहित्य शंकराच्या पूजेसाठी वापरून श्रींची यथासांग पूजा कर. मी शास्त्रोक्त .. .. .. .. .. .. करून श्री भवानी शंकराची यथासांग पूजा-अर्चा- आरती करून स्वामींचे दर्शन घेतले व म्हणालो “आता आपल्या पूजेचे साहित्य घेऊन येतो”. त्यावर स्वामी म्हणाले “मी माझ्या पूजेसाठी तुझ्या घरीच येणार आहे”. त्यावर मी म्हणालो की “माझ्या घरी येणार तर भोजनाचा प्रसादही मी माझ्याच घरी करितो. स्वामी म्हणाले “आम्ही भिक्षा आहार करितो, परान्न घेत नाही”. मी म्हणालो “आपणा बरोबर आलेल्या सर्व भक्तगणांना तरी माझ्या घरी प्रसादा करिता पाठवा”. त्यावर “ठीक आहे” म्हणून सर्व भक्तगणांना माझ्या घरी जाण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे ते माझे बरोबर निघाले. यावेळी तलावावर टॅक्सी, जीप गाड्या, वगैरे बर्‍याच उभ्या होत्या. त्यातील एका जीप गाडीत कर्नाटकातील एक साहेब मला म्हणाले “स्वामी तुमचे गुरु आहेत का?” मी म्हणालो “अनुग्रह घेतला नाही परंतु “गुरु” म्हणून मानतो. त्यावर ते म्हणाले “अनुग्रह घेऊन टाका”. त्यानंतर त्यांचेच जिप गाडीने आम्ही आमच्या घरी आलो.